अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण हिंगोलीवरचा भगवा तुम्ही कधी उतरू दिला नाही; त्यासाठी मी तुम्हाला साक्षात दंडवत घालतो!
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी दिल्ली हादरायची तो जमाना आता आपल्याला परत आणावा लागेल. कोणाची टाप होता कामा नये, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची!
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
मी तमाम हिंगोलीवासियांना विनंती करतो, जे जे कुणी गद्दार खासदारांमुळे नाराज होऊन निघून गेले असाल तर त्यांनी पुन्हा या! शिवसेना आपली आहे.
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
आमदार-खासदार फुटला फुटू द्या, पुन्हा आपण नवीन हक्काचा आणू!
पण तुमच्या न्याय हक्काचे आणि जीवनमरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी हा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत उभा राहील.
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
विकासासाठी गेलाय म्हणताय ना मग...
माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील काय?
त्यांना कर्जमुक्ती मिळेल काय?
त्यांना पीकविमा मिळेल काय?
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
मोदीबाबा सांगतात, सोनं खरेदी करू नका. सोन खरेदी करण्याची ताकदच ठेवली नाहीत तुम्ही देशातल्या नागरिकांची! सोनं खरेदी करू नका पण आमदार-खासदार खरेदी करा. आमदार-खासदारांचा भाव सोन्यापेक्षा स्वस्त झाला की काय?
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
अनेक शिवसैनिकांना पैशाच्या ऑफर आल्या पण शिवसैनिकांनी त्या हरामाच्या पैशाला लाथ मारली आणि हातात भगवा धरलेला शिवसैनिक त्यांच्यासमोर निष्ठेने उभा राहिला.
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
वाघाचं कातड पांघरलेले हे लांडगे-कोल्हे-गाढवं होती, प्रेमाने डोक्यावरती काय घेतलं पण त्या लायकीची माणसं नाहीत आणि नव्हतीच!
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#हिंगोली_सभा
संकटाच्या छाताडावर चालून जाणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी मला दिले आहेत, ते जोपर्यंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत कितीही संकट येऊ दे त्यांना पायदळी तुडवून त्यांच्या उरावर भगवा रोवून मी पुढे जाणार आहे.
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#वाशीम_सभा
आईच्या, मुलीच्या नावाने खोटं बोलणारा, आपल्या सगळ्यांनाच्या नावाने खोटं बोलणारा माणूस विकासासाठी गेलाय, ह्यावर विश्वास बसतो का?
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#वाशीम_सभा