काश्मिरला फिरण्यासाठी गेलेल्या आपल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पर्यटकांना हे खासदार महाशय भिकारी समजतात का❓
विमानात कधीही न बसलेल्यांना आम्ही विमानाने आणल्याची उपकाराची ही अहंकारी भाषा आपल्या विदर्भाचा स्वाभिमान पायदळी तुडवणारी आहे. म्हस्के यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे.
अनेक वर्षांपासून अमरा��तीकरांना स्वतःच्या हक्काचे बंद पडलेले विमानतळ सुरू होण्याची प्रतिक्षा होती.ती प्रतीक्षा आज अखेर संपली.त्याबद्दल अमरावतीवासियांचे अभिनंदन! विदर्भाच्या विकासात बहुमूल्य योगदान देणारे देशाचे पहिले कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांचे नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे
संघर्षाची गाथा नक्की वाचा....
सत्तेचा किती गैरवापर केलाय हे लक्षात येईल.
म्हणूनच घाबरून देवेंद्र फडणवीस अँड कंपनीने या पुस्तकावर बंदी घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाय...
#AnilDeshmukh 🔥🔥
हा महाराष्ट्र आहे की बिहार - इथं कायद्याचं राज्य आहे की माफियांचं...!
जालना जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर माफियांनी केलेल्या हल्ल्याची घटना आज माध्यमांमध्ये बघायला मिळाली. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही अशी भयावह परिस्थिती आहे.
आज यांची मजल एक राजपत्रित अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचलीय.या माफियांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे❓ राज्य शासनाने या घटनेची गांभीर���याने दखल घेतली पाहिजे आणि या माफीयांवर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे.
#LawAndOrder | #Womensday
पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात आज पहाटे झालेली बलात्काराची घटना प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे. पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्���काळात मी गृहमंत्री असताना बलात्काऱ्यांना फासावर चढवणारा शक्ती कायदा आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंजूर करून घेतला आहे. हा कायदा चार वर्षांपासून केंद्राकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. बलात्काऱ्यांना जरब बसण्यासाठी हा कायदा मंजूर करायला शासनाने तत्काळ केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे.
काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे सात महिन्यांपूर्वी आलेल्या बुरशीच्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जि.प सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शेतकऱ्यांनी केलेल्या जोरदार आंदोलनानंतर या नुकसानीचे पंचनामे झाले आणि अहवाल शासनाला दिला गेला. त्यानंतर अधिवेशनात देखील मी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर झाले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असूनही ही नुकसान भरपाईची रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यानंतर अतिवृष्टीमुळे संत्रा मोसंबीचे अतोनात नुकसान झाले. त्याचा अहवाल सुद्धा शासनाला सादर झाला आहे. या अहवालाला देखील मान्यता द्यावी आणि या दोन्���ीही नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तत्काळ देऊन मदतीचा हात द्यावा!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात जी (@bb_thorat) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
सोयाबीनला योग्य हमीभाव मिळावा आणि खरेदीची मुदत वाढवून द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला विनवणी केली, पण निगरगट्ट महायुती सरकारला बळीराजाचे दुःख कळलेच नाही. अखेर निराश मनाने शेतकऱ्यांना सोयाबीनची ४८९२ ऐवजी ३९०० रुपयांत विक्री करावी लागली. शेतकऱ्यांची व्यथा न जाणणारे निगरगट्ट महायुती सरकार काय कामाचे?
# निगरगट्ट महायुती सरकार
राज्यात सगळीकडेच सोयाबीन खरेदीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात 65 लाख मेट्रिक टनच्या आसपास सोयाबीनचे उत्पादन होते. आजवर सरकारकडून त्यापैकी 25% सोयाबीन सुद्धा खरेदी केले गेले नाही. सोयाबीन खरेदीला सरकारने लवकरात लवकर ३० मार्च पर्यंत मुदतवाढ दिली नाही तर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन नाफेडच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करू!
सत्तेच्या खेळात रमलेल्या महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.महागाई, म���िलांवरील अत्याचार,राज्याबाहेर चाललेले प्रकल्प यामुळे संतापलेल्या सामान्य माणसाच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या लढा माझ्या शेतकऱ्याचा या जनसंवादाला व्याहाड येथून सुरुवात!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांनी आज मुंबई येथे ज्येष्ठ उद्योगपती श्री. रतन टाटा जी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नरखेड तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांच्या अध्यक्षतेखाली सं��न्न झाला.
@AnilDeshmukhNCP
पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाटात मध्यरात्री घडलेल्या सामूहिक अत्याचाराची घटना प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे.
राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. निवडणुका तोंडावर असल्यामुळे सत्ताधारी फक्त आणि फक्त खुर्च्या वाचवण्यात धुंद आहेत. शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजी लाडक्या बहिणीच्या प्रमोशनचा एखादा कार्यक्रम कमी घ्या आणि केंद्राकडे प्रलंबित असलेला शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्या...!
#pune #पुणे
📌माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचा प्रशासनाला इशारा...!
काटोल नरखेडमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे शिबिर होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांचा दबाव!
दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर आंदोलन करणार आणि कोर्टात जाणार!
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. होळीच्या दिवशी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि आठ महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी, अशी सभा���ृहात मागणी केली.
आज अनेक दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात भेट दिली. सरचिटणीस शिवाजीराव गर्जे व मुंबईतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. मुंबई शह���ातील पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुका व संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाली.