आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात, आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा भारतीय कामगार सेनेच्या वतीने सन्मा. अध्यक्ष खासदार श्री. अरविंद सावंतजी आणि सन्मा. सरचिटणीस आमदार श्री. सचिन अहिरजी यांनी चाफ्याचा हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #ShivsenaUBT
कांदिवली येथील 'महिंद्रा आणि महिंद्रा' ट्रॅक्टर युनिटच्या भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत प्रामुख्याने कामगारांच्या रखडलेल्या वेतन करारावर आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री. अजित साळवी आणि सरचिटणीस श्री. दिलीप जाधव हे देखील उपस्थित होते.
- खासदार अरविंद सावंत
अध्यक्ष, भारतीय कामगार सेना
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र धर्माच्या सर्व लढ्यात कामगार नेहमीच अग्रणी राहिला; त्याला भुईसपाट करण्याचा डाव वज्रमुठीने मोडूया, हीच कामगार दिनी शपथ घेऊया!
#भारतीयकामगारसेना#महाराष्ट्रदिन#कामगारदिन#ShivsenaUBT
महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दाखवलीय, देशावरील संकटात धावून गेलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरती जर का अन्याय होत असेल तर
मराठी माणसाला महाराष्ट्रीयन म्हणून उभं राहावंच लागेल.
भारतीय कामगार सेनेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. स्वर्गीय शिवसेना नेते दत्ताजी साळवी ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भारतीय कामगार सेनेने लाखो कामगारांच्या आयुष्य घडवलं असून भविष्यातही तेच कार्य सुरु राहिल असा विश्वास उद्धवसाहेबांनी व्यक्त केला. ह्यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेते आमदार मनोज जामसुतकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.