माझे सहकारी मित्र, आमदार श्री अमितजी साटम यांची भाजपा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा.!
गौरीशंकराच्या कृपेने आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या जीवनात सदैव सुख, समृद्धी व समाधान नांदो, हीच प्रार्थना!
हरितालिका तृतीया निमित्त सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे सहकारी आमदार श्री. निलेशजी राणे, आमदार श्री. मिलिंदजी नार्वेकर, आमदार श्री. रईसजी शेख, आमदार श्री. सुभाष बापु देशमुख, आमदार श्री. भीमराव अण्णा तापकीर,आमदार श्री. उत्तमजी जानकर, आमदार श्री. हेमंतजी ओगले आमच्या राहू येथील निवासस्थानी
महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीतील माझ्या सहकारी आमदारांनी आमच्या राहू (ता. दौंड) येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला.
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'अशी सिंहगर्जना करणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
दौंड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत आलो असता, संसद भवन प्रांगणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे यांची भेट झाली.
पारगाव, ता. दौंड येथील श्री. प्रविण जयवंत ताकवणे यांच्या बरगडीची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे पार पडली, सुमारे २ लाख रुपयांची शस्त्रक्रिया व उपचार पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आपल्याला यश आले.
राज्याचे माजी मंत्री व आमदार मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
#RavindraChavan4BJP
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, राज्याचे जलसंपदा मंत्री मा. नामदार श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे महान स्वातंत्र्यसैनिक, प्रख्यात कायदेपंडित आणि प्रभावी वक्ते देशबंधू चित्तरंजन दास यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!