मी जर झाले तुझी वारकरी,
तू माझा विठ्ठल होशील का
या पंढरीच्या गर्दीतही
फक्त माझ्यासाठी थांबशील का
हात कटीवर ठेवून
माझ्या वाटेकडे पाहशील का
मी नाव तुझं घेताच
हसून "आलो" म्हणशील का
रुख्मिणीचं प्रेम नको मला,
फक्त तुझी साथ हवी.
जन्मभराच्या या वारीत
तूच माझा विठ्ठल व्हावं कधी.
आले आले गनिम खिंडीत चवताळूनी आले..
झाले झाले सज्ज मराठे सरसावूनी भाले..!
"दीन दीन.." शब्दा "हर हर महादेव.." भिडला..!
अन् भिडला ओष्ठी दंत, मस्तकी खड्ग, वक्षी भाला..!!
#OperationMahadev