जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी तसेच जुलमी ब्रिटिश सत्ता आणि शोषणाविरुद्ध लढा पुकारणारे, महान क्रांतिकारक 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
जय जोहार! जय आदिवासी!
गोंदिया-भंडारा येथे शिवसैनिक प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षवाढ आणि संघटन मजबूत करण्यासाठी हा प्रवेश सोहळा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.
📍 #मुंबई |
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यात #अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाखळे, दर्यापूर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दिलीप चव्हाण, गजानन जाधव, प्रभाकर कोरपे, राजू कराळे, गजानन देवताळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर यांच्यासह अमरावती आणि दर्यापूर येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी मंत्री संजय राठोड, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Amravati #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc@RealBacchuKadu@SanjayDRathods
📍 #मुंबई |
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यात #अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाखळे, दर्यापूर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दिलीप चव्हाण, गजानन जाधव, प्रभाकर कोरपे, राजू कराळे, गजानन देवताळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर यांच्यासह अमरावती आणि दर्यापूर येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी मंत्री संजय राठोड, आमदार बच्चू कडू, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #maharashtra #Shivsenapakshapravesh
अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सुधाकर पाटील भारसाखळे यांनी आज मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या समवेत सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही शिवसेनेत प्रवेश केला. अमरावती जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवणारा आणि संघटन विस्ताराला नवी ऊर्जा देणारा हा प्रवेश आगामी काळात निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आज अमरावती येथे शिवसेना विभागीय आढावा बैठक संपन्न झाली. आगामी काळात “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी तसेच शिवसेना पक्ष विस्तार यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस अमरावती संपर्कप्रमुख आ. किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आज रविभवन, नागपूर येथे शिवसेना पक्षाची पूर्व विदर्भ विभागीय बैठक उत्साहात पार पडली. पूर्व विदर्भात पक्ष विस्तारासाठी “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हा व्यापक कार्यक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहे.
या बैठकीस आ. कृपाल तुमाने, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. मनिषाताई कायंदे , मा. आ. चंद्रिकापुरे, शिवसेना संघटक किरण पांडव तसेच प्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई येथील आय.एम.सी. हॅाल, चर्चगेट येथे शिवसेना पश्चिम विदर्भ संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आगामी निवडणूक, पक्षविस्तारासाठी गाव तेथे शाखा, शेतकरी संवेदना यात्रा ई. विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
आज कोकण, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील प्रहार दिव्यांग क्रांती आणि प्रहार संघटनेची संयुक्त बैठक पार पडली.
यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेतल्या दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी सुरू असलेली लढाई आता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मा.आमदार श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
#shivsena #eknathshinde #Shivsenaofficial #bachchukadu #maharashtra
यवतमाळ येथे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
विदर्भातील शिवसेना विस्तार, पक्ष बांधणी आणि आगामी संघटनात्मक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे धैर्यवान योद्धे, ज्ञान, शौर्य आणि पराक्रमाचा तेजस्वी इतिहास असलेले छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼