आज नागपूर येथील निवासस्थानी ॲड. पारिजात पांडे यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळवत सदस्य म्हणून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल ॲड. पारिजात पांडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत, वकिलांच्या हितसंरक्षणासह न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra
'एबीपी माझा'चे विदर्भ प्रमुख श्री. रजत वशिष्ठ यांचे वडील स्व. श्री. सुरेशचंद्र वशिष्ठ यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली व दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्व. सुरेशचंद्र वशिष्ठ हे पाटबंधारे विभागातून कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले होते. ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि पंचांगकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात विशेष ओळख होती. मूळ गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या स्व. वशिष्ठ यांचा गोंदिया, भंडारा तसेच विदर्भातील अनेक भागांशी घनिष्ठ जनसंपर्क होता.
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती लाभो आणि वशिष्ठ परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना..!!🙏
#DrParinayFuke #BJP4Maharashtra
आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित राहून नागपूर शहराच्या सुरक्षितता आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत महत्त्वाचे विषय उपस्थित केले.
बैठकीत नागपूर शहराच्या सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करणे, पर्यायी मार्गांची प्रभावी व्यवस्था करणे आणि वाहतूक नियोजन अधिक सक्षम करण्याची मागणी केली.
तसेच, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक परिसर आणि गुन्हेगारी प्रवण भागांमध्ये उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे बसवून त्यांचे नियमित निरीक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
याशिवाय, शहरात वाढत चाललेल्या एमडी, गांजा व इतर अमली पदार्थांच्या अवैध विक्री व सेवनावर कठोर कारवाई, विशेष धडक मोहीम राबविणे, शाळा-महाविद्यालय परिसरात नियमित तपासणी करणे आणि पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी राज्यमंत्री मा. श्री. आशिषजी जयस्वाल, आमदार श्री. मोहनजी मते, श्री. संजयजी भेंडे, श्री. समीरजी मेघे, श्री. प्रवीणजी दटके, डॉ. आशिषजी देशमुख, श्री. चरणसिंगजी ठाकूर, श्री. अभिजीतजी वंजारी, श्री. विकासजी ठाकरे, श्री. नितीनजी राऊत, श्री. संजयजी मेश्राम, डॉ. राजीवजी पोतदार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#DrParinayFuke #BJP4MahRashtra #BJP4ViksitBharat
नागपूर येथील सुप्रसिद्ध 'रोकडे ज्वेलर्स'चे संचालक तथा 'जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल'चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेशजी रोकडे यांचे सुपुत्र चि. पारस आणि चि.सौ.का. जान्हवी यांच्या साखरपुडा समारंभास नागपूर येथे उपस्थित राहिलो.
या मंगल प्रसंगी उभयतांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra
नागपूर येथील श्री. भार्गव दरेकर व सौ. श्रुती दरेकर यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहून बाळाला भरभरून आशीर्वाद दिले. तसेच संपूर्ण दरेकर व कान्हेरे परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#DrParinayFuke#BJP4Maharashtra#BJP4ViksitBharat
नागपूर येथे सोनी परिवाराच्या नव्या वास्तूच्या गृहप्रवेशानिमित्त आयोजित सुंदरकांड पठण व मंगलमय धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून दैनिक भास्कर वृत्तपत्राचे संपादक श्री. मणिकांतजी सोनी व संपूर्ण सोनी परिवारास शुभेच्छा दिल्या. नव्या वास्तूमध्ये आनंद, ऐश्वर्य आणि मंगलमय वातावरण सदैव नांदो, हीच सदिच्छा.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
नागपूरच्या नारा-नारी जरीपटका मंडळात आयोजित विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) बैठकीस उपस्थित राहून मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी SIR अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शहर महामंत्री श्री. संदीप जाधव, मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, नगरसेवक विकी कुकरेजा, नगरसेविका सुषमा चौधरी, नगरसेवक महेंद्र धनविजय, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, राजेश बटवानी, मनीष दासवानी आणि गणेश कानतोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SIR
आज नागपूरच्या विनोबा भावे कळमना मंडळात विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) संदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित राहिलो.
बैठकीत मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, बूथनिहाय नियोजन, मतदार पडताळणी आणि प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शहर महामंत्री संदीपजी जाधव, मंडळ अध्यक्ष शेषराव गोतमारे, SIR प्रमुख गणेश कानतोडे, महामंत्री उमेश बुटे, नगरसेविका निरंजनाताई पाटील, महामंत्री बसूराज उमाटे, आशिष कुंभारे, निशांतजी गांधी, ओम ईश्वरकर, विजय सोमकुवर, सुनिताताई इंगोले, सुनीताताई नेवारे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SIR
लोकशाहीची पायाभरणी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आज उत्तर नागपूरच्या वैशाली नगर येथे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) संदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित राहून संवाद साधला.
यावेळी मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, या प्रक्रियेचे महत्त्व, मतदार नोंदणीतील अचूकता तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने पार पाडायची जबाबदारी याविषयी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी शहर महामंत्री श्री. संदीप जाधव, SIR प्रमुख श्री. गणेश कानतोडे, मंडळ अध्यक्ष श्री. अमित पांडे, श्री. संजय तरारे, श्री. शिवनाथजी पांडे, श्री. अरुण पाल अरोरा, श्री. ओमप्रकाशजी इंगळे, सौ. राखीताई मानवटकर, सौ. मोहिनी रामटेके तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SIR
वाडी नगर परिषद क्षेत्रातील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळत असल्याने या गंभीर पर्यावरणीय प्रश्नाच्या अनुषंगाने आज सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारणी व संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद (IAS), वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विनोदजी जाधव, नगरसेवक योगी पाचपोर संबंधित कंत्राटदार, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अंबाझरी तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासह नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांना गती देऊन लवकरात लवकर प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
#AmbazariLake #STP #WadiNagarParishad #Nagpur #Environment #CleanWater #Development #DrParinayFuke #BJP4Maharashtra