आज लक्षात येतंय की MPSC ने 2nd Answer Key मध्ये योग्य reference देऊनही आधीचीच उत्तरं का कायम ठेवली.
जर प्रश्न-उत्तर आधीच काही उमेदवारांना पैसे घेऊन द���ले असतील, तर उत्तरं बदलणार तरी कशी?
मुख्य परीक्षेत हा प्रकार जास्त दिसतो पैसे घेतलेला उमेदवार list मधे आलाच पाहिजे !
#mpsc
नेहा राठोड = BJP वाले मला मागच्या 5 वर्षांपासून शिव्या देत आहेत. पण मी काही सुधारणार नाही.
राहुल गांधी = ते पण मला इतक्या वर्षांपासून शिव्या देत आलेत. मीही नाही सुधरलो 😂🔥👊
बंडखोरी आणि पक्षांतराचा "तमिळनाडू पॅटर्न" महाराष्ट्रात का दिसत
नाही?
तमिळनाडूमध्ये एक वेगळं राजकीय चित्र पाहायला मिळत आहे.
विरोधी पक्षातील AIADMK चे विद्यमान आमदार मुख्यमंत्री विजय
यांच्या TVK पक्षात प्रवेश करत आहेत. पण या पक्षांतरासोबत एक
महत्त्वाची गोष्ट घडते आहे—ते आधी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा
राजीनामा ��ेत आहेत आणि त्यानंतरच नव्या पक्षात प्रवेश करत आहेत.
हा प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
कारण जनतेने त्यांना ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलं, त्या
जनादेशाचा सन्मान म्हणून ते आधी आमदारकीचा त्याग करत आहेत.
त्यानंतर नव्या पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहेत. म्हणजेच, "माझ्या
राजकीय भूमिकेत बदल झाला आहे, आता नव्याने जनतेचा कौल
घेईन," असा संदेश त्यातून दिला जातो.
याच्या उल�� महाराष्ट्रात अनेकदा वेगळं चित्र दिसतं.
आमदार आधी पक्ष बदलतात, सत्तेत ��हभागी होतात, मंत्रीपदाची
शपथ घेतात आणि नंतर कायदेशीर प्रक्रिया, अपात्रतेचे वाद,
न्यायालयीन लढाया आणि राजकीय गणिते सुरू होतात. जनतेने दिलेला
कौल नेमका कोणासाठी होता, हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरित राहतो.
लोकशाहीत पक्ष बदलणे हा प्रत्येक लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे.
मतभेद होऊ शकतात, विचार बदलू शकतात, नवीन राजकीय दिशा
स्वीकारण्याचाही अधिकार आहे. पण त्याचवेळी जनादेशाचाही सन्मान
झाला ���ाहिजे.
जर एखाद्या आमदाराला वाटत असेल की तो आता मूळ पक्षाच्या
विचारांशी सहमत नाही, तर सर्वात नैतिक मार्ग म्हणजे आधी
आमदारकीचा राजीनामा देणे, नंतर नव्या पक्षात प्रवेश करणे आणि
पुन्हा जनतेसमोर जाऊन मत मागणे.
यामुळे लोकशाही अधिक पारदर्शक होते, मतदारांचा विश्वास टिकतो
आणि "जनादेश" ही केवळ निवडणुकीतील घोषणा न राहता प्रत्यक्षात
जपली जात��.
महाराष्ट्रातही असा राजकीय पायंडा पडू शकतो का?
हा प्रश्न कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही. आज सत्ता कोणाची
आहे किंवा उद्या कोणाची असेल यापेक्षा लोकशाहीची मूल्ये अधिक
मोठी आहेत. सत्तेसाठी पक्षांतर करायचंच असेल, तर ते जनतेच्या
विश्वासाला धक्का न लावता, राजीनामा देऊन आणि पुन्हा निवडणूक
लढवून करण्याची राजकीय संस्कृती निर्माण होणे हीच खरी
लोकशाहीची ताकद ठरेल.
जनतेने निवडून दिलेला जनादेश हा व्यक्तीचा नसतो; तो त्या व्यक्तीने
स्वीकारलेल्या विचारांचा, पक्षाचा आणि जनतेशी केलेल्या वचनांचा
असतो. त्याचा सन्मान राखणे हीच खरी लोकशाहीची कसोटी आहे.
हा गुंडा आहे...
तुरूगवास भोगला पन तत्वाशी तडजोड नाही केली. लोक म्हणतात
ह्याने शिवसेना संपव��ली , खरतर या माणसानेच खरी शिवसेना टिकवून
ठेवली सत्ता म्हणजे शिवसेना न्हवतीच कधी. ज्याची सुरवात शुन्या
पासून होते त्याला गमविण्याची भिती नसते.
हा माणुस बाळासाहेबा मुळे घडला.तसे अनेक बाळासाहेबांमुळे
घडले.पन ते सारेच्या सारे बाळासाहेबांच्या तत्वाला तिलांजली देवून
सत्तेची चाटायला गेले...
बाळासाहेब नेहमी म्हणायचे "राहिले ते मावळे गेले ते कावळे"
खर तर हे कावळ्यापेक्षाही नतद्रष्टे आहेत. कावळे पिंडाला शिवायला
तरी पाहिजे परंतू विनाकारण आपल्या गांडीखालचा अंधार
लपविन्यासाठी हे सारेच्या सारे गांडीला पाय लाव���न पळाले.
परंतू हा माणुस आपली वैचारीक धार शाब्दीक बाणाने सतत
विरोधकांवर सोबतच जेजे गद्दारी करुन सोडून गेले त्यांच्यावर चालवत
गेला...
आज शिवसेना कशी आहे तो पक्ष कसा आहे उद्धव ठाकरे टिकवतील
की नाही पक्ष ? त्याच्या सोबत कुणी राहिल की नाही ? तो पक्ष आता
संपला का ? की संपन्यात जमा आहे ? या आणि अशा प्रश्नांना
कवडीचीही किंमत राजकारणात नसते...
राजकारणात आज रोजी निष्टेलाही कवडीची किंमत्त राहिली नाही.
परंतू ह्या माणसाचा इतिहास इथला प्रत्येक माणुस छातीठोक पने
आपल्या येनार्या पिढ्यांना सांगेल...
हा माणुस तुकारामाच्या अभंगातला गुंडा आहे
आणि तो गुंडा आम्हाला आवडतो...!
हा गुंडा सर्वाला आवडला पाहिजे
असे गुंड तुमच्या आमच्या पोटी जन्माला यायला पाहिजे!
निष्ठावान गुंडा आवडतो का तुम्हाला...?
- विजय ढाले (FB Post)
@rautsanjay61 साहेब 🙏
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर��व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकार�� नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र