मा. राहुल गांधी यांनी लोकसभेत आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. जातीनिहाय जनगणना ही आमची मागणी आहे. मात्र जातीजातींमध्ये वाद निर्माण करून महायुती त्यावर राजकीय पोळी भाजू पाहतंय. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही राज्यातील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, आमचं हे वचन आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या २३ अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे.
चला लढूया
महाराष्ट्र घडवूया!
shtwt who is ur favorite artist/band and you cant say mitski, marina, melanie martinez, TV girl, the neighborhood, alex g, mother mother, weezer, the front bottoms, tyler the creator, grimes, billie ellish, bôa, jazmin bean, rebzyyx, kikou, ado, maretu, cave town, 1/2
कोणत्याही अमिषाला बळी न पडता कायम पक्षासोबत असलेल्या राशीनमधील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या घरी सौ. कुंतीने सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्वांनीच आणि विशेषतः महिला भगिनींनी आदरातिथ्य केलं, ओटी भरली आणि सोबत असल्याची ग्वाही दिली..
विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार, विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार श्री. सुनील केदार, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, प्रदेश प्रवक्ते श्री. अतुल लोंढे आदी नेते उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष सोबत असण्याची आवश्यकता लक्षात घेता किशोर कन्हेरे यांचा काँग्रेस प्रवेश महत्त्वपूर्ण आहे. माळी समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत माळी समाजाला न्याय देण्यातबाबत कन्हेरे यांना आश्वस्थ केले.
माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे नेते कपिल पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
कोणत्याही अटी शर्तीशिवाय कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत असून देशभरात पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. पक्षनेतृत्त्व सांगेल त्या पद्धतीने काम करणार असल्याचे आश्वासन यावेळी कपिल पाटील यांनी दिले.
महाराष्ट्राचे प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला, विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार, विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार श्री. सुनील केदार, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री श्री. सतेज पाटील, प्रदेश प्रवक्ते श्री. अतुल लोंढे आदी नेते यावेळी उपस्थित होते.
पोलीस स्मृतीदिनानिमित्त शौर्य आणि समर्पणाची जाणीव करून देणाऱ्या सर्व पोलीस वीरांना मानाचा सलाम !
कर्तव्यावर असताना जीवन समर्पित केलेल्या शूरवीरांना आदरपूर्वक श्रद्धांजली !
#PoliceCommemorationDay | #पोलीसस्मृतीदिन |