डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
असंख्य विद्यार्थी व नागरिकांसाठी, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि समाजसेवेचा अमूल्य वारसा सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत.
बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली.
आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील.
आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. श्री. पार्थ अजितदादा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. देशाचे उपराष्ट्रपती मा.श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली.
जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करते. लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून ते संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, अशी खात्री आहे.
त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
@parthajitpawar
महिला ही समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. तिच्या धैर्य, संयम, निर्धार आणि परिश्रमांमुळे घर, गाव आणि राष्ट्र उभे राहते. स्वतः सक्षम होत इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जागतिक_महिला_दिन#InternationalWomensDay
दादा,
आपल्या नसण्याची जाणीव पदोपदी अन् क्षणोक्षणी जाणवते. आपल्या नसण्याची उणीव मन सुन्न करते अन् विचार कुंठित करते.
आपल्या जाण्यास एक महिना झाला, विश्वास बसत नाही. मी अजूनही नि:शब्द आहे. पुढे काय लिहावे समजत-उमजत नाही.
जय दादा 29 फेब्रुवारी तुमचं जन्मदिन असतो पण ह्या कठीण प्रसंगात तुम्हाला लढण्याची शक्ती मिळो हीच देवा चरणी प्रार्थना जयदादा आपण अजित दादांचे स्वप्न आणि जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण कराल ही खात्री आहे आपल्या ला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा@Jaypawarspeaks
Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील.❤️