लिहिते कधी कधी.. मनात साचलेलं, प्रचंड भावलेलं, येता जाता दिसलेलं, नव्याने गवसलेलं, कुठेतरी वाचलेलं हरवलेलं, जोपासलेलं, टोचलेलं, ऐकलेलं, सुचलेलं, कधी कधी लिहिते.
जेव्हा माझ्या तोडक्या मोडक्या कवितेला दाद देतात ..."आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दिव्यदृष्टी" असं मनोमन म्हणत.. बालगंधर्वाच्या स्टेज वरून रसिकांना माझ्या कवितेसाठी टाळ्या वाजवताना डोळे भरून बघणारी मी....
प्रियांका अच्युत तेंडोलकर.
८/८
जेव्हा वैभव जोशी संदीप खरे यांच्या शेजारी बसून स्वतःचीच एक नुकतीच रांगायला लागलेल्या कवितांपैकी एक कविता पुण्यातील रसिकांना ऐकवते आणि शेकडो रसिक प्रेक्षक आणि शेजारी बसलेले दोघं (ज्यांच्या आयुष्याचा शेला भगवंतांनी विणला आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे)
७/८👇
आता निश्चल राहणं फार कठीण झालंय...अंतरंगात दडलेले शेकडो शब्दसागरही उसळुदेत ना तुझ्या अस्तित्वाने...एवढ्या प्रचंड समुद्राच्या लाटा तुझ्या तालावर नाचवतोस ना मग भावनांच्या भरती ओहोटीची जबाबदारीही घेऊच शकतोस तू. नाही का?
पुस्तकातील प्रत्येक शब्द जरी लेखकाचा असला तरी त्याच्याच पुस्तकाच्या प्रत्येक प्रातीला त्या लेखकाचा स्पर्श कुठे होतो? ...पण मला अशी प्रत मिळाली आहे...❤️❤️❤️
#luckyme
बरं एवढ्या गडबडीत प्रियंका की प्रियांका ते विचारून लिहिलं त्यांनी दुसऱ्याच्या मनाचा एवढा विचार कोण करतं?
मनात उठलेली असंख्य वादळे, केवळ तुझे बासरीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर ऐकून क्षमली आहेत...
असाच रहा समोर, एक आशेचा किरण बनून.
कदाचित तुझ्या मुखकमलाचे तेज या पामराच्या डोळ्यांना सहन व्हायचे नाही, म्हणून पाठमोराच रहा.
१/३ 👇
तसही कुठेही असलास, कोणत्याही स्वरूपात असलास तरी तुझ्या भक्ताकडे तुझे लक्ष असतेच म्हणा. आता फक्त तुझ्या प्रत्येक पाऊलखुणेवर मस्तक ठेऊन, तुझ्यात विलीन होण्यासाठीचा एक दिव्य प्रवास सुरू आहे.
२/३👇
बुनती है आंखें सुहाने से सपने
संजोती है पलकों पे जी भर के अपने
पलके वो भारी सी मन को सुझाती
निराशा के चादर को धीरे हटाती
जगा जैसे तन में सुनहरा सवेरा
अधमुंदी आंखों में सूरज हो ठहरा
_प्रियांका अच्युत तेंडोलकर
#shorttales#ignited#dream#WritingCommunity#writing
जिथवर पोहोचण्यासाठी या साऱ्या लाटांचा सामना करावा लागेल!
मग क्वचितच एखादा पाहू शकतो तुझं ते रूप, जे कितीतरी निराळं आहे.
म्हटलं ना मी.तू अगदी माझ्या सारखाच
पण तुलाही असा प्रश्न पडतो का रे?? की त्यातला ' खरा तू ' नेमका कोणता?
#thalasofile#sealover#writing#fromheart#Marathi
तुला पाहताना नेहमी आरश्यात पाहतेय असंच वाटतं अरे...
!तूही अथांग... अगदी माझ्या सारखाच...!!!
किनाऱ्यावर... जिथे संपर्क येतो माणसांशी.. तिथे अवखळ, खेळकर, सदा बागडणारा...
अन् अंतरंगात मात्र धीरगंभीर, विचारी...