जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची आज जयंती. त्यांनी अनिष्ट प्रथा आणि रूढी परंपरांना विरोध करून सामाजिक समतेची बीजे रोवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला होता. यानिमित्ताने त्यांच्या स्��ृतींना विनम्र अभिवादन!
#tukarammaharaj
स्वातंत्र्य आणि समतेसाठी क्रांतीमार्गाची वाट स्वीकारुन आझाद हिंद फौजेची स्थापना करणारे थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Attended the meeting of the Joint Parliamentary Committee on the Constitution (One Hundred and Twenty-Ninth Amendment) Bill, 2024 and the Union Territories Laws (Amendment) Bill, 2024 held today in New Delhi.
स्वकर्तृत्वावर 'राजकीय व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख' असा अचाट प्रवास करणारे आणि सर्वसामान्यांमधून नेते घडविणारे किमयागार, वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आज १०० वी जयंती. मराठी अस्मितेचे पुरस्कर्ते, प्रतिभावान कलावंत, प्रबोधनकार सुपुत्र, मनस्वी नेता अशा वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनानिम��त्त विनम्र अभिवादन !
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं॥ १॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
शब्द वाटू धन जनलोका॥२॥
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव।
शब्दचि गौरव पूजा करु॥३॥
- संत तुकाराम महाराज
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांना जयंती नि���ित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रवादीची एकजूट आणि महाआघाडीची वज्रमूठ; बालेकिल्ला राखण्यासाठी जुन्नरमध्ये विजयाचा निर्धार!
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित ‘जाहीर मेळावा’ उत्साहात पार पडला. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जुन्नरच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादी विचारप्रवाह एकाच ध्येयाने एकत्रितपणे सामोरे जात आहेत.
या ताकदीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आर.पी.आय. (आठवले गट) या मित्रपक्षांची खंबीर साथ लाभल्यामुळे महाआघाडीची ही वज्रमूठ आता अधिकच अभेद्य झाली आहे.
आता वेळ आली आहे घड्याळाचा गजर करून आणि मशालीच्या प्रकाशात जुन्���रचा सर्वांगीण कायापालट करण्याची. हा बालेकिल्ला राखण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो असून विजयाचा संकल्प निश्चित केला आहे.
@NCPspeaks
@AjitPawarSpeaks
@supriya_sule
#Junnar #ZillaParishad2026 #PanchayatSamiti
#ncp #ubt #rpi #SharadPawar #ajitpawar #UddhavThackeray #DrAmolKolhe
स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.
आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जात���त, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्द�� ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र ��्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा.
बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार ��ाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे.
राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.
बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे 'बाळासाहेब' आणि 'मराठी' या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही.
स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाच्या न्याय, हक्कांसाठी त्यांनी कायम लढा दिला. जयंतीच्या निमित्ताने या लोकनेत्यास आदरांजली व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
#balasahebthakrey
दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आझाद हिंद फौज'ची स्थापना केली. नेताजींनी या माध्यमातून दिलेले नारे आणि केलेले कार्य प्रत्येक भारतीयामध्ये स्फुल्लिंग चेतवणारे ठरले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अनेकांना प्रेरित करणारे व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्रहिताश�� कधीही तडजोड केली नाही. शब्दांची निवड करताना त्यांनी कधी मा��ेपुढे पाहिलं नाही. विविध विषयांवर संघर्ष जरी झाला तरी, आपली भूमिका कधी त्यांनी लपवून ठेवली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. राजकारणात विरोध असू शकतो, पण वैयक्तिक कटुता नसावी; हा संस्कार घालून देणारे रोखठोक व मार्मिक भाष्यकार, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती... राजकारणापलिकडेही त्यांनी स्नेहबंध जपले. तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली. त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला. अशा या बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी असणाऱ्या लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे
दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी ��क अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
देशाला आणि महाराष्ट्राला समृद्धीच्या आणि संपन्नतेच्या मार्गावर नेणारे, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचावा यासाठी तळमळीने कार्य करणारे लोकनेते, मार्ग���र्शक, आधारस्तंभ माननीय श��दचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! साहेब आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
@PawarSpeaks
@NCPspeaks
देशाचे नेते व आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!
महाराष्ट्राच��� मानबिंदू आणि आद्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणारे #शरदचंद्रजी पवार साहेब यांचे केवळ राजकीयच नाही तर देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी जडणघडणीत ही मोलाचे योगदान आहे.
साहेब, आपण शतायुषी व्हावे, याच सदिच्छा ..!
#pawarsaheb @PawarSpeaks @NCPspeaks
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या निधनाची वा��्ता अत्यंत दुःखददायी आहे. राजकारणात असूनही आपली मूल्ये आणि शालिनता जपणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी चाकूरकर साहेबांचे नाव हे कायम अग्रस्थानी राहील.
लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशा अनेक उच्च पदांवर काम करीत असताना चाकूरकर साहेबांनी लातूर आणि मराठवाड्याच्या विकासासाठी जे अभ्यासपूर्ण कार्य केले, ते अविस्मरणीय आहे.
#ShivrajPatilChakurkar #omshanti
लोकनेते विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्यामधील नातं हे सलोखा,स्नेह आणि परस्पर आदर यांवर उभं होतं.
नेतृत्व,दूरदृष्टी, जनसामान्यां विषयीची बांधिलकी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर अखंडपणे केलेल्या कार्याचा उल्लेख करत व���लासराव देशमुख साहेबांनी पवार साहेबां बद्दल व्यक्त केलेला स्नेहाचा स्वर आजही तितकाच भावतो.
आदरणीय शरद पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.
.
.
#sharadpawar #happybirthday #vilasraodeshmukh
.
.
@PawarSpeaks @supriya_sule @NCPspeaks