कुणालाही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू AC, Frige, geyser, TV, Laptop, Washing m/c, Etc घ्यायचे असल्यास DM करा ऑनलाईन (Amazon/Flip cart ) दरापेक्षा 10% च्या आसपास सूट वर वस्तू खात्रीशीर उपलब्ध करून दिली जाईल 🙏
ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय.ही आनंदाची बातमी आहे.आमचं तारुण्य आणि त्याच्या आठवणी चिरतरुण ठेवणाऱ्या या "अफलातून" नायकास हा पुरस्कार देताना या सरकारने कोणतीही "बनवाबनवी" केली नाही,याचा आनंदच आहे.आता मोठ्या "धूमधडाक्यात" त्यांना हा पुरस्कार प्रदान व्हावा,या सदिच्छा..!
महात्मा गांधीजींच्या खुनाबाबत संशय निर्माण करणारे पुस्तक आज दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून, "महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे याने केलीच नाही" , असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर या पुस्तकात जे काही लिहिलय, त्याकडे पाहिल्यास पुस्तक लिहिणाऱ्या रणजित सावरकर मानसिक संतुलन ढळले आहे, हेच स्पष्ट दिसून येत आहे. खून झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते; खुनाचा योग्य तपास झाला अन् योग्य सुनावणी झाली. त्यानंतर नथुरामला फाशीची शिक्षा सुनावून त्याला फासावर चढवण्यात आले.
नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आणि काळा डाग आहे. तो डाग आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही मंडळी आता पुढे येत आहेत. दुर्देवं हेच आहे की, हे पुस्तक मराठी माणसानेच लिहिलेले आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. महाराष्ट्राने आता तरी जाग व्हावे आणि या नथुरामी प्रवृत्तीला ठेचून काढावे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.