महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयक रुग्ण हक्कांचा बळी देणारे, दरपत्रक लावल्याने रुग्ण हक्क कसे जपणार?
राजेंद्र पातोडे
महाराष्ट्र सरकारने आणलेले ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्सनोंदणी व नियमन विधेयक, २०२६’ हे रुग्णांच्या हितासाठी नसून खासगी हॉस्पिटल्सच्या नफेखोरीला मोकळे रान देणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांद्वारे स्पष्टपणे बजावले आहे की, 'घटनेच्या कलम २१ नुसार मिळणारा जगण्याचा अधिकार म्हणजे वेळेत, रास्त आणि सन्मानजनक वैद्यकीय उपचार मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.' तसेच, पैसे भरले नाहीत म्हणून मृतदेह रोखून धरणे किंवा रुग्णाला ओलीस ठेवणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, महायुती सरकारने या विधेयकातून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, रुग्णांचे मूलभूत हक्क आणि तक्रार निवारण यंत्रणाच धाब्यावर बसवली आहे. रुग्णांच्या आरोग्याचा हक्क हिरावून घेणारा हा नवा कायदा म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर उपसण्याचाच प्रकार आहे.नुसते दरपत्रक लावल्याने रुग्ण हक्क कसे जपणार ह्याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी घेतली आहे.
या विधेयकात रुग्णांच्या विरोधात जाणारे आणि खासगी हॉस्पिटल्सचे भले करणारे अनेक गंभीर दोष आहेत. पूर्ववत लागू असलेल्या महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन नियमावली २०२१ मध्ये रुग्णांना दिलेले अनेक महत्त्वाचे हक्क नव्या मसुद्यात थेट वगळण्यात आले आहेत.यात बिल न भरल्यास रुग्णाला किंवा मृतदेहाला रोखून ठेवण्याविरोधातील स्पष्ट संरक्षण काढण्यात आले आहे.तसेच रुग्णांच्या तक्रारींचे २४ तासांत निवारण करणारी जिल्हास्तरीय व स्थानिक तक्रार निवारण यंत्रणा आणि टोल-फ्री हेल्पलाइन रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. उपचाराच्या खर्चावर, अवाजवी बिलांवर किंवा औषध-वैद्यकीय साहित्यातील नफेखोरीवर कोणतीही मर्यादा यात घातलेली नाही.अनिवार्य मानके व प्रमाणित उपचार पद्धती बंधनकारक न केल्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट आणि अनावश्यक चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडी या जनविरोधी आणि रुग्णविरोधी विधेयकाचा तीव्र निषेध करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून या विधेयकात त्वरित सुधारणा करण्यात याव्यात; उपचारांच्या दरांवर मर्यादा घालावी, स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी आणि राष्ट्रीय रुग्ण हक्क सनदेतील सर्व हक्क समाविष्ट करावेत. जर सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा खेळ मांडणारा हा कायदा असाच लादण्याचा प्रयत्न केला, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून रुग्णांच्या हक्कासाठी आंदोलन करणार असल्याचे देखील वंचितने जाहीर केले आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
@CMOMaharashtra@maha_governor
#महाराष्ट्रक्लिनिकलएस्टॅब्लिशमेंट्सविधेयक
दुष्काळ निवारण म्हणजे निवडणुकीचे घोषणापत्र नाही.५ हजार रुपये देऊन ३०५ तालुक्यांचे प्रश्न सुटत नाहीत. मराठवाड्याचे भूजल खालावले, हे जलसंधारण योजनांच्या अपयशाचे निदर्शक आहे. सरकारने जाहीर करावे की किती निधी, कोणत्या विभागाकडून, कधी आणि कोणत्या अटींवर दिला जाणार ह्याचे उत्तर नसेल, तर या घोषणा म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा आहे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
'गाव तिथे शाखा, शाखा तिथे संघटन'; पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – सुजात आंबेडकर
औरंगाबादमध्ये शेकडो युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा निर्धार
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीची ध्येयधोरणे, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची ताकद, अन्याय-अत्याचारांविरोधात उभारलेली आंदोलने आणि समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याची व्यापक भूमिका यामुळे प्रभावित होऊन बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) औरंगाबाद येथे शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केले होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी युवकांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीची वैचारिक भूमिका, पक्षसंघटन मजबूत करण्याची गरज आणि अन्यायाविरोधात लढण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी अधोरेखित केली.
"आपण फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचे प्रतिनिधित्व करतो. आपण बाळासाहेब आंबेडकरांचे सैनिक आणि प्रतिनिधी आहोत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिपाई म्हणून काम करतो. ही जबाबदारी समजून घेऊन पक्षात प्रवेश केलेल्या युवकांनी ती आपल्या खांद्यावर घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि प्रतिनिधी म्हणून जिथे जिथे अन्याय-अत्याचार होतील, तिथे आवाज उठवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून सुजात आंबेडकर म्हणाले की, पक्षाने आणि बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली पाहिजे. तळागाळातील लोकांना पक्षाची भूमिका समजावून सांगणे, गावागावांत संघटन उभे करणे आणि पक्षबांधणी करणे, ही युवकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात शाखा स्थापन करावी, तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथवर) दहा जणांची कमिटी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश सुजात आंबेडकर यांनी दिले. "गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे संघटन" या पद्धतीने काम करून वंचित बहुजन आघाडी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी हा इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, हा पक्ष केवळ नेत्यांना सत्तेत पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्या पाठराखणीसाठी स्थापन झालेला नाही. ज्या वंचित समूहातील लोकांपर्यंत आजवर सत्तेच्या संधी पोहोचल्या नाहीत, अशा लोकांना ताकद देऊन सत्तेत सहभागी करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी ही तळागाळातील कार्यकर्त्यांना संरक्षण देणारी आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी संघटना आहे, असे सांगत सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा मांडला.
इतर पक्षांमध्ये एखाद्या नेत्यावर टीका झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलने केली जातात; मात्र वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्याला प्राधान्य दिले जाते, असे त्यांनी नमूद केले.
"वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास झाला किंवा त्याच्यावर अत्याचार झाला, तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची आणि चक्का जाम करण्याची ताकद पक्षात आहे," असा ठाम इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला.
#SujatAmbedkar #VanchitBahujanAghadi #VBA #Aurangabad #PartyJoining #YouthLeadership #YouthEmpowerment #PartyBuilding #AmbedkariteMovement #PhuleShahuAmbedkar #SocialJustice
📍औरंगाबाद
"भव्य पक्षप्रवेश सोहळा"
आपण फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचे प्रतिनिधित्व करतो. आपण बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिपाई म्हणून काम करतो.
हे समजून घेऊन, ज्या युवकांनी पक्षप्रवेश केला आहे, त्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
📍औरंगाबाद
"भव्य पक्षप्रवेश सोहळा"
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात शाखा आणि बुध बांधणी करावी. त्या बुथमध्ये 10 लोकांची कमिटी करणे हे आपले टार्गेट असेल पाहिजे.
गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे संघटन या पद्धतीने काम करून तळागळात पक्ष वाढवायचा आहे.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
आजचा दिवस म्हणजे इतिहासाचा सुवर्णक्षण!
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात केली.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा फक्त धर्मांतराचा दिवस नाही, तर तो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा मूलाधार आहे.
या पवित्र दिनी आपण बाबासाहेबांना अभिवादन करूया, त्यांच्या विचारांना आचरणात आणूया, आणि समाजात करुणा, समता आणि बंधुत्वाचा विचार पोचवूया...सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!
आज येवला मुक्तीभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या येवला मुक्तीभूमीमध्ये धर्मांतराची भूमिका घेतली, ह्या व्यवस्थेविरोधात एक बंड पुकारले, तेव्हा आपल्यासारख्या लाखो लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि आपल्या सर्वांना माणसांत आणले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा जरी धर्मांतराचे असले, बंड जरी धम्माचे असले, तरी त्यामागील कार्य हे राजकीय आणि सामाजिकच होते. ज्या पद्धतीने आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्माचे बंड स्वीकारले आणि बौद्ध धम्मात आलो, तसेच आपल्याला बाबासाहेबांचे राजकीय आणि सामाजिक बंडसुद्धा स्वीकारायचे आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारत पुन्हा एकदा उभा करून दाखवायचा आहे.
भीमा कोरेगाव, बोधगया येथील महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात होती. महाराष्ट्रात एससी-एसटीचा निधी वळवून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला होता. त्यासंदर्भात त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले.
युवा पिढीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय आणि सामाजिक काम आणखी पुढे नेण्याची वेळ आली आहे.
दलित विद्यार्थ्यांनी शिकू नये, ते कॉपी करतात आणि आरक्षणावर जगतात, अशी जातीयवादी वक्तव्ये आजही केली जात आहेत. याला उत्तर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची ताकद व्यवस्थेला दाखवून द्यावी लागेल.
साहिल वाकोडे यांच्यावर खोटा चीटिंगचा आरोप करून, ते बौद्ध असल्यामुळे, आरक्षणातून शिकत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची व आंबेडकरवादी समाजाची बदनामी करण्याचे काम जातिवाद्यांकडून सुरू आहे.
भीमा कोरेगाव, डॉ. पायल तडवी आणि साहिल वाकोडे यांच्यासारख्या प्रकरणांत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरवादी पक्षाची गरज आहे.
येवला मुक्तीभूमीत मी एक मागणी करतो की, आज महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ आला आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे 35 हजार कोटींचे बजेट आहे. ते कुंभमेळ्याचे बजेट शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावे. कुंभमेळ्याचे बजेट वापरून महाराष्ट्राचा शेतकरी वाचवा, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.
जय भीम, नमो बुद्धाय!
#येवला #मुक्ती_भूमी
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे धम्मदीक्षा घेऊन ह्या देशात मोठी क्रांती घडवून आणली.
आपणा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन#नागपूर
📍ओझर, नाशिक
वंचित बहुजन आघाडीत तृतीयपंथीयांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न
वंचित बहुजन आघाडी तळागाळातील प्रत्येक घटक, समाज आणि जाती-समूहाला प्रतिनिधित्व व समान संधी देणारा एकमेव पक्ष आहे. आज ओझर येथे तृतीयपंथीयांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या संख्येने तृतीयपंथीयांनी पक्षप्रवेश केला. सर्वांना संधी आणि नेतृत्व हाती देण्याचे काम फक्त वंचित बहुजन आघाडी करत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, नाशिक आणि ओझरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#VBAForIndia
@VBAforIndia
This post has hit a nerve!
Forget me. Did you invite Mayawati, Chandrashekhar Azad, Stalin, or KCR?
Is shouting “B-Team, B-Team” all you know how to do?
I questioned the political exclusion but supported the October 10 protest.
VBA not only supported the protest but protested as well. Our Mumbai Mahila Aaghadi and Yuva Aaghadi teams were mishandled and detained by the police when we did our protest on October 10.
These idiots should know that it was us who went to the court against SIR in Maharashtra!
Reiterating again - Congress’ rehearsed reply to criticism is always the same - B-Team! BJP tells you to go to Pakistan; Congress brands you B-Team. Different slogans, same playbook!
वंचित बहुजन आघाडीची मराठवाडा विभागीय संघटनात्मक आढावा संपन्न.
जालना प्रदेशाध्यक्ष, मा. राजेद्र दादा पातोडे
आणि प्रदेश कमिटीचे पदाधिकारी प्रा नागोराव पांचाळ, अरुण जाधव, डॉ चित्राताई कुऱ्हे, जितरत्न पटाईत, प्रशांत इंगोले, उत्तम वनशिव, ज्ञानेश्वर कवठेकर, कृष्णा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील मराठवाडा विभागीय संघटनात्मक आढावा बैठक जालना येथे पार पडली या मराठवाडा विभागीय संघटनात्मक आढावा आणि निवडणूक नियोजन करण्यात आले.
@VBAforIndia
प्रशासनाने ज्या पद्धतीने परीक्षांचे शुल्क माफ करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, चारा छावण्या उभ्या करणे, अशा दुष्काळाच्या संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टींपैकी काहीही सरकारने केलेले नाही.
दुष्काळी परिस्थितीवर बिऱ्हाड आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
दिल्लीतील युवतींवरील मारहाणीवर राष्ट्रीय महिला आयोग, मानवाधिकार आयोग आणि भाजप-मित्रपक्षांतील महिला आमदार, खासदार व नेत्या शांत का?
: उत्कर्षाताई रूपवते
राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी
#JantarMantar#MPSCstudents#VBAForIndia
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आयोजित
धर्मांतर घोषणा वर्धापन दिन महोत्सव - २०२६
भव्य मेळावा
प्रमुख उपस्थिती :
सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓 १३ ऑक्टोबर २०२६
वेळ :🕰 सकाळी ११ वाजता
स्थळ. : 📍मुक्तीभूमी येवला, नाशिक
#भव्य_मेळावा #धर्मांतर_घोषणा_वर्धापन_दिन #VBAForIndia
वंचित बहुजन आघाडी
तृतीयपंथी समुहाच
भव्य पक्ष प्रवेश सोहळा
प्रमुख मार्गदर्शक :
सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓 १३ ऑक्टोबर २०२६
वेळ :🕰 सायं ५ वाजता
स्थळ :📍 प्रिया हॉटेल, ओझर
#VBAForIndia
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#भव्य_धम्म_मेळावा#VBAForIndia