योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
निरोगी जीवन, सकारात्मक विचार आणि आनंदी भविष्यासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया.
#InternationalYogaDay
सौरऊर्जा प्रत्येक कुटुंबासाठी
बचत प्रत्येक कुटुंबासाठी...!
महावितरण व राजारामबापू सहकारी बँक यांच्या सहकार्याने सौरऊर्जा प्रकल्पासाठी विशेष योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
याअंतर्गत केंद्र शासनाचे २ KW आणि ३ KW सौरऊर्जा प्रकल्पासाठी विशेष अनुदान देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलात मोठी बचत होणार आहे. ही सोपी व जलद प्रक्रिया आहे. यामुळे सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. १००% कर्ज पुरवठा उपलब्ध होणार आहे.
येणाऱ्या काळाची गरज ओळखून हरित ऊर्जा स्वीकारूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया.
#सौरऊर्जा #SolarEnergy
A very Happy Birthday to a leader who continues to inspire millions with his courage, vision and unwavering commitment to the people.
Wishing Hon. Rahul Ji Gandhi good health, happiness and continued success in serving the nation. 🇮🇳
#HappyBirthdayRahulGandhi#India#RaGa@RahulGandhi
सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे लोकनेते मा. विलासरावजी शिंदे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे समाजकारण, जनसेवा आणि लोकहितासाठीचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
वाळवा तालुक्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, कासेगावचे सुपुत्र, ज्येष्ठ नेते स्व. जनार्दन काका पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे, विकासाला दिशा देणारे आणि समाजहिताला प्राधान्य देणारे त्यांचे कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने वेगळी छाप उमटवणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंहजी मोहिते-पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 💐
सहकार, उद्योग आणि शेतकरी हिताच्या चळवळीत साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वातून आणि अनुभवातून नेहमीच मार्गदर्शन मिळत राहिले आहे. इथेनॉल क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि सहकार्य मोलाचे असून, त्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली आगामी काळात अधिक प्रभावी कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहो, हीच सदिच्छा.
साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब! 💐
विझून पडलेल्या देशाच्या स्वाभिमानाला स्वराज्याची लागलेली ठिणगी म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! 🚩
६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि जनकल्याणाच्या हिंदवी स्वराज्याचा विजयघोष होता.
शौर्य, न्याय आणि लोककल्याणाची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🙏
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#शिवराज्याभिषेकदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #जयशिवराय
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया.
आजची हरित कृती उद्याचे सुरक्षित भविष्य घडवते. वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.
चला, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया आणि हरित, स्वच्छ व समृद्ध भारताच्या निर्मितीत आपला सहभाग नोंदवूया.
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WorldEnvironmentDay
#जागतिकपर्यावरणदिन
महादेववाडी येथील मा. आ. जयंतरावजी पाटील युवा मंच (एन. आर. ग्रुप) यांच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मी दिलेला शब्द पूर्ण करताना विशेष आनंद होत आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या आपल्या चिमुकल्या शिवप्रेमींना पुणे येथील शिवसृष्टी हिस्टोरिकल थीम पार्कला भेट देण्याची संधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचा आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अविस्मरणीय होता.
पुस्तकातील इतिहास प्रत्यक्ष पाहण्याची ही संधी त्यांच्या मनात शिवचरित्राबद्दलचा अभिमान अधिक दृढ करेल, याची खात्री आहे. आपल्या भावी पिढीला इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याच्या मूल्यांशी जोडणारे असे उपक्रम पुढेही सातत्याने राबवण्याचा प्रयत्न राहील.
#जयशिवराय #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवसृष्टी #किल्लास्पर्धा #शिवप्रेमी
राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात सुरू केलेले नवीन जीपीआर (GPR) पोर्टल पहिल्याच दिवसापासून तांत्रिक अडचणींनी ग्रासले आहे.
'आपले सरकार' पोर्टलवरील नवीन जीपीआर प्रणाली आणि सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांची दाखल्याची कामे रखडली आहेत. शालेय प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहे. शासनाने जबाबदारी घेऊन तात्काळ तांत्रिक त्रुटी दूर करून पोर्टल सुरळीत चालू करावे. विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या ‘ॲग्रो इनोव्हेशन समिट २०२६’ या परिसंवादासाठी उपस्थित राहिलो.
या परिसंवादात कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना, कृषी-आधारित उद्योगांच्या संधी तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योगपती, संशोधक आणि कृषी तज्ञ यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम भविष्यवेधी ठरला.
शेतकरी, उद्योग आणि प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय साधून ग्रामीण विकासाला अधिक गती देता येईल, हा विश्वास या समिटमधून अधिक दृढ झाला.
या उत्कृष्ट आणि यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
#AgroInnovationSummit2026 #Agriculture #AgriTech #Innovation #DYPatilUniversity #AgroIndustry #MaharashtraDevelopment #RuralDevelopment #Leadership #Networking
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी छाप उमटवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐
#VilasraoDeshmukh#विलासरावदेशमुखजयंती
काल कवठेपिरान येथे फ्रेंड्स पॉवर आयोजित “सप्तर्षी प्रिमियर लीग” क्रिकेट स्पर्धेस भेट देण्याचा योग आला. युवकांच्या उत्साहाने, खेळाडूंच्या जिद्दीने आणि प्रेक्षकांच्या जल्लोषाने संपूर्ण मैदान दणाणून गेले होते. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची उत्तम संधी मिळते.
या सुंदर आयोजनासाठी फ्रेंड्स पॉवर टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा!
#SaptarshiPremierLeague #FriendsPower #Cricket #Kavathepiran #SportsSpirit
उरुण-ईश्वरपूर येथील मोहन स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हॉलीबॉल खेळाचा गौरव वाढवणारे ज्येष्ठ व्हॉलीबॉलपटू मा. श्री. महम्मदसाब मुल्ला यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे.
२०२२ साली ईश्वरपूर येथे आयोजित राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. खेळाप्रती असलेली त्यांची निष्ठा, समर्पण आणि खेळाडू घडविण्यासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. व्हॉलीबॉल क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव आदराने स्मरणात राहील.
स्वर्गीय महंम्मदसाब मुल्ला यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼
आष्टा येथे नयनतारा ऑप्टिकल्स या नवीन शोरूमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो.
डोळ्यांचे आरोग्य हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. या केंद्रामध्ये डोळ्यांची अचूक तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत असून, नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.
नयनतारा ऑप्टिकल्सच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐