"Communication is about what is received, not what is intended. If there is a gap between what you are saying and what they are hearing, you have to find a new way to say it."
-@JamesClear
आता बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, पॉर्शे अश्या महागड्या कार विकतानाच मालकांना एक खुन माफ करावा तसं एक दोघांना चिरडलं तरी खून माफ करावे. किंवा लोकांचे जीव घेण्याचं परमिट द्याव.
वरळीतलं प्रकरण हिट अँड रन नाही तर हत्याच...
वरळीत नवरा बायको प्रवास करत असताना मागून एक बीएमडब्ल्यु कार बाईकला धडक देते.. नवरा बायको गाडीच्या बोनेटवर पडतात. नवरा लगेच स्वतःला बाजुला होतो आणि बायकोलाही आपल्याकडे खेचणार तेवढ्यात बीएमडब्ल्यु वाला निर्दयीपण अपघातानंतरही जिवंत असलेल्या महिलेच्या अंगावरुन गाडी नेतो. महिलेची साडी गाडीच्या टायरमध्ये अडकते. या महिलेचा नवरा आरोपीला रडवेल्या चेहऱ्याने थांब थांब म्हणतो तरी आरोपी गाडी पुढे नेत २ ते अडीच किलोमीटरपर्यंत त्या महिलेला रस्त्यावरुन फरफटत नेतो. गाडी पुढे नेत असताना गाडीसोबत फरफटत जाणाऱ्या महिलेला किती वेदना होत असतील याचा विचार सुद्धा आरोपी मिहीर शहाच्या डोक्यात येत नाही. इतक्या क्रुरपण तो गाडी पुढे नेत राहतो. आपल्या अब्रुची सर्वाधिक पर्वा करणाऱ्या या पत्नीच्या, दोन मुलांच्या आईचा जीव जातो आणि बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेल्यामुळे अंगावरचा कपडा सुद्धा शिल्लक राहत नाही. पण सगळे कपडे निघुन गेल्यावर सुद्धा आरोपी फरफट सुरुच ठेवतो. आणि हे सगळं हतबलपणे तिचा नवरा बघतो त्याची बायको मरेपर्यंत..
पुण्यातल्या पोर्शे अपघाताप्रमाणेच मुंबई अपघातातला आरोपी मिहीर शहा सुद्धा या अपघातापुर्वी बारमध्ये गेला होता. जवळपास १८ हजारांचं बिल दिल्यानंतर तो निघाला. गाडी बदलली. आणि त्यानंतर कावेरी नाखवांचा जीव घेऊन एक कुटुंब उध्वस्त केलं. आरोपी थांबला असता तर ही महिला आपल्या कुटुंबासोबत आज सुखरूप असती. पण मिहिरने फरफटत नेऊन तिचा जीव घेतला. मग हा अपघात कसा? ही तर हत्या झाली.
पण मुंबई पोलिसाना तपासाबद्दल विचारल्यावर या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे का नाहीयेत. ?
१. या अपघातातला पीडित आणि ज्याने डोळ्यासमोर आपली बायको गमावली तो माणूस स्वतः सांगतोय की मिहीर शाहाच गाडी चालवत होता तरी पोलिस यावर काही का बोलत नाहीयेत.
२. पोलिसांनी त्यावेळी गाड़ीत उपस्थित असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. पण ड्रायव्हरने गाडी कोण चालवत होतं याबाबत काय जबाब दिला याबद्दल पोलिस का सांगत नाहीयेत. ?
3. पुणे पॉर्शे प्रकरणासारखं इथे सुद्धा प्रकरणत ड्रायव्हरवर ढकलण्याचा प्रयत्न होतोय का?
4. बारमधून आरोपी मिहीर शाह बाहेर पडताना, आणि ड्रायव्हर ड्रायव्हींग सीटवर बसनाचंच फुटेज पोलिसांनी कसं बाहेर येऊ दिलं. ते आरोपीच्या सोयीसाठी का?
5. ज्या भागात अपघात झाला तिथलं सीसीटीव्ही फुटेज जर बाहेर आलं तर त्यात स्पष्टपणे कळेल की गाडी कोण चालवत होतं. म्हणून हे फुटेज बाहेर येऊ दिलं जात नाहीये का ?
6. अपघातानंतर कावेरी नाखवांना आरोपीच्या गाडीने फरफटत नेलं, त्यामुळे मृत महिलेच्या अंगावर एक कपडा सुद्धा राहीला नाही. पण पोलिस फरफटत नेण्यासंदर्भात कुठलीही ठोस माहीती देत नाहीये.
७. गाडीने फरफटत नेतानाच्या मार्गावर अनेक सीसीटीव्ही आहेत. मग पोलिसांना याची शहानिशा करण्यासाठी ईतका वेळ का लागतोय?
8. पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली, गाडी मिळाली. मग आरोपी मिहीर शहा नेमका कसा फरार झाला.?
9. यावेळी जर गाडी ड्रायव्हर चालवत होता तर ड्रायव्हर फरार झाला असता. पण इथे नेमकं उलटं होतंय. ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि मिहीर गाडी चालवतच नसेल तर तो का फरार झाला.
या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडे नाहीयेत कारण मरणारी व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी सामान्य होती. आरोपीच्या गाडीपेक्षाही कमी किंमत तुमच्या आमच्या जगण्याची जिवाची आहे.
आता बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, पॉर्शे अश्या महागड्या कार विकतानाच मालकांना एक खुन माफ करावा तसं एक दोघांना चिरडलं तरी खून माफ करावे. किंवा लोकांचे जीव घेण्याचं परमिट द्याव.
- @saurabhkoratkar
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची आज संसदेत भेट घेतली. राहुलजी देशाचे खंबीर नेते आहेत, त्यांनी लोकसभेत पहिल्याच भाषणात सत्ताधाऱ्यांना आपल्या वकृत्वाने घेरले. यावेळी राहुलजींनी माझे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले!
@RahulGandhi