साहेब आता तुम्ही एकटे नाही.
तर महाराष्ट्रातील तमाम तरुण तुमच्या सोबत आहे. आज आयुष्यातील आपले पहिले मत देणारा तरुण तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहतोय.
#hope#myvote#VoteForMNS#RajThackeray 🚂🔥🔥
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश, सावित्रीबाई फुले नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उपोषण आंदोलन यशस्वी...
सावित्रीबाई फुले नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या हस्तक्षेपानंतर यशस्वी झाले. आंदोलनाला यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमितसाहेब ठाकरे यांची भेट घेत आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस संतोष गांगुर्डे आणि राज्य सचिव नितीन ननावरे यांनी मंत्रालयात प्रधान सचिव (आदिवासी विकास विभाग) तसेच प्रधान सचिव (समाज कल्याण विभाग) यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, कागदपत्रांची अडवणूक केली जाणार नाही, मानसिक त्रास दिला जाणार नाही, प्रॅक्टिकल गुणांमध्ये अन्यायकारक कपात होणार नाही, अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही तसेच शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशा आश्वासनांचा समावेश आहे. यावेळी संतोष गांगुर्डे (राज्य सरचिटणीस), चेतन पेडणेकर (राज्य प्रमुख संघटक), नितीन ननावरे (राज्य सचिव), गजानन काढणे पाटील (प्रभारी जिल्हाध्यक्ष, वाशीम), अनिकेत शेटे (जिल्हा उपाध्यक्ष, वाशीम) यांच्यासह विद्यार्थी, पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
#MNVSAdhikrut
माझी सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि माझ्या हितचिंतकांना विनंती आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त शहरंच्या शहरं रंगवणारे कोणतेही होर्डिंग्ज लावू नयेत त्याऐवजी फळांची आणि फुलांची झाडे लावा, प्राण्यांसाठी पाणवठे तयार करा - राजसाहेब ठाकरे.
#RajThackeray
जे लोकं 15 वर्षे राहून मराठी शिकले नाहीत ते दोन धडे देवून मराठी शिकणार नाहीत. ज्याला मराठी येते त्यालाच परमीट मिळेल हा नियम लागू करावा. तरच काहीतरी होईल. नाहीतर अशा घटना रोज घडतील..
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।
Deoolband 2 Box Office Collectio: 'देऊळबंद 2' ठरला मराठीतील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटालाही टाकलं मागे
https://t.co/SxGGx5XKl5
#Deoolband
परप्रांतीय चालकांनी नीट पोटपण्याचा व्यवसाय करावा आणि नीट जावं. सरकारने जे काही कारवाईच आश्वासन दिल आहे ते त्यांनी पाळाव. या मुजोर चालकांनी आमच्या लोकांना मारहाण केल्यावर त्यांच्यावर तत्काळ कारवाई का होत नाही?? मग आम्ही त्यांना मारतांना का लाजायचं?? मग खळखट्याक होणारच..
ठाण्यातील वर्तकनगर परिसरात स्वच्छता राखण्याच्या कारणावरून एका परप्रांतीय टॅक्सीचालकाने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार #मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना समज दिली!
पुणे येथील कोंढवा बुद्रुक परिसरातील प्रभांगण या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये मराठी भाषिक नागरिकांना सदनिका विक्री करताना भेदभाव होत असल्याच्या तक्रारींची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या वतीने संबंधित विकसकाची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यात आला तसेच यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.
महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या राज्यात दुय्यम वागणूक देण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला. मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांविरोधात मनसे ठामपणे उभी राहील आणि आवश्यक ते सर्व आंदोलनात्मक मार्ग अवलंबेल, अशी भूमिका देखील यावेळी मांडण्यात आली.
#MNSAdhikrut
सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करणारे, सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित व त्यांच्या विचारांना घराघरात पोहचवणारी 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' ही मालिका बंद करण्याचे षडयंत्र काही मनुवादी प्रवृत्ती करत आहेत. हा विषय मालिकेपुरता मर्यादित नाही तर क्रांतीज्योतींच्या विचाराला पुन्हा एकदा प्रतिसाद मिळत असल्याने मनुवाद्यांचे धाबे दणाणले आहे.
ही मालिका बंद पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर हे या पुरोगामी महाराष्ट्रात कधीही खपवून घेतले जाणार नाही. या मालिकेचे निर्माते खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत आम्ही सर्व जण खंबीरपणे उभे असून संपूर्ण महाराष्ट्र या लढ्यात त्यांच्यासोबत उभा राहील हा विश्वास आहे.
#जय_ज्योति_जय_क्रांती
🇮🇳 महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचा आणखी एक अभिमानास्पद अध्याय!
अकोला जिल्ह्याचे सुपुत्र, वीर जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांनी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत अतुलनीय शौर्य गाजवत मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले.
अवघ्या २४ व्या वर्षी देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीरपुत्राला मरणोत्तर "कीर्ति चक्र" प्रदान करून राष्ट्राने त्यांच्या शौर्याला सलाम केला.
हा सन्मान स्वीकारताना वीरमाता आणि वीरपत्नींच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःखासोबतच आपल्या वीरपुत्राच्या पराक्रमाचा अभिमानही होता.
प्रवीण जंजाळ यांचे बलिदान प्रत्येक भारतीयाला राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याची प्रेरणा देत राहील.
शतशः नमन या वीर जवानाला! 🙏🇮🇳
#PravinJanjal #KirtiChakra #IndianArmy #MaharashtraPride #JaiHind #MNS_SOCIAL