गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीत भाविकांचे सोन्याचे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या तपासात या टोळीचा सहभाग निष्पन्न झाला.
या कारवाईत १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, चोरीस गेलेला मोबाईल फोन, धारदार चाकू व लोखंडी कटर असा एकूण ₹२१,२१,१०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे चैन चोरी व मंगळसूत्र चोरीचे दाखल गुन्ह्यासह एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
#PunePoliceUpdates
हुजूरपागा शाळेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीररीत्या कोयता बाळगून शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा गुन्हे शाखा युनिट १ ने शोध घेतला.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टिळक रोड परिसरातून आरोपीस ताब्यात घेतले.
#PunePoliceUpdates
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना, तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर, येरवडा परिसरातून १९ वर्षीय आरोपीस २४ तासात ताब्यात घेतले.
तपासात आरोपीने घराच्या टेरेसवरून ४ मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
सदर कारवाईत ७०,००० रुपये किंमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले.
#PunePoliceUpdates
नानापेठ परिसरात भाचीला नांदायला पाठवत नसल्याच्या गैरसमजातून झालेल्या वादात फिर्यादीच्या डाव्या हातावर विटेच्या तुकड्याने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
#PunePoliceUpdates
A 4,600 km inter-state chase, an extensive multi-state manhunt, and Vishrambag Police on the case.
From tracking suspects across Gujarat, Haryana, and neighboring states to uncovering 62 total crimes and recovering over ₹1.23 Crore in stolen property over two months, the operation delivered a major breakthrough.
#PunePoliceUpdates
#SwiftActionExcellentPolicing
सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला आरोपी धनकवडी येथील तीन हत्ती चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपींनी संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
#PunePoliceUpdates
पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने गोपनीय माहितीच्या आधारे कोथरूड येथील कर्वे रोड परिसरातून सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील सन २०१५ मधील चोरीच्या गुन्ह्यातील १२ वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
#PunePoliceUpdates
A 2.2 kg gold heist, a 12-hour manhunt, and Khadak Police on the case.
From reviewing area CCTV footage to tracking suspects hiding within the very same building, the trail led to a swift resolution, with over 100% of the stolen gold recovered.
#PunePoliceUpdates
#SwiftActionExcellentPolicing
नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचे कुलूप उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तीन आरोपींना अटक करण्यात आली. तसेच चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
#PunePoliceUpdates
दोन सोनसाखळी चोरांना अटक!
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवासादरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
या गुन्ह्याचा युनिट ७ कडून सखोल तपास सुरू असताना, दोन आरोपींना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला. यावेळी त्यांच्याकडून ₹२,१७,१४० /- किंमतीची, १५.५१ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली.
#PunePoliceUpdates
Not all distress calls come with a ringtone.
Reach out, speak up, or simply start a conversation. We’re here to listen, support and help.
#WeAreHereToHelp
A ₹75,000 theft, a city-wide trail, and Hadapsar Police on the case.
From digital clues to ground-level investigation, the trail led straight to Amravati, where the suspect was arrested and all stolen property was recovered.
#PunePoliceUpdates#SwiftActionExcellentPolicing
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील मागील ६ वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीचा गुन्हे शाखा युनिट ०३ ने शोध घेऊन त्यास वडगाव परिसरातून ताब्यात घेतले.
सदर आरोपी वडगाव परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. आरोपीची खात्री करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
#PunePoliceUpdates