आर.सी.एफ पोलीस ठाणे अधिकृत खाते अपतकालीन परिस्थीतीत 100/112 वर संपर्क करा Official account of R.C.F POLICE STATION Mumbai for any emergency Dail 100/112.
Eid-ul-Fitr Mubarak!
Wishing everyone a celebration full of cheer and joy on this occasion.
ईद मुबारक!
सर्वांना ईद- उल- फित्रच्या शुभेच्छा. आपले आयुष्य सुखमय आणि आनंददायी राहो हीच सदिच्छा.
#EidUlFitr2026
On the occasion of International Women’s Day, a special ceremony was held at @MumbaiPolice Headquarters, where officers, staff and family members were honoured with tokens of appreciation for their service and contribution.
Wishing everyone a very Happy International Women’s Day.
#InternationalWomensDay
#WomensDay2026
विश्वविजेता भारत!
टी-२० वर्ल्ड कप २०२६ अंतिम सामना जिंकून भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचून जगभरात देशाचा अभिमान वाढवला आहे.
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन.
#INDvNZ#T20WorldCup2026final#T20WC2026
जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay
#WomensDay2026
ऑनलाईन असो वा ऑफलाईन.. तिकीट अधिकृत केंद्रातूनच खरेदी करा.
उद्या वानखेडे स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरी सामन्याची तिकिटे ही चढ्या दराने किंवा बनावट तिकीटे विक्री चे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अधिकृत केंद्रातूनच सामन्याची तिकिटे खरेदी करा.
काळ्या बाजारातील तिकिटांची खरेदी-विक्री करणे हा गुन्हा आहे.
#INDvsENG
#T20WorldCup
.@CPMumbaiPolice यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना विशेष पीपिंग समारंभात पदोन्नती देण्यात आली. सदर समारंभ त्यांच्या संबंधित युनिटमध्ये पार पडला. यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि पदोन्नतीधारक कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी समारभांत उपस्थिती दर्शवली.
प्रत्येक खांद्यावर लागलेला बॅज हा त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि मुंबई शहरासाठी असलेल्या निष्ठेचा सन्मान आहे.
#BadgesOfHonour #PippingCeremony
Under the guidance of @CPMumbaiPolice, personnel across Mumbai Police were elevated to higher ranks in special pipping ceremonies, witnessed by senior officers and their proud families at their respective units.
Each badge reflects years of dedication, discipline, and an unwavering commitment to Mumbai.
#BadgesOfHonour #PippingCeremony
आज मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला.
त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा देत मुंबई शहराची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवली. त्यांचा प्रवास धैर्य, शिस्त आणि निस्वार्थी सेवेचा उत्तम आदर्श आहे. अभिमानाने गणवेश परिधान करून त्यांनी दररोज आपले कर्तव्य पार पाडले.
आज ते सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा कायम राहील तसेच त्यांनी दिलेली सेवा आणि जपलेली मूल्ये पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील.
#HappyRetirement #KhakiNeverRetires
सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#मराठी_भाषा_गौरव_दिन