सार्वजनिक कामाची अचानक पाहणी करण्याची माझी सवय आहे. संबंधित काम योग्य नसेल तर ते मला पटत नाही. कालही पांढरेवाडी-खर्डा या रस्त्याची पाहणी केली. महिन्यापूर्वीच केलेला हा रस्ता उखडण्यास सुरुवात झालीय. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असून काम दर्जेदार करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली.
शैक्षणिक गुणवत्ता कायम राहण्यासाठी परीक्षा घ्यायला पाहिजे, असं मलाही वाटतं. पण अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटाचा कुणी विचारही केला नव्हता. या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एकत्र करणं धोक्याचं होईल म्हणून मंत्री सामंत साहेबांनी केलेली विनंती, मला योग्य वाटते.
@samant_uday#lockdown अगोदर लाखो विद्यार्थ्यांनी फी भरून क्लासेस जॉईन केले, पण #lockdown नंतर क्लासेस चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचण आली, काही भागांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे, विद्यार्थी खूप तणाव मध्ये आहेत, की आपला पुरेपूर अभ्यास झालेला नाही.
कर्जत व जामखेड या तालुक्यांत पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे जलजीवन मिशन व अटल पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची मिराजगाव येथे बैठक घेतली.यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या व होणाऱ्या कामांचाही आढावा घेतला.
विजापूर महामार्गावर वडकबाळ इथे नाकाबंदी करत असताना सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर परचंडे (वय 34) यांच्या अंगावर गाडी घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
#अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात.कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्ये परवानगी दिलेल्या सर्व व्यवहार/कृती/क्रिया साठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक. दिनांक २२ मे पासून आदेशाची अंमलबावणी.जिल्हाधिकारी @_Rahuld यांनी जारी केले आदेश.
@bb_thorat
हॉट स्पॉट ते कोरोनामुक्त असा जामखेडचा प्रवास नुकताच पूर्ण झाला.पण पुढे काय,याबाबत प्रशासन,पोलीस,व्यापारी व व्यावसायिक यांची जामखेडमध्ये बैठक घेऊन चर्चा केली.कोरोनाला कायम दूर ठेवण्याबाबत काय काळजी घ्यावी,कोणती दुकाने उघडावीत,कोणते नियम पाळावेत यासंदर्भात संवाद साधून निर्णय घेतला.