शेतकरी कर्जमाफीमधील अटीशर्तीबाबत सरकार कितीही रेटून खोटं बोलत असलं तरी सत्य पुढं आल्यावाचून रहात नाही. त्यासाठी सोलापूर जिल्हा बँकेचं उदाहरण पुरेसं आहे. या बॅकेतून कर्ज घेतलेल्या 23,920 शेतकऱ्यांचं जून 2025 अखेरपर्यंत 370 कोटीचं कर्ज थकीत असताना सरकारच्या जाचक अटीमुळं कर्जमाफीसाठी केवळ 7566 शेतकऱ्यांचं 128 कोटी रुपयांचंच पीक कर्जच माफ होणार आहे. म्हणजे केवळ 30 % थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत, तर तब्बल 70 % शेतकरी हे जाचक अटीशर्तीच्या चाळणीत अडकून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.
सहकारी बँकेची ही स्थिती असून राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा तर विचारच न केलेला बरा! हे आहे सरकारच्या तथाकथित कर्जमाफी योजनेचं भीषण वास्तव.. म्हणूनच रस्त्यावर उतरूनच सरकारला वास्तव परिस्थिती दाखवायची आणि शेतकऱ्यांच्या हक्काची विनाअट_सरसकट कर्जमाफी मिळवायचीय…!
#एल्गार_अन्नदात्याचा
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
#कर्जवसुली_नको_कर्जमाफी_हवी
विनाअट सरसकट कर्जमाफीबाबत २२ जूनपूर्वी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचा पंढरपूरच्या पवित्र भूमीत दिलेला शब्द या सरकारने पाळला नाही. यामुळं आमच्या अन्नदात्याचा विश्वासघात झाला असून महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुराय��च्या भूमीत दिलेला शब्दही सरकारला पाळता येत नसेल तर तो या भूमीचाही अवमान आहे. त्यामुळं या विश्वासघाती सरकारविरोधात आम्ही ‘एल्गार अन्नदात्याचा’ या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरु करत आहोत. याची सुरवात आज पंढरीत विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या चरणी लीन होऊन आणि आशीर्वाद घेऊन केली आणि विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची सरकारला सद्बुद्धी मिळावी आणि राज्यात भरपूर पाऊस ��डावा, अशी प्रार्थनाही यावेळी विठुरायाला केली.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे ह.भ.प. जळगावकर महाराज यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान केला. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक यावेळी उपस्थित होते.
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
#पंढरपूर #विठुमाउली #एल्गार_अन्नदात्याचा #शेतकरी_कर्जमाफी
महाराष्ट्र हे वाहन उत्पादनात आघाडीचं राज्य असून (ऑटो हब) बजाज कंपनीचा यात मोठा वाटा आहे. असं असतानाही ही कंपनी आपल्या पुढील manufacturing प्लांटसाठी कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणाबाबत विचार करत असून ही बाब महाराष्ट्राच्या लौकिकास शोभणारी नाही. याला कारण म्हणजे या राज्य सरकारचा दळभद्रीपणा!
आतापर्यंत बजाज कंपनीने वारंवार विनंती करूनही सरकारने ईलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेल्या योजनेची देय सबसिडी कंपनीला दिली नाही. पळवापळवीचे उद्योग करण्यात एक नंबर असणारे उद्योगमंत्री आणि 2047 च्या गप्पा हाणणारं हे सरकार याकडं लक्ष देईल का? या सरकारला नवीन कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक तर आणता येत नाहीच पण किमान आहे त्या कंपन्या तरी टिकवता येतील का, असा प्रश्न आहे.
#SaveMaharashtraIndustry #Maharashtra
विनाअट सरसकट कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचा विठुरायाची पवित्र भूमी असलेल्या पंढरपूरमध्ये दिलेला शब्दही या धोकेबाज सरकारने पाळला नाही. हा राज्यातील अन्नदात्याचा विश्वासघात असून या दगाबाज सरकारला वठणीवर आणून विनाअट क���्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी उद्यापासून पुन्हा रस्त्यावर उतरतोय.. सुरवात ज्या पवित्र भूमीत सरकारने लबाडी केली त्याच पंढरपुरात महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठुरायाचे आशीर्वाद घेऊन करतोय आणि २९ जून रोजी मराठवाड्यात अन्नदात्याच्या एल्गाराच्या माध्यमातून सरकारचं नाक दाबू.. यावेळी विश्वासघातकी सरकारच्या पाठीवर घात झालेल्या संतप्त अन्नदात्याच्या आसूडाचे वळ उठल्याश��वाय राहणार नाहीत…
आता खूप झाली चर्चा.. वेळ आहे निर्णय घेण्याची... तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील…!
#एल्गार_अन्नदात्याचा
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
राज्यातील शेतकरी कसा अडचणी आहे आणि त्याची काय व्यथा आहे, याचा चंद्रपूर जिल्ह्यातील हा प्रातिनिधीक व्हिडिओ… प्रश्न एवढाच आहे की, वातानुकुलित कार्यालयात बसणाऱ्या सरकारला याची जाणीव होईल का आणि आतातरी विनाअट कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी सरकारला येईल का? की या गरीब शेतकऱ्याच्या या परिस्थितीलाही तुम्ही नौटंकी म्हणणार?
#विनाअट_कर्जमाफी #सरसकट_श���तकरी_कर्जमाफी
अधिवेशनाच्या आधी बैठक घेऊन कर्जमाफीच्या जाचक ��टीशर्ती काढू, असा शब्द या सरकारने दिला होता पर��तु सरकारने विश्वासघात केला. सभागृह सर्वोच्च आहे, परंतु या सरकारची शेतकऱ्यांना देण्याची दानत आणि नियतच दिसत नाही म्हणूनच रस्त्यावर उतरूनच या सरकारला धडा शिकवावा लागणार आहे, हीच भावना मी काल बोलून दाखवली होती.
आज सत्ताधारी पक्षाने 293 च्या प्रस्तावाअन्वये मांडलेल्या कृषी वरील चर्चेस एकही अधिकारी उपस्थित नाही, यावरूनच सरकारच्या असंवेदनशीलतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. सरकारचा हा असंवेद���शीलपणा उघड करणारे सत्ताधारी आ.रणधीरजी सावरकर, आ.संजयजी कुटे यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार!
सत्ताधारी पक्षाचे असल्याने आ.रणधीरजी सावरकर यांनी पंढरपूर येथील आंदोलनाला स्टंटबाजी म्हटले असले तरी शेवटी त्यांच्यातला शेतकरी जागा झाल्याने त्यांनी 2019 ची अट काढण्याची आमची प्रमुख मागणी पुढे रेटली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार!
शेतकऱ्यांशी दगाफटका करणाऱ्या या सरकारला जाग�� करण्यासाठी 29 जून रोजी मराठवाड्यात राज्यभरातले शेतकरी आंदोलन करणार आहेत, त्यापूर्वी हे सरकार शहाणपणा दाखवत या जाचक अटीशर्ती काढेल, ही अपेक्षा आहे, अन्यथा रस्त्यावर उतरलेला अन्नदाता सरकारला परवडणार नाही, हे सरकारने विसरू नये !
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@girishdmahajan
#सरसकट_कर्जमाफी #विनाअट_कर्जमाफी
विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीसंदर्भात पंढरपूरच्या पवित्र भूमीत केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मंत्र�� गिरीश महाजन साहेब यांनी भेट दिली तेंव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यास���बत फोनवर चर्चा करुन यासंदर्भात अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यांच्या आश्वासनानुसार आंदोलन स्थगित करण्यात आलं, परंतु अद्यापही याबाबतची बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर साहेब यांची भेट घेऊन कर्जमाफी योजनेतील जाचक अटी काढण्यासंदर्भात विधानसभेत विस्तृत चर्चा घडवून आणण्याची त्यांना विनंती केली.
तसंच शासनाने दिलेल्या ��श्वासनाप्रमाणे संबंधित विभागांचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत माझ्यासह मा. राजू शेट्टी साहेब, मा. अजित नवले जी, मा. शशिकांत शिंदे साहेब, मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, मा. अंबादास दानवे साहेब, मा. सुधीर मुनगंटीवार साहेब, मा. बच्चू भाऊ कडू, मा. जयंत पाटील साहेब (शेकाप), मा. रघुनाथदादा पाटील, मा. वामनराव चटप साहेब, श्री. रविकांत तुपकर जी, मा. प्रवीणदादा गायकवाड, रविराज साबळे यांच्यासह सर्व राजकीय पक���षांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत ��पल्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करण्यासाठी शासनास निर्देश देण्याची विनंती केली.
विनाअट सरसकट कर्जमाफीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर येत्या सोमवारी (२९ जून) मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं केलं जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis
@rahulnarwekar
@girishdmahajan
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
#Farmer #शेतकरी_कर्जमाफी
महिलांच्या सक्षमीकरणाचा दूरदृष्टीपूर्ण पाया रचणारे आदरणीय पवार साहेब!
आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना २२ जून १९९४ रोजी महाराष्ट्राने देशातील पहिले सर्वंकष महिला धोरण जाहीर करून इतिहास घडव���ा. शिक्षण, राजकीय सहभाग, आर्थिक स्वावलंबन आणि महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला नवी दिशा देणारे हे धोरण आजही लाखो महिलांसाठी संधी, समानता आणि प्रगतीचा मार्ग ठरत आहे.
या क्रांतिकारी आणि युगप्रवर्तक निर्णयाच्या ३२ व्या वर्षपूर्तीनिमित्त महिलांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीने उचललेल्या या ऐतिहासिक पावलाचे स्मरण करताना, आदरणीय पवार साहेबांच्या प्रगतिशील नेतृत्वाच�� अभिमान वाटतो.
#महिला_धोरण #WomenEmpowerment #Maharashtra #साहेब #ProgressiveLeadership
शरणागतीपेक्षा संघर्षाचा कध���ही फायदाच होतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं…!
कांदा खरेदीसाठी राज्यात नाशिक ��णि पुण्यात सरकारशी केलेल्या संघर्षामुळं सरकारला टप्प्याटप्प्याने का होईना कांद्याच्या खरेदी दरात वाढ करावी लागतेय. सुरवातीला नाशिक (चांदवड) येथील आंदोलनाच्या एक दिवस आधी १२०० रुपये प्रती क्विंटल असलेला कांद्याचा शासकीय खरेदी दर सरकारने १५८० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढवला. त्यानंतर त्यात १६५० रुपयांपर्यंत वाढ केली आणि आता तो १७३० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवला.
माझी सरकारल��� पुन्हा एकदा विनंती आहे की, अशी हातचं राखून वाढ न करता एकदाच वाढ करुन २५०० रुपये प्रति क्विंटलने कांद्याची खरेदी करावी, तसंच यापूर्वी शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्यालाही भरीव अनुदान द्यावं. कवडी-रेवडी प्रमाणे वाढ करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करु नये!
@JoshiPralhad
#कांदा_उत्पादक_शेतकरी #कांदा_दर
#कांद्याला_भरीव_अनुदान_द्या
RTI कायद्यात बदल करुन प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठीचं हे प्रभावी हत्यारच बोथट करण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. RTI अर्जामध्ये माहिती मागण्याचं कारण नमूद करण्याची नवीन अट घालण्यात आली असून अर्जासाठीच्या शुल्कातही वाढ करण्यात आली. तसंच आधी अपिलासाठी कोणतंही शुल्क नसताना आता प्रथम आणि द्वितीय अपिलासाठीही शुल्क भरावं लागणार आहे. शिवाय माहिती मागणाऱ्याचं ओळखपत्र, भारतीयत्त्वाचा पुरावा अशी कागदपत्रे मागवून अर्जदारावर वाढीव खर्चाचा भुर्दंड लादला जात आहे. हे बदल म्हणजे सहज माहिती उपलब्ध होऊ नये म्हणून माहिती मागण्याच्या मार्गात घातलेले स्पीडब्रेकर आहेत. हे बदल सरकारने तातडीने रद्द करून पारदर्शकता कायम ठेवावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#RightToInformation
#SaveRTI #RTIवाचवा
पेपरफुटीमुळं संपूर्ण देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनस्तापास कारणीभूत ठरलेली #NEET ची आज फेरपरीक्षा होतेय. आजचा पेपर तरी फुटणार नाही आणि पेपर फोडणाऱ्या रॅकेटपासून सुरक्षित राहील, अशी अपेक्षा करुया! परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
#NEET2026#NEETExam
निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनाचा मार्ग दाखवणारा योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देण आहे. नियमित योगाभ्यासातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य अधिक सक्षम होते.
सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#InternationalYogaDay#YogaDay#योगदिन
कृषी क���्जमाफीतील अटीशर्ती काढून टाकण्याच्या मागणीसाठी पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन थांबवताना पावसाळी अधिवेशनापूर्वी (२२ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन साहेबांनी दिलं होतं. आता अधिवेशन सुरु होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठक घेण्याबाबत अद्याप ना कुठला निरोप आला… ना काही याबाबत हालचाल सुरु आहे..
अन्नदात्याच्या बाबतीत���ी शब्द पाळला जात नसेल तर फसवणूक करणारं हे विश्वासघाती सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. तरीही पुढील दोन दिवसांत बैठक होईल, अशी अपेक्षा आम्ही अजूनही करत आहोत.
@Dev_Fadnavis
@girishdmahajan
#सरसकट_कर्जमाफी #विनाअट_कर्जमाफी
परभणीत हनुमान मंदिराचा निर्माणाधीन सभामंडप कोसळल्याने दर्शनासाठी आलेल्या ६ हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. यातील मृत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
ढिगाऱ्याखाली दबलेल्या भाविकांची ��ुखरुप सुटका व्हावी आणि जखमी भाविक लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!