रघुवीर चित्रपटाच्या शूटिंग वेळीची काही क्षणचित्रे. अनेकांच्या कष्टातून प्रत्येक चित्रपट तयार होतो. या पडद्यामागे राबणाऱ्या हातांच्या परिश्रमाचं फलित म्हणजे आपल्या समोर उभी राहणारी अद्भुत कलाकृ��ी!
'रघुवीर' - १९ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
पद्मश्री मा.डॉ. दत्तात्रेय नारायण उपाख्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च असणाऱ्या 'महाराष्ट्रभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.आप्पासाहेबांचे रघुवीर चित्रपटाच्या संपूर्ण टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व नमस्कार!
काही वर्षांपूर्वी 'रघुवीर' चित्रपटाचा मुहूर्त सज्जनगडावर दासनवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येस पार पडला. त्यानंतर चित्रपटाची शूटिंग सुरू झाली. त्या वेळची काही क्षणचित्रे!
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'रघुवीर' चित्रपट प्रदर्शित होतो आहे.'रघुवीर' - दि. १९ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात!
श्रीसमर्थांच्या वेळची सामाजिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीत श्रीसमर्थांनी केलेलं कार्य अभूतपूर्व आहे. मन, मस्तक आणि मनगट यांना आत्यंतिक महत्व देणाऱ्या या राष्ट्रपुरुषाची कथा पहा रघुवीर चित्रपटात! दि.१९ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!