राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
काँग्रेस पक्षाचे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. सुरेश नाईक, माजी नगरसेवक श्री. निंबा माळी, माजी नगरसेवक श्री. प्रशांत निकुंभे, जि.प. माजी सदस्य श्री. संजय पाडवी, पं. स. माजी सदस्य श्री. के. बी. पाटील. पं. स. माजी सदस्य श्री. कृष्णा पाटील, श्री. जगदीश निकम, वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष श्री. दिनेश बीऱ्हाडे, श्री. विश्वजीत भामरे, श्री. मधुर माळी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी सर्व नवीन सहकाऱ्यांचं स्वागत करत, "स्व. अजितदादांनी जपलेला विकासाचा आणि जनसेवेचा वारसा अधिक बळकट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आपले योगदान मोलाचे ठरेल," अशा शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक, माजी मंत्री मा. आ. श्री. अनिल पाटील, आमदार सना मलिक शेख, प्रदेश सरचिटणीस श्री. सुरज चव्हाण, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा. श्री. डॉ. अभिजीत मोरे, तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार आमदार श्री.सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी महायुतीच्या वतीने उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांच्या यशस्वी आणि प्रभावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
📍 मुंबई
महाराष्ट्राचा युवा आवाज आता राष्ट्रीय स्तरावर केंद्राच्या संरक्षणविषयक संसदीय समितीवर खासदार,पार्थदादा अजितदादा पवार यांची निवड ही निश्चितच गौरवास्पद बाब. देशसेवेच्या या नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा.!
@parthajitpawar#dada@mahancpspeaks
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत मा. उमेशजी शेळके यांची अध्यक्षपदी, तर मा. योगेशजी बोरसे व किशोरजी बरकाले यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा.
आपल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील चिमुकलीच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला व मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील. न्याय मिळाला, पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे अधिक सजग राहण्याची गरज आहे.बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.
धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघातून महायुतीच्या वतीने विजयी झालेले आमदार श्री. बसवराज पाटील यांनी आज देवगिरी या निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे निष्पाप चिमुकलीवरील अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. हा निर्णय पीडित कुटुंबासाठी न्यायाच्या दिशेनं उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशा अमानुष आणि विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा मिळालीच पाहिजे.
नंदुरबार जिल्ह्यातील विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरणीय अजितदादांच्या विचारांचा आणि विकासाचा वारसा पुढे नेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
नव्यानं पक्षात प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करते. जनतेच्या हितासाठी आणि सर्वसमावेशक विकासाच्या ध्येयानं आपण सर्वजण मिळून अधिक ताकदीनं काम करू, अशी खात्री आहे.
आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासोबत बैठक पार पडली. यावेळी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेत विविध विषयांवर चर्चा केली. तसंच कारखान्याच्या पुढील वाटचालीसंदर्भात आवश्यक सूचना व मार्गदर्शन केलं.
कारखान्याच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षम व्यवस्थापन आणि कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या उद्देशानं माजी साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांच्यावर कारखान्याच्या कामकाजासाठी मार्गदर्शनाची जबाबदारी सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर आयुक्त म्हणून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि साखर उद्योगातील उल्लेखनीय कार्याचा कारखान्याच्या प्रगतीस निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. कारखान्याची कार्यपद्धती अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि शेतकरीहिताची होऊन सभासद ऊस उत्पादकांना अधिक आर्थिक लाभ मिळावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
याचबरोबर ऊस लागवडीला चालना देण्यासाठी आणि शेतीपूरक उपक्रमांना बळ देण्यासाठी सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन २०० रुपयांचे 'कांडे पेमेंट' वर्ग करण्यात आले आहे. या निर्णयाचं सभासद शेतकऱ्यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केलं.
अनुभवी प्रशासकीय नेतृत्वाचा लाभ आणि शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या या निर्णयांमुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीला अधिक गतिमान, पारदर्शक आणि विकासाभिमुख दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
आज बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी बँकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. बँकेचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं, पारदर्शकपणे आणि सर्वसामान्यांच्या हिताचं होईल, यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलं.
आज बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या सभेत सहभागी होत संघाच्या विविध उपक्रमांचा व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करत समन्वय, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या बळावर संघाचं काम अधिक गतिमान करण्याचं आवाहन केलं.
आज बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची सविस्तर आढावा बैठक घेतली, विविध विषयांवर चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन बाजार समितीचे काम अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचं आवाहन केलं.
आज पल्स पोलिओ अभियानाच्या निमित्तानं पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन जीवनरक्षक थेंब चिमुकल्यांना पाजून या महत्त्वपूर्ण जनजागृती मोहिमेत आपला सहभाग नोंदवला.
पोलिओमुक्त भारताचा मान कायम राखण्यासाठी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस वेळेवर पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. यानिमित्तानं राज्यातील सर्व पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असं आवाहन केलं.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समर्पित भावनेनं कार्य करणारे आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक आणि सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन केलं.
चला, आपण सर्वजण मिळून "एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहणार नाही" हा संकल्प करूया.
📍 बारामती
आज श्री क्षेत्र कन्हेरी येथील श्री मारुतीराय मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी राज्याच्या सुख-समृद्धी, सर्वांगीण विकास तसेच प्रत्येक नागरिकाच्या निरोगी, सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी श्री मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना केली.
📍बारामती
आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले...
आज त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. प्रत्येक भेटीत मन पुन्हा एकदा भरून येतं. काळ पुढे सरकत असला, तरी तुमची उणीव आजही प्रत्येक क्षणी जाणवते. ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही.
आदरणीय दादा, जनतेसाठी जगण्याचा तुमचा विचार, विकासाची तुमची दूरदृष्टी आणि माणसांशी जपलेलं तुमचं नातं हीच माझी प्रेरणा आहे. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत, तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत तुमचा विकासाचा वारसा मी आयुष्यभर जपत राहीन. हीच तुमच्याप्रती माझी खरी कृतज्ञता आणि आदरांजली.
तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहू देत.
आज बारामतीकरांशी आपलेपणाचा संवाद साधला. यादरम्यान त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले. सर्वांच्या अपेक्षा समजून घेत त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वस्त केलं.