माझ्या प्रभागातील शांती सदन चाळीतील मलनि:सारण वाहिनी (Drainage Line) गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आली होती. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन आज माझ्या नगरसेवक निधीतून नवीन मलनि:सारण वाहिनी (Drainage Line) टाकण्याचे भूमिपूजन विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम, शाखा संघटिका अमेयाताई पार्टे व स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
#WardNo114 #RajoolSanjayPatil #Bhandup
आज भांडुपमधील नागरिकांसोबत सुप्रसिद्ध लेखक - दिग्दर्शक श्री. प्रविण तरडे यांच्या विशेष भेटीसह ‘देऊळ बंद २’ हा मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला.
शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर आधारित हा चित्रपट बळीराजाच्या वेदना, संघर्ष आणि वास्तव मांडत उपायांचाही वेध घेतो.
यावेळी दिग्दर्शक श्री. प्रविणजी तरडे, निर्माते श्री. कैलास वाणी, विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर, शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम व सौ. सुनंदाताई वाफारे उपस्थित होते.
या उत्कृष्ट कलाकृतीसाठी संपूर्ण चित्रपट टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
#देऊळबंद२ #PravinTarde #MarathiCinema #Baliraja #Bhandup #शेतकरी #मराठीचित्रपट #DeulBand2
प्रभागातील विकासकामांमध्ये व सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेऊन मला सहकार्य करणाऱ्या आमच्या सहकारी सौ. सुनंदाताई वाफारे, सौ. कावेरीताई नरसाळे व श्री. राजूजी सोनावणे यांचा वाढदिवस शाखेत साजरा करण्यात आला.
यावेळी विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर, नगरसेवक श्री. सुरेशजी शिंदे, शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम, स्थानिक पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
सर्वांना वाढदिवसाच्या औचित्याने शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
#ShivSena #WardNo114 #Bhandup #BirthdayCelebration #ShivSainik
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने नगरसेविका सकीनाजी अयूब शेख व घाटकोपर विधानसभा समन्वयक इम्रानजी शेख यांनी आयोजित केलेल्या‘आदित्य युवा चषक २०२६’ या क्रिकेट स्पर्धेला भेट दिली.
यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते तथा मा. आमदार श्री.आदित्यजी ठाकरे , काँग्रेसचे नेते मा.श्री. नसीमजी खान, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
#AdityaYuvaChashak2026 #BalasahebThackeray #ShivSena #YuvaSena #CricketTournament #Mumbai
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन…!
टेंबीपडा येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय व आदर्श प्रशासनाच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण केले.
#PunyashlokAhilyadeviHolkar #AhilyadeviHolkarJayanti #Bhandup
शासकीय दाखल्यांचे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे मा. तहसीलदार कार्यालय, सर्व संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार…!
या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता आला. यावेळी शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम यांच्या वतीने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर यशस्वी ठरले. नागरिकांच्या सेवेसाठी असे उपक्रम राबवत राहू…!
#शासकीय_दाखले_शिबिर #WardNo114 #RajoolSanjayPatil
Kanjurmarg landfill being ranked the 12th largest methane-emitting waste site in the world is not an achievement — it is a serious warning for Mumbai’s future.
Reports state that the landfill emits nearly 4.9 tonnes of methane every hour, causing severe environmental damage and increasing public health risks for nearby residents who continue to live amidst pollution, toxic air, and unbearable odour.
This is no longer just a local issue — the world is noticing it too.
#Kanjurmarg #Mumbai #MumbaiNews #Pollution #Landfill
रोटरी क्लब या संस्थेमार्फत महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवला जाणारा Rotary Pink Auto हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे…!
आज या उपक्रमांतर्गत ईशान्य मुंबईतील महिलांना Rotary Pink Auto चे हस्तांतर करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, हीच अपेक्षा…!
#RotaryClub #RotaryPinkAuto #WomenEmpowerment #Mumbai #Bhandup #NortheastMumbai
भांडुप येथील HDFC बँकेच्या नव्या शाखेच्या उद्गाटन प्रसंगी उपस्थित राहून या नव्या शाखेच्या औचित्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या…!
#HDFCBank#Bhandup
पुढील पाच दिवस विभागातील नागरिकांसाठी शासकीय दाखल्यांचे विशेष शिबिर…!
विभागातील विद्यार्थी, युवक, महिला तसेच जेष्ठ नागरिकांना विविध शासकीय दाखले मोफत व सुलभ पद्धतीने एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी केदारे चौक येथील जेष्ठ नागरिक कट्टा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला भेट देऊन शिबिराची माहिती घेतली तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर, शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम व पदाधिकारी उपस्थित होते.
विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा...!
#शासकीय_दाखले_शिबिर #WardNo114 #Bhandup #RajoolSanjayPatil #GovernmentCamp #CitizenService #BhandupWest
संपूर्ण ईशान्य मुंबईतील खेळाडूंना क्रिकेट क्षेत्रात निःशुल्क मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत #SayNoToDrugs चा प्रभावी संदेश आयोजक श्री. सय्यद अझरुद्दीन यांनी दिला…!
या भव्य स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या सामन्यांना उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले. यावेळी मा.आमदार श्री. जितेंद्रजी आव्हाड, क्रिकेटप्रेमी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Cricket #MumbaiNorthEast #Vikhroli #SayNoToDrugs #RajoolSanjayPatil
प्रभागातील विविध भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला…!
या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधू…!
#Bhandup#WardNo114#RajoolSanjayPatil