शेती समस्या वाढल्या आहेत. मागे नीटचा पेपर फुटला, CBSE परीक्षेत गडबड झाली, राज्यात कायदा सुव्यवस्था काय थराला गेली हे दिसतंय. पण शिवसेना - ठाकरेनी व त्यांच्या पक्षांनी कुठेही राज्यव्यापी भूमिका घेत सरकारला वेठीस धरणारे आंदोलन केले नाही, आणि आता खासदार फुटले तर दौरे सभा करताय. 😑
From an opponent to a friend over the years. It’s been a pleasure watching you bat and compete against you over so many years but more than that I value our friendship and shared perspectives on the game and beyond. I continue to cherish every time we speak or meet. Wishing you nothing but the best always brother. You’ve done your bit, you deserve to enjoy all of it now and put your feet up. Well done mate, life’s only just begun. ❤️ #KaneWilliamson
खरंतर नेहरूंच्या चुकीच्या धोरणामुळेच NEET चे पेपर लीक झाले आहेत, हे काँग्रेसच अपयश आहे. नेहरूंनी सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.
वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशीख असे ग्रंथ लिहिणारे महान साहित्यिक, विचारवंत, क्षाक्तवीर, स्वराज्याचे दुसरे छत्रपती,स्वराज्यासाठी बलिदान देणारे स्वराज्यवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!💐💐
तुमची गुलामगिरी तुम्ही स्वतः नष्ट केली पाहिजे. स्वतःचा आत्मसन्मान हरवून जगणे हे लांछनास्पद आहे. आत्मसन्मान ही जीवनातील अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. तिच्याशिवाय मनुष्य केवळ शून्यवत होतो.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.♥️
आधुनिक भारतातील अब्राह्मणी प्रवाहाचे सर्वश्रेष्ठ महापुरुष - ज्यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. ज्यांनी स्त्रीपुरूष भेद, जातीभेद, धर्मभेद विरोधात लढा दिला - असे आमचे प्रिय क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त जोतिबा व सावित्रीमाई याना वंदन केले!
मराठवाड्यात वाढत्या शेतकरी आत्महत्या, उत्पादन व उत्पन्न घट, रोजगार नसणे, व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसणे, रोजगार व शिक्षणासाठी तरुणांचे स्थलांतर आदी बाबी जातीआधारित वाद, धार्मिक दंगली तेढ निर्माण करण्यास सहज वातावरण निर्माण करतात. याला राजकारण जितके जबाबदार तितकेच जनतासुद्धा.
आज महान कलाकार निळू फुले यांची जयंती.
नीळकंठ कृष्णाजी फुले उर्फ - निळू फुले , त्यांची मुलगी गार्गी फुले म्हणतात
“बाई वाड्यावर या असं बाबांनी एकाही चित्रपटात म्हटलेलं नाही” ही चूकिची प्रतिमा आताच्या पिढीत केली गेली आहे.
खरंतर निळू भाऊ एक स्वातंत्र्यसैनिक होते, भावा सोबत 10-12 वर्षाच्या वयात "चले जाव आंदोलनात" सहभागी झाले, इंग्रजी पोलिसांचा मार खाल्ला, यासाठी ते येरवड्यात गेले. लहानपणी पासूनच ते प्रखर देशभक्त होते.
चित्रपट सृष्टी मधील कामगारांसाठी निळू भाऊंनी आंदोलन केले. निळूभाऊ महान समाजवादी नेते थोर स्वातंत्र्यसेनानी राममनोहर लोहिया यांचे व साने गुरुजी यांचे अनुयायी होते. निळू भाऊ प्रागतिक विचाराचे समाजवादी कार्यकर्ते होते. अभिनया सोबत सामाजिक भान जपणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दलाचे ते कर्मशील कार्यकर्ते होते.
त्यासोबतच निळू भाऊनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत त्यानी काम करून स्वातंत्र्योत्तर काळात अंधश्रद्धेत पिचलेल्या ग्रामीण व शहरी जनतेच प्रबोधन करण्याच काम केलं.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रहात सहभागी झाले.
गोवा मुक्ती संग्रामात सत्याग्रही साठी भाकरी जमवण्याचे काम केले. मोरारजी देसाईने सावंतवाडी ते गोवा एसटी बंद केल्याने मधु दंडवते यांच्यासोबत आंदोलनात 75 मैल चालले.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात इंदिरा गांधी यांची गाडी अडवली म्हणून पोलीसांचा मार खाल्ला. असे निळू भाऊ आमचे आदर्श आहेत.
साने गुरुजी, शांता शेळके, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, मधु दंडवते, डॉ. श्रीराम लागू, राम नगरकर, जयंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, अशा अनेक दिग्गज लोकासोबत वावरले, काम केलं. चित्रपटात जसे हरहुन्नरी तसेच सामाजिक जीवनात सुद्धा हरहुन्नरी राहिले.
राष्ट्र सेवा दलाच कलापथक चालवल. कलेतून प्रबोधन करण्याचा त्यांचा पिंड होता.
मेकप रूम मध्येही पुस्तक वाचणारा, पुस्तकप्रेमी, सतत वाचन, चिंतन, मनन करणारा एक समाजवादी अवलिया.
आपल्याला वा आजच्या पिढीला निळू भाऊ फक्त चित्रपट पुरते, किंवा चित्रपटात भूमिका निभावलेल्या अय्याश शोषक सरंजामदार रुपात ठाऊक आहेत. पण ते व्यक्तीगत जीवनात अत्यंत संवेदनशील माणूस होते. समाजभान जाणारे कलाकार होते.
निळू फुले याना जयंतीनिमित्त आदरपूर्वक वंदन!
#मराठी #महाराष्ट्र
#Thread
कार्यक्षम आमदार
कुठला होतकरू मुलगा-मुलगी सरकारी पदावर नियुक्ती झाला, की सोशल मीडियावर अभिनंदन करणे; जिल्ह्यात कुठल्या गरीब होतकरू खेळाडूने पदक जिंकले, लगेच अभिनंदन करणे, लगेच भेट घेणे, सत्कार करणे, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करायचा. सोशल मीडियावर “जिल्ह्याचं नाव मोठं केलं, अमूक-तमूक...”
मुळात यात त्यांचा काही रोल नसतो. तो/ती विद्यार्थी-खेळाडू स्वतःच्या जीवावर मोठा होतो. हे निष्क्रिय आमदार यशस्वी झाल्यावर अभिनंदन करायला पुढे येतात. अभिनंदन तर असं करतात की त्या मुलाची फी भरली आहे, शैक्षणिक साहित्य दिलं आहे, खेळाडूला आर्थिक मदत केली आहे, त्याला नोकरीची हमी दिली? कशातच काही नाही. उगाच त्याची पाठ थोपटताना आपलीही पाठ थोपटून घेतात.
तसे आमचे आमदार साहेब फारच सेक्युलर विविध जातीधर्मांचे सण आले की लगेच त्या त्या जातीधर्माचे पेहराव करतात. मुस्लिमात गेलं म्हणजे टोपी घालणे आलंच; टोपी घातली नाही म्हणजे मुस्लिमांचा आदर केल्यासारखं वाटत नाही. बाकी मतदारसंघात जनतेला टोप्याच घातलेल्या असतात. मुस्लिमांच्या समस्यांबाबत काही कर्तव्य नाही. उरूस, इफ्तार पार्टी, ईदमध्ये जाऊन मस्त फळफळावळ, शिरखुर्मा खाणे, सुभानभाई, लतीफभाई, मौलवी साहेबांना मिठ्या घालून मुबारकबाद दिली की झाला मुस्लिमांचा विकास.
आमदार साहेबांची विकासकामे म्हणजे टेनिस बॉल स्पर्धा, कबड्डी स्पर्धा आदी खेळांच्या स्पर्धा भरवणे. महापुरुषांच्या जयंतीत नाचणे, अमूक-तमूक जातीचा त्या त्या रंगाचा झेंडा, शेला पांघरने. महापुरुषांबद्दल चार-दोन लिहून दिलेल्या ओळी फेकणे, असं केलं की झाली जातीय समानता, झाला महापुरुषांबद्दल आदर प्रकट. बाकी मतदारसंघात कुठे जातीय अत्याचार होतो, त्यात काही यांचं काम नाही; कारण अत्याचार करणारा यांचाच खासमखास पदाधिकारी, कार्यकर्ता असतो.
मतदारसंघात विकासकामे करणे म्हणजे गावखेड्यातल्या पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणे; पंचक्रोशीतील दहावे, तेरावे, बारसे' काही काही सोडत नाहीत. क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभात येऊन “हे राजकीय व्यासपीठ नाही” असं सांगून अर्धा तास विरोधकांना आमदार साहेब तासून काढतात.
आमदार साहेबांना जनतेसाठी वेळच वेळ असतो. या बहुमूल्य वेळात ते किराणा दुकान, छोटे सुपरमार्केटचं उद्घाटन करायला जातात. बिचारा भाबडा दुकानदार जीव तोडून पै-पै जमा करून दुकान उभं करतो आणि रिबीन कापायला या कर्तृत्ववान साहेबांना बोलावतो. त्याला वाटतं आमदार म्हणजे कुणी थोर व्यक्तिमत्त्व आहे; पण आमदार साहेब इतके थोर असतात की त्यांना किरकोळसंसुद्धा सामान्य ज्ञान नसतं.
आमदार साहेबांच्या शिक्षणाबद्दल फारसं मतदारसंघात बोललं जात नाही; कारण जनतेला वाटतं, शिक्षित लोक मूर्ख वाटतात आणि अडाणी नेते सुजाण वाटतात. आमदार साहेब एखाद्या कॉलेजला बाहेरून ऍडमिशन घेऊन पदवी घेतात. या पदवीतील कोणत्याही अकादमिक ज्ञानाशी त्यांचा संबंध नसतो. या पदवीने नावापुढे वकिलीचे ‘अॅडव्होकेट’ (अॅड.) केल्याने आमदार साहेब कायद्याचे आपसूकच अभ्यासू होतात; परंतु मतदारसंघात हे सगळे कायदे मोडण्यात त्यांचा आणि त्यांच्या चमच्यांचा मोठा वाटा असतो.
मतदानाची जुळवाजुळव ते अगदी निराळ्या पद्धतीने करतात. प्रत्येक मतदारसंघात मठ, धार्मिक संस्थान, प्राचीन मंदिर असतं. त्या विश्वस्त समितीवर आमदार साहेब नसतील, तर धर्मकार्य झाल्याची तेजोमय भावना कशी निर्माण होईल? हरीनाम सप्ताहात साहेबांचा वावर असतो म्हणजे असतोच; पण साहेबांना एकही अभंग पाठ नसतो. मठावर बाबा, बुवा, स्वामीकडे येणारे भाविक म्हणजे हक्काचे मतदार. पोथ्या, पुराण, प्रवचने, कीर्तने, बैठकीला येणारे भाविक मंडळ म्हणजे हक्काचे मतदार. धार्मिकतेच्या आडून असणारं हेच ते राजकारण.
निवडणूक जवळ आली की आमदार साहेब विकासकामांचा धडाका लावतात. वाडी-वस्तीच्या रस्त्यावर मुरूम टाकणे, पाटाला पाणी सोडणे, इथे-तिथे हायवेवर डांबराचे ठिगळं जोडणे, झेडपी शाळेची, ग्रामआरोग्य केंद्राची थातूरमातूर डागडुजी करणे. ऐन प्रचार मोसमात गावातल्या रिकामटेकड्या पोरांना मांसाहार आणि अल्कोहोलचे गेट-टुगेदर आयोजित करून देणे; ५० चं पेट्रोल टाकणाऱ्या भुरट्या साहेबप्रेमीला ५०० चं पेट्रोल देणे. याबाबत साहेबांची उदार दानशूरता हरिश्चंद्र राजालाही लाजवेल अशी असते.
महागड्या गाड्यांमध्ये कुठून तरी, कोणी तरी आणलेली चटणी-भाकर खाताना “पाऊल थकलं नाही” सारख्या दुःखद गाण्याची रील टाकून जनतेशी हळुवार भावनिक नातं जपण्यात साहेबांचा हात कोण धरेल?
असे आमचे थोर आमदार, जे विविध मंगलप्रसंगी जागोजागी होर्डिंग लावून शहर सुशोभित करण्याचे उदात्त कार्य करतात.
असे आमदार आपण नेहमी-नेहमी निवडून देऊ; ते सरणावर गेल्यावर त्यांचा ‘ग्रेट’ वारसा त्यांच्या मुलांना देऊन आपण घराणेशाही आबाद ठेवू. आपणही महान आणि आमदार साहेबसुद्धा महान.
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश मारले जातात.. त्या मरणाचं उत्सवी समर्थन याच राज्यात घडलं.. त्या राज्यात खरात सारखं पीक जोमाने नाही येणार तर काय होणार..?
आज सबंध महाराष्ट्र थिजला आहे..पण या पश्चातापाला आता काही अर्थ नाही..कारण आपली 'तेवढं चालतंय रे' वृत्ती..❤️
#महाराष्ट्र
सयाजीराव गायकवाड - सावित्रीमाई फुले - महात्मा फुले - शाहू महाराज याना वाटलं - शाळा काढू - बहुजन शिक्षण घेतील स्वतःला प्रागतिक विचाराचे करतील - पण त्याना काय माहित होतं! - पुढे चालून लोकं - अशोक खरात सारख्या कर्मकांड अंधश्रद्धा - तंत्रमंत्र करणाऱ्या बाबा बुवाच्या आहारी जातील..💔
मराठी संस्कृती मधे गुढी उभारणे म्हणजे आनंद उत्सवाचे प्रतीक आहे. संत तुकाराम महाराजांचा गोकुळावरच्या अभंगात गुढीचा उल्लेख आहे
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा
बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी
गुढिया' तोरणें । करिती कथा गाती गाणें
तुका ह्मणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदे
कौतुकास्पद ! लग्नानंतर रश्मिका-विजयचा मोठा निर्णय, तेलंगणातील 44 सरकारी शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर
लग्नानंतर रश्मिका आणि विजय यांनी तेलंगणातील 44 सरकारी शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर करत मोठा सामाजिक निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळणार आहे.
आपल्या मूळ गावी सत्यनारायण पूजा करून त्यांनी गावकऱ्यांसाठीही मदतीचा निर्णय घेतला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही शिष्यवृत्ती प्रामुख्याने ९ वी आणि १० वीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी असेल.
तेलंगणातील नगरकर्नूल जिल्ह्यातील अचंपेट विभागातील ४४ शाळांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
ही मदत 'देवरकोंडा चॅरिटेबल ट्रस्ट'च्या (Deverakonda Charitable Trust) माध्यमातून दिली जाईल.
ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा
माता पिता सखा शिवभूप तो !
बहुजनप्रतिपालक , शूद्रातिशूद्र भूषण
महाराष्ट्राचे मानबिंदू, मऱ्हाटा पातशहा
हिंद भूमीचे मुकुटमणी ! हिंदवी स्वराज्य संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन! #शिवजयंती
जर आमच्या नेत्यांनी आणि जनतेने खरोखर छत्रपती शिवरायांचं जीवन वाचलं असतं आणि त्यांना समजले असते, तर आजचा महाराष्ट्र वेगळा असता. एकीकडे हजारो झाडं तोडली जातायत, दुसरीकडे स्लॅब पडून जीव जातायत, भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली जे लोक आहेत त्यांना सत्तेत सामील करून घेतले जात आहे! पैशाने मतं खरेदी करणारे, गुंडांद्वारे निवडणुका लढवणारे नेते, शेतकरी आत्महत्या करतोय आणि नेते फक्त व्यासपीठावरून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय!' च्या घोषणा देतायत!
शिवरायांच्या मावळ्यांची निष्ठा आणि त्याग यावरच त्यांचं अविश्वसनीय पराक्रम उभं होतं—ते सर्व साधे शेतकरी होते! आता तर शिवरायांची प्रतिमा बनवतानाही भ्रष्टाचार केला, ज्यामुळे आठ महिन्यातच ती कोसळली! ही आहे त्यांची शिवरायांप्रती भक्ती? आजच्या महाराष्ट्रात साध्या माणसाला किंमत नाही, शेतकऱ्यांना तर नाहीच!
म्हणून फक्त 'जय जयकार' करू नका! त्यांचं जीवन वाचा, समजून घ्या... छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!