सत्ताधाऱ्यांकडून अनधिकृत आरक्षण लादून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम हद्दीतील खेळाचे मैदान आणि क्रीडा संकुलासाठी राखीव असलेली जागा हडप करून ती मोठ्या विकासकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
या षडयंत्राचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंधेरी पश्चिम विभाग अध्यक्ष श्री. मनीष धुरी व प्रशांत राणे विभाग अध्यक्ष (वर्सोवा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिक आणि खेळाडूंच्या सहभागातून के-पश्चिम वॉर्ड अधिकारी कार्यालयाबाहेर अनोख्या पद्धतीने क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने आयोजित करण्यात आले.
यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंधेरी (प.) येथील महानगरपालिकेचे कार्यालय गाठून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन देत, खेळाच्या मैदानाची आणि क्रीडा संकुलाची जागा विकासकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवावा, अशी मागणी