तुमच्या मतांच्या घाणेरड्या राजकारणाला चपराक लावत "मोर्चा मराठी मनाचा " निघाला आहे !!!
लाख अटक करा ,करोड रस्त्यावर दिसतील...
ही आहे मराठीची ताकद 💪🏻🔥
फडणविस तुम्ही परप्रांतीयांसाठी मराठी माणसाला अटक करताय हा महाराष्ट्र पाहतोय.
जो मराठी विरूध्द उभा ठाकला तो संपला हाच इतिहास आहे
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो.
राज ठाकरे ।
आज पुण्यात 'मुंबई तक' या डिजिटल वृत्तवाहिनीच्या 'जय हिंद उत्सव' या कार्यक्रमात, या डिजिटल वृत्तवाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी आणि ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्री. केदार शिंदे यांनी माझी मुलाखत घेतली. विषय अर्थात महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस हा होता. या मुलाखतीची चित्रफीत.
साभार :- मुंबई तक
भाजपवाल्यांनो पाहताय ना ज्या पक्षाकडे भिक मागून तुम्ही निवडणूक लढलात,काठावरचे उमेदवार पास करून घेतले.नंतर त्याच पक्षाला,राजसाहेबांना शुन्य आमदार वाला पक्ष आणि खालच्या भाषेत टिका करत सुटलात
त्या हाऊस अरेस्ट चं दुकान बंद पाडलं आम्ही 💪🏻🔥
तुमचा मालक पुरणपोळी खात सुस्तावलाय.खीक😊
महाराष्ट्रासाठीएकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजेअसं नाही मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकत जसे तामिळनाडू मध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात तसं मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे
ह्या माणसाच्या लाॅजीकप्रमाणे फाडणविसांना चोर म्हणता येईल का ? सत्तर हजार करोड च्या गफल्यात भागिदारी मिळवून अजित ला सोबत घेतलं असेल ....काय म्हणता भक्तांनो?
आवरा स्वतःला नाहितर आम्ही वेगळ्या पध्दतीने मारा करावा लागेल जो तुम्हाला झेपणार नाही.
प्रस्ताव पाठवला नसतांना खोट बोलता 😡
माननीय आशिष शेलार यावर प्रकाश टाकतील का ?
अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समिती ने हिंदी सक्ती ची शिफारस केलेली नव्हती ...
मग दिल्ली ला खुश करायला हिंदी ची सक्ती का ?
नवी मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेचे हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय फाडून त्याची होळी करत निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत च्या भाषा विषयक धोरण अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य केल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबईच्या वतीने आज शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाच्या प्रती फाडून त्यांची होळी करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी राज्य शासनाच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला ...