।।श्री स्वामी समर्थ ।। हाच श्वास आणि ध्यास.. दुर्ग प्रेमी..शिव भक्त..श्वास मार्शल आर्ट.. गड-किल्ले, निसर्ग आणि भ्रमंती ह्यात रमणारा मी मराठी उद्योजक..!
नेत्यांची तुलना करताना त्यांना मिळालेली परिस्थिती, काळाची गरज
आणि उपलब्ध संसाधने यांचाही विचार करावा लागतो.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४७ मध्ये भारताची धुरा स्वीकारली,
तेव्हा देश फाळणीच्या भीषण वेदना सहन करत होता. लाखो
निर्वासितांचे पुनर्वसन, सांप्रदायिक हिंसाचार, अत्यंत कमी
औद्योगिकीकरण, मोठ्या प्रमाणातील दारिद्र्य, निरक्षरता आणि
कमकुवत पायाभूत सुविधा अशा अनेक संकटांनी भारत वेढलेला होता.
देशाकडे मजबूत औद्योगिक आधार नव्हता, पुरेशी वीज नव्हती,
आधुनिक शिक्षणसंस्था नव्हत्या आणि लोकशाही व्यवस्था प्रत्यक्षात
उभी करण्याचे मोठे आव्हान होते.
अशा परिस्थितीत नेहरूंनी लोकशाही संस्थांची पायाभरणी केली,
नियोजन आयोगाची स्थापना केली, मोठी धरणे, पोलाद कारखाने,
वैज्ञानिक संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण केंद्रे उभारण्यावर भर
दिला. आज भारताच्या औद्योगिक, वैज्ञानिक आणि प्रशासकीय रचनेचा
जो पाया दिसतो, त्यातील अनेक महत्त्वाचे घटक त्या काळात उभे
राहिले.
दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाचे नेतृत्व स्वीकारले, तेव्हा
भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या दिशेने
वाटचाल करत होता. देशात स्थिर लोकशाही व्यवस्था, निवडणूक
आयोग, सर्वोच्च न्यायालय, सशस्त्र सेना, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग,
महामार्गांचे जाळे, विमानतळ, बँकिंग व्यवस्था आणि वाढत्या
अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आधीच अस्तित्वात होता. माहिती तंत्रज्ञान,
दूरसंचार आणि जागतिकीकरणामुळे भारताची आर्थिक क्षमता
लक्षणीयरीत्या वाढलेली होती.
याचा अर्थ असा नाही की मोदी सरकारसमोर आव्हाने नव्हती.
जागतिक आर्थिक स्पर्धा, डिजिटल परिवर्तन, रोजगारनिर्मिती, राष्ट्रीय सुरक्षा, कोविड-१९ महामारी आणि पायाभूत सुविधांचा वेगवान विस्तार यांसारख्या वेगळ्या स्वरूपाच्या आव्हानांना सामोरे जावे लागले. परंतु
या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या
संस्थात्मक आणि आर्थिक पायाभूत सुविधांचा आधार उपलब्ध होता.
म्हणूनच नेहरू आणि मोदी यांची तुलना करताना केवळ कोणाच्या
काळात किती विकास झाला किंवा कोणत्या सरकारने किती प्रकल्प
सुरू केले यावर चर्चा पुरेशी ठरत नाही. एकाने राष्ट्र उभारणीची सुरुवात
केली, तर दुसऱ्याने त्या राष्ट्राला अधिक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
दोघांचे कार्य त्यांच्या त्यांच्या काळातील परिस्थितीच्या संदर्भातच
समजून घ्यावे लागते.
इतिहासातील कोणत्याही नेत्याचे मूल्यमापन हे पक्षीय
आवडीनिवडींपेक्षा वस्तुस्थिती, उपलब्ध संसाधने आणि त्याने सामोरे
गेलेल्या आव्हानांच्या आधारे केले, तरच ते न्याय्य ठरते.
"नेत्यांची तुलना त्यांच्या यशानेच नव्हे, तर त्यांनी कोणत्या परिस्थितीत
काम केले यानेही केली पाहिजे."
आज महाराष्ट्रात शेकडो अधिकारी काम करत आहेत पण वर्षानुवर्षे फक्त एकच अधिकाऱ्याची बदली आणि कामाचा धडाका पाहायला मिळतो मग बाकीचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य माणसाला पडतो.
किमान जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटतं नसेल का ह्या अधिकऱ्यांना मुंडे साहेबांचे काम पाहून म्हणजे किमान घरी आरशात स्वतःला बघून नसेल वाटतं का मी सुद्धा हे काम करू शकतो मी सुद्धा कोणाच्या ताटाखालचे मांजर न बनता कोणाच्या दबावाखाली न येता समाजासाठी माझ्या राज्यासाठी काहीतरी करू शकतो.
मी ज्या खुर्चीवर बसलोय त्याने लाखो लोकांचे जीवनमान बदलू शकतो हे कधीतरी मनात येतं नसेल का ह्या अधिकारी लोकांच्या
#विचार_सामान्यांचे
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।