अजितदादांच्या विमान अपघाताबा���त दिल्लीत काही खासदारांना भेटून चर्चा करत असताना त्यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सोनिया गांधी मॅडम आणि काँग्रेसचे अ��्यक्ष माननीय खर्गे साहेब यांचीही भेट झाली. यावेळी कालच्या भेटीत झालेली सविस्तर चर्चा खर्गे साहेबांनी सोनिया गांधी मॅडम यांना सांगितली आणि हा अत्यंत गंभीर विषय असल्याचं नमूद केलं. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम साहेब आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री माननीय दिग्विजय सिंह साहेब यांनाही भेटून अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा विषय थोडक्यात समजू�� सांगितला. या दुर्घटनेबाबत या सर्व नेत्यांनी चिंता व्यक्त केली. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व नेते मंडळी नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वास आहे.
@kharge
@PChidambaram_IN
@INCIndia
#justice_for_AJIT_DADA