#शिवराज्याभिषेक
" चार पातशाह्या उरावर भाले रोवून उभ्या असतानाही मराठी राजा छत्रपती झाला !
सामान्य गोष्ट नव्हे !
साडे तीनशे वर्षांचे सुतक फुटले !
साऱ्या जखमा बुजल्या !
सारे अपमान धुवून निघाले !
सावलीसाठी विशाल छत्र उघडले गेले !
मुलाबाळांस,लेकीसूनांस,शेतकऱ्यास हक्काने रुसावयास जागा निर्माण झाली!
अवघ्याना आजोळ-माहेर लाभले !
सृष्टी डोलू लागली !
सह्याद्रीला हर्षवायू झाला !
समुद्रमंथनात देवांनाही मिळाले नाही,असे अपूर्व रत्न महाराष्ट्राला मिळाले - सिंहासन !
केवढा हा प्रचीतीचा आनंद !
माझा राजा छत्रपती झाला..!!! "
The Power Of Continuous Learning:
“I constantly see people rise in life who are not the smartest, sometimes not even the most diligent, but they are learning machines.”
“They go to bed every night a little wiser than they were when they got up. And boy does that help, particularly when you have a long run ahead of you.”
“Worldly wisdom is mostly very simple. There are only a few big ideas in history, and you just need to learn them.
If you don’t keep learning, other people will pass you by. Temperament alone won’t do it, you need a lot of curiosity for a long, long time.”
“Develop into a lifelong self-learner through voracious reading; cultivate curiosity and strive to become a little wiser every day. That is the game. And if you play it, you win.”
— Charlie Munger, USC Law School Commencement (2007)
मी मराठीत वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वात आवडलेलं पुस्तक — मंतरलेले दिवस 📖
मराठी साहित्यातील प्रतिष्ठित नाव गदिमा यांचं आत्मचरित्र!
हे पुस्तक वाचताना स्वतःच्या बालपणाच्या आठवणी जाग्या होतात
आणि सगळ्यात खास म्हणजे — आत्मचरित्र वाचतोय असं अजिबात वाटत नाही 🙂
#मंतरलेलेदिवस#गदिमा
लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळताना आपण कधीच घड्याळ बघून खेळलो नाही. दोन विटांचे स्टंप्स आणि लाकडी फळी घेऊन आपण जेव्हा मैदानात उतरायचो, तेव्हा विश्व थांबलेलं असायचं. बॅटिंग करताना समोरून येणारा तो एक 'चेंडू' हेच आपलं पूर्ण विश्व असायचं. ना कालच्या पराभवाची आठवण, ना उद्याच्या शाळेची चिंता. आपण पूर्णपणे त्या एका 'क्षणात' विरघळलेलो असायचो.
आज आपण मोठे झालो. टर्फवर पैसे भरून खेळू लागलो. पण खेळतानाही आपलं लक्ष घड्याळावर असतं - "अरे, आपली वेळ तर संपत नाही ना आली."
सिक्स मारून झाल्यावर एका क्षणासाठी डोक्यात फोनचे नोटिफिकेशन येतात, एक इनिंग संपली तरी मधल्या एका मिनिटात आऊटलूक तपासून बघितल्या जातो.
आज आपण धावतो, पण आनंद घेण्यासाठी नाही, तर फिटनेस ट्रॅकरवरचे 'स्टेप्स' मोजण्यासाठी. शरीर मैदानात असतं, पण डोकं मात्र कामाच्या व्यापामध्ये अडकलेलं असतं.
आपल्याला वाटतं की ते बालपण होतं म्हणून त्यात जादू होती म्हणून आपण निश्चिन्त जगात होतो. पण खरं तर, ती जादू आपण त्यावेळी फक्त 'वर्तमानात' जगत होतो म्हणून होती. लहान मूल कधीच भविष्याचा विचार करून त्रागा करून घेत नाही, भूतकाळ तर ते कधीच विसरलेलं असतं. ते खेळताना फक्त खेळत असतं, हसताना फक्त हसत असतं. त्या एकाग्रतेमध्येच, आहे तो क्षण जगण्यातच खरा आनंद दडलेला असतो.
आपण मोठे झालो आणि 'मल्टीटास्किंग' च्या नादात एका वेळी हजार विचार करायला लागलो. म्हणूनच, आज आपल्याकडे सगळं असूनही तो जुना आनंद हरवलाय. आज आपण फिरायला गेलो तरी तिथे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात व्यस्त असतो. आपण शरीराने तिथे असतो, पण आपलं मन मात्र 'लोक काय म्हणतील?' किंवा 'किती लाईक्स येतील?' यात अडकलेलं असतं. आपण शरीराने मोठे झालो आणि मनाने भविष्याच्या चिंतेत कैदी झालो.
मित्रानो, लहानपणीची, आहे तो क्षण जगण्याची जादू कुठेही गेलेली नाही. ती आजही तुमच्यातच आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं काम, तुमचा छंद किंवा तुमचं नातं घड्याळ आणि फोन न बघता जगायला शिकेल, त्या दिवशी तुम्हाला पुन्हा त्या बालपणीच्या आनंदाची अनुभूती येईल.
बालपणातली ती जादू परत मिळवायची असेल, तर घड्याळ आणि मोबाईल बाजूला ठेवा. उद्याच्या चिंतेची 'विकेट' पडू द्या, तुम्ही फक्त आजच्या 'बॅटिंग' वर लक्ष द्या!
Five of my favourite quotes which I apply in my personal and professional life-
"It only takes a handful of big winners to make a lifetime of investing worthwhile." Peter Lynch
“In the stock markets, a small percentage of people end up being successful in the long run, whereas the majority of people, in spite of being successful in the short run, end up losers in the long run” Parag Parikh
“The bulk of your professional success comes from doing one task exceptionally well.”
From the book “Deep Work”
“The big money is not in the buying and selling, but in the waiting." Charlie Munger
"Anyone who stops learning is old, whether at twenty or eighty. Anyone who keeps learning stays young. The greatest thing in life is to keep your mind young." Henry Ford
Your favourite quote?