म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजीव जयस्वाल जी यांच्या समवेत भारत नगरमधील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर बैठक घेतली.
बैठकीत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले :
✅ टाटा कॉलनी ट्रान्झिट कॅम्प – इमारत तयार असूनही काही नागरिकांच्या कागदपत्र पडताळणीमुळे घरांचा ताबा रखडला आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र नागरिकांना लवकरात लवकर घरे देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
✅ भारत नगरमधील ट्रान्सफर प्रक्रिया – अनेक वर्षांपासून बंद असलेली ट्रान्सफर प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत जयस्वाल साहेबांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
✅ म्हाडा सर्विस चार्ज – भारत नगरमध्ये आकारण्यात येणाऱ्या वाढीव सर्विस चार्जबाबत नागरिकांच्या तक्रारी मांडल्या. यासंदर्भात म्हाडा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे मान्य केले.
वांद्रे पूर्वमधील प्रत्येक गृहनिर्माण प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.
६ खासदार गेले… कारण म्हणे आता विकासाला वेग येणार!
चला मग वाट पाहूया…
हिंगोली - हाँगकाँग
परभणी - जर्मनी
धाराशिव - दुबई
बाकी फक्त एवढंच लक्षात ठेवावं -
गद्दारीचं कारण विकास असेल,
तर विकासाचा हिशोबही एक दिवस द्यावाच लागतो.
'जेंव्हा सत्ता आवाज दाबू लागते तेंव्हा बोलणे हा पर्याय नसतो तर जबाबदारी असते…'
हेच अधोरेखित करणारा डॉक्टर साहेबांचा हा व्हिडिओ अत्यंत प्रेरणादायी आणि दिलासादायक आहे…जेंव्हा सत्तेतील आणि विरोधातले नेते सर्वसमान्याचा आवाज उठविण्यास अपूर्ण पडतात तेंव्हा सर्वसामान्य माणसं स्वतःच स्वतःचा आवाज बुलंद करतात, याचा हा बोलका पुरावा...!
#जनतेचाआवाज #VoiceOfPeople #Democracy #RaiseYourVoice
आज मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या समवेत वांद्रे पूर्व मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या विषयांसंदर्भात बैठक पार पडली.
• वांद्रे पूर्व स्थानक परिसर सुशोभित करून ‘स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम’ (SATIS) प्रकल्प तातडीने राबवावा
• गोळीबार रोड, खार स्थानक परिसर व वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवून रस्ते नागरिकांसाठी मोकळे करावेत तसेच ‘वन साईड पार्किंग’ची अंमलबजावणी करावी
• विजय नगर रस्ता, साईबाबा रोड, मधुसूदन काळेलकर मार्ग आदी डीपी रस्त्यांचे रुंदीकरण करून विस्थापितांना राज्याच्या पीएपी धोरणानुसार वांद्र्यातच पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत
• टीचर्स कॉलनी स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी उभारण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली
महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून लवकरच प्रत्यक्षात परिणाम दिसतील, अशी अपेक्षा आहे.
सदर बैठकीस वांद्रे पूर्व मतदारसंघातील नगरसेविका पूजा महाडेश्वर, श्रवरी परब, रोहिणी कांबळे, प्रज्ञा भुतकर, वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिकेचे डीएमसी, एएमसी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Met Municipal Commissioner Ashwini Bhide today to discuss several important issues concerning Vandre East constituency.
Key demands raised during the meeting:
• Immediate implementation of the SATIS project and beautification of the Vandre East railway station area
• Removal of encroachments from Golibar Road, Khar station area and the Western Express Highway service road, along with implementation of one-side parking to ease traffic congestion
• Widening of DP roads including Vijay Nagar Road, Sai Baba Road and Madhusudan Kalelkar Marg, while ensuring displaced residents are rehabilitated within Vandre as per the PAP policy
• Reiterated the demand for an electric crematorium at Teachers Colony crematorium
The Commissioner directed officials to take immediate action, and I am hopeful that visible progress will be seen soon.
Corporators Pooja Mahadeshwar, Shravari Parab, Rohini Kamble, Pradnya Bhutkar, senior traffic police officials and concerned BMC officers were also present during the meeting.
शाखा क्र. ९३ येथे आयोजित ‘जनता दरबार’मध्ये नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या सेवेसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध. 🚩
नेहमीप्रमाणे आज आयोजित ‘जनता दरबार’ मध्ये बीएमसी, म्हाडा, एसआरए, पोलीस तसेच इतर नागरी समस्यांसंदर्भात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या.
Participated in the Commonwealth Parliamentary Association (CPA) India Region Zone VII Conference in Panaji.
Spoke on the Role of young legislators towards Viksit Bharat 2047. Young public representatives must focus not only on policy discussions, but on effective implementation. Strengthening infrastructure, promoting skilling, generating employment, enabling enterprise, leveraging technology in governance, and ensuring development reaches the last citizen.
Grateful to the organisers and fellow colleagues for the meaningful exchange of ideas and perspectives.
आजच्याच दिवशी 'बॉम्बे'चे मुंबई झाले...
मराठी स्वाभिमानाचे एक सुवर्णपान!
४ मे १९९५ रोजी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या शहराला ही ओळख मिळाली. हा केवळ नावातील बदल नव्हता, तर मराठी अस्मितेचा विजय होता. साहेबांच्या आठवणींना आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!
पालकमंत्री आशिष शेलारजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा-निहाय महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठक पार पडली. या बैठकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातील पुढील मुद्दे मांडले:
• ज्ञानेश्वर नगर ते बी.के.सी. मेट्रो स्थानकाकडे जाणारा रस्ता नव्याने विकसित करून वाहतुकीसाठी खुला करणे
• वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरात SATIS (Station Area Traffic Improvement Scheme) प्रकल्प राबवणे
• वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व्हिस रोडवरील दुहेरी पार्किंग बंद करून वाहतुकीसाठी अडथळे दूर करणे
• टी.पी.एस. रोड क्र. 11 ते गोलिबार नाका, सांताक्रूज (पूर्व) मार्गावरील डीपी रोड विकसित करणे
नसरापूर घटनेचा निषेध🏴
ही फक्त एक घटना नाही, तर आपल्या समाजातील सुरक्षेवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
आरोपीला फाशी झालीच पाहिजे.
@uddhavthackeray@AUThackeray
आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी कल्याण-डोंबिवलीतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांचा उत्साह, निष्ठा आणि संघटनशक्ती हीच आपली खरी ताकद आहे.
राज्यावर कर्जाचा बोजा ९ लाख कोटींपेक्षा जास्त आणि महायुतीने विकासक आणि कंत्राटदारांची थकवलेली देणी आहेत ९६,४०० कोटींची!
विकासक आणि कंत्राटदारांनी आता ७ एप्रिल पासून सगळी विकासकामे बंद करण्याचा इशाराही दिलाय. म्हणजे एकीकडे आर्थिक संकट आणि त्यात ऐन पावसाळ्याच्या आधी विकासकामं अर्धवट पडण्याची भीती!
महायुतीकडे आर्थिक नियोजन नाही, की डोक्यावर असलेल्या कर्जाची चिंता नाही. जमेल तेवढ्या पैशांची जाहिरातबाजीसाठी उधळपट्टी करायची आणि कराच्या रूपात महाराष्ट्रातील जनतेवर भार टाकायचा..! एवढचं गणित सध्या जुळून येतंय!
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आणणारं हे बोगस नियोजन तुम्हाला मान्य आहे का?
जय हनुमान 🚩
वांद्रे पूर्व विधानसभेतील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या मंगल सोहळ्यांमध्ये सहभागी होता आले याचा मनापासून आनंद आहे.
आज नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संघटन बळकट करत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचा निर्धार अधिक दृढ झाला.