भीमनवार यांनी गेल्या वर्षी हा 2.65 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. हे करोडोंच्या मालमत्ता घेतात, मुलं विदेशात शिकवतात. चांगले आहे. पण दुसरीकडे पेपर लिकमुळे, गरिबीमुळे सामान्य मुलं जीव देतात. सत्ताधारी, अधिकाऱ्यांच्या या लक्झरीयस लाईफकडे पिचलेली जनता नेपोटिजम या अर्थाने बघते. #MPSC
आज तरुणांवर होणारा अन्याय-अत्याचार बघितला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही...
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
#CJPProtest #JantarMantar #NEETStudentProtest #लोकशाही #न्यायव्यवस्था #संविधान
गद्दारी मराठी मुलखा मधे दगडावर पण वाढते
कितीतरी स्वराज बनल्यावर पातशाहीसाठी लढत होते.
शिंदिया तर औरंगजेबच्या सेनेत औरंग्या मरेपर्यंत होते. नंतर स्वराज्यात आले … सरंजाम गाड्या वाचव्याला कुणाच्या पुढ्यात टांगा वर करतात
लढले रयती मराठेच !!
महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार
शिवसेना उबाठा ९ खासदार
राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार
एकूण ३१ खासदार आहेत
देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ बांडगुळे कुठे आहेत?
आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री.प्रशांतदादा जगताप यांची पुणे शहर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा ! 💐💐
@JagtapSpeaks@INCMaharashtra
कोकणातील आंबा, काजू उत्पादकांना उचित नुकसानभरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांना मुंबईत पोलीसांनी फरफटत नेल्याची दृश्ये अतिशय संतापजनक आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे नेते विनायक राऊत,रासपचे महादेव जानकर आदींना देखील अटक करण्यात आली आहे. हे सर्व आंदोलक कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शेतकरी, कष्टकरी समूहाचे प्रश्न मांडणे हा आता गुन्हा आहे का? सरकारने केलेल्या या कारवाईचा निषेध.
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
लोकसभेनं परवा एक निर्णय घेतला. तो तसा आंध्र प्रदेशशी संबंधित असला तरी मराठी माणसानं त्याकडे सावधपणे बघितलं पाहिजे.
"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील आणि त्यात कधीही, कुठलाही बदल होणार नाही" अशा आशयाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं.
वास्तविक राज्यांच्या सीमा बदलणे, क्षेत्र कमी-जास्त करणे, नाव बदलणे किंवा नव्या राज्यांची निर्मिती करणे इतकेच अधिकार लोकसभेला आहेत. (भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३) परंतु राज्यांची राजधानी कुठली असावी ह्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. तो अधिकार राज्यांवर सोडला आहे.. तरीही हा निर्णय घेतला गेला.
आपल्याला काय करायचंय, तो आंध्रच्या लोकांचा प्रश्न आहे असं मराठी माणसानं म्हणू नये. त्याच्या राजकारणातही आत्ता जाण्याचं कारण नाही.
फक्त, असा प्रघात पडणं चूक आहे.
कारण, तसं झालं तर एका लोकसभेच्या सत्रात मुंबईची "राष्ट्रीय आर्थिक क्षेत्र" म्हणून घोषणा होईल, दिल्लीच्या "राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" सारखी. मुंबईचं कौतुक होईल आणि सांगितलं जाईल, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणून ते केंद्रशासीत करतो आहोत.. मग हे ही सांगितलं जाईल की हा खरं तर महाराष्ट्राचाच गौरव आहे ! आणि, मग आपल्या हातातून आत्ता मुंबई जेव्हढी आहे ती ही निसटून जाईल.
त्यामुळे, मराठी माणसा, मराठी माणसा,
सावध ऐक, पुढच्या हाका !!
#मुंबई #महाराष्ट्र #federalism
मोहित कंबोज सारख्या माणसाच्या मुलीच्या वाढदिवसाला देवेंद्र फडणवीस आणि शेलार वगैरे असणं समजू शकतो... पण तिथं धीरज देशमुख, राज ठाकरे आणि यातही आदित्य ठाकरे?
हे तुमचं मराठी माणसाचं राजकारण? बर मराठीचं सोडा, पण हा माणूस तुमच्याशी आणि तुमच्या पक्षाशी कसा वागला आहे, याचं काही भान?
उद्धव ठाकरेंनी निरोपाच्या भाषणाचा सुरेश भटांच्या कवितेनं शेवट केला.. ती कविता..
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
मी कुणाला कळलोच नाही…!
मी कुणाला कळलोच नाही…!
- सुरेश भट
The Supreme Court has ruled that a person who professes a religion other than Hinduism, Sikhism or Buddhism cannot be recognised as a member of a Scheduled Caste.
A bench of Justices P. K. Mishra and N. V. Anjaria ruled that conversion to any other religion results in the loss of Scheduled Caste status.
The Supreme Court upheld the earlier decision of the Andhra Pradesh High Court which held that individuals who convert to Christianity and actively profess it cannot retain their Scheduled Caste (SC) status.
आजच्या पवित्र दिवशी, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.
सकाळी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन, आपल्या लाडक्या राजासमोर नतमस्तक झालो आणि त्यांना मानाचा मुजरा केला.
शिवजयंतीच्या या शुभ प्रसंगी, सर्व शिवभक्त आणि शिवप्रेमींना मनापासून हार्दिक शुभेच्छा!
जय शिवराय! 🚩
काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांनी बोलत राहावे
आणि आपण फक्त ऐकत राहावे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्यासोबत संवाद साधताना हा अनुभव नेहमीच येतो
संयत शब्द, ठोस तथ्य आणि सखोल वैचारिक मांडणी.
आजच्या गोंगाटी राजकारणात अशी चर्चा म्हणजे
खरी वैचारिक
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाशी केली.
ही अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध नोंदवत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी.
#MNSAdhikrut
या आहेत मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद. राज्यातल्या कुठल्याही केबिन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असतात. पण यांनी टिपू सुल्तानचा फोटो लावलाय.
ज्या संविधानामुळे तुम्हाला उपमहापौर होण्याचा मान मिळाला.. ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा ज्या समाजवादाच्या नावावर तुम्ही राजकारण करताय त्या महात्मा गांधी , महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज अश्या महान व्यक्तिमत्वाची निवड अधिक सकारात्मक संदेश देणारी ठरली असती.