लसीकरण प्रमाणपत्र व्हाट्सएप वर मिळविण्यासाठी सरकारकडून एक क्रमांक देण्यात आला आहे.
◆क्रमांक जतन करा : +91 9013151515
◆ या क्रमांकावर 'covid certificate' असा व्हाट्सएप मेसेज पाठवा.
◆ त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो एन्टर करा.
◆ प्रमाणपत्राची पीडीएफ कॉपी मिळेल.
Traffic Chaos at Deccan Chowk: @PuneCityPolice Inaction Raises Questions @CPPuneCity
📍 Location: Khanduji Baba Chowk, Deccan
🕒 Time: 10:15 PM, 31st December 2024
Punekar News observed severe traffic mismanagement at Deccan Chowk, with triple-seat riding and congestion creating havoc. Despite the presence of traffic police just 50 meters away, no action was taken to address the chaos.
🎥 Video report by @TikamShekhawat
What are your thoughts on this? Should stricter action be enforced? 🚦
#PuneNews #TrafficChaos #NewYearsEve #Pune #NewYear2025
काल काही कामानिमित्त दुपारी एक वाजता सारसबागेत जाणे झाले.
पार्किंगची सोय महालक्ष्मी मंदीराच्या बाजुला असल्याने तिथे गाडी पार्क केली आणि FOB वरून मंदीराच्या दिशेने निघालो...
जातांना मंदीराच्या भागातील पायऱ्यांच्या टप्पा दोन वर सोळा सतरा वर्षाचे कपल चुंबनावस्थेत आढळले. त्याला हटकले असता नाव न सांगता हिंदी मध्ये "जा रहे है हम, जा रहे है हम" असे उत्तर देत तेथून पळून गेले.
मंदीर प्रशासनास या ब्रीजवरील बाटल्यांचा आणि प्लास्टीकचा कचरा याबाबत माहीती दिली तसेच या प्रकाराबद्दलही माहीती दिली.
परत येतांना पुन्हा तोच प्रकार दुसरे एक कपल तिसऱ्या टप्प्यावर करतांना आढळले. यांना मात्र हटकल्याने देखील फरक पडला नाही.
आपली वर्दळ मंदीरात कमी असल्याचे हे परिणाम आहेत. गड किल्ल्यांवर देखील आपली वर्दळ कमी असल्यानेच मजारी आणि अतिक्रमणे उभी राहात आहेत.
याबाबत आपण एक मोहिम सुरू केलेली आहेच. त्याचे दृष्य परिणाम लवकरच समोर येतील.
@PMCPune या ब्रिजवरील स्वच्छतेबाबत जानेवारीमध्ये देखील आपल्याला टॅग केले होते. आता समोर येऊन जाब विचारू..!
@mohol_murlidhar@SunainaHoley@DheerajGhate@PunePolice4U@BJP4PuneCity@Core_punekar@CPPuneCity@Priiyam@PrakashGade13
🚨उद्या #पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज दोन्ही पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे.
पालखी लाईव्ह GPS ट्रॅकिंग,पालखी मार्ग,बंद रस्ते,पार्किंग इत्यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा 👇🏼https://t.co/ws4C3vbd84
वसईत तरुणीची तरुणाकडून पान्याने डोक्यात वार करून हत्या आरोपी यादव परप्रांतीय इथे नागरिकांनी बघ्याची भुमिका घेतली म्हणता पण अशी कृत्ये जी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून होतात बाहेरून येणाऱ्या या लोकांची जर त्यांच्या राज्यात पार्श्वभूमी तपासली तर हे सर्व गुन्हेगार आहेत
नमस्कार मित्रांनो,
सायकल प्रेमी मित्रांसाठी थोडं सायकल बद्दल.
जेव्हा आपण सायकल विकत घेतो त्यावेळेस आपण प्रथम तिची किंमत किती हे बघतो. सायकलची किंमत ही तिच्या वजनावर व तिला कुठल्या प्रकारचे components (spare part) बसवले आहेत यावर अवलंबून असते.
सायकलच्या फायरफॉक्स, जावा, बिटवीन (decathlon)स्कॉट ,ट्रॅक अशा खूप कंपन्या बाजारात आहेत.
मित्र मंडळी चर्चा करताना कोणी म्हणत ट्रॅक घ्या, कोणी म्हणतो scot घ्या.पण नेमकी कुठली घ्यावी हे काही कळत नाही.
सुरुवातीला आपण फ्रेम विचार करू.
सायकलची फ्रेम ही
1)steel
2)Alloy
3)carbon fiber
4)Titanium या धातू मध्ये येते.
स्टील ची फ्रेम वजनाला जड असते,म्हणून सर्व जुन्या सायकली अटलॉस, Hercules या सर्व स्टील मध्ये होत्या.
आपण वापरात असेलेल्या सर्व सायकली या Alloy /carbon मध्ये असतात. कार्बन फ्रेम सायकल वजनाला हलकी व मजबूत असतात, पण महाग असतात.
Titanium फ्रेम ही कार्बन पेक्षा थोडी कमी प्रतीची आहे,पण खूप छान आहे,carbonla पर्याय.
कार्बन म्हणजे कोळसा. कोळश्याला विशिष्ट तापमानाला chemical टाकून टणक बनवतात.
Alloy फ्रेम घेतांना fork (पुढेच चाक ज्यात अडकवले असते)जर कार्बन घेतले तर जास्त चांगले.कार्बन फ्रेम घेण्याची ची गरज नाही. काही फ्रेम या कुठेही जोड न देता बनवलेल्या असतात, एकाच साच्यात.अशा फ्रेम महाग असतात.काही जोडून बनवलेल्या असतात.
सायकल बनवणाऱ्या सर्व कंपन्या फक्त Frame
व fork बवतात.इतर सर्व पार्टस बाहेरून आणून बसवतात.
म्हणून सायकल घेतांना components बघणे जास्त महत्वाचे आहे.
COMPONENTS--components बनवणाऱ्या Shimano(जपान),Sram(अमेरिका) व इतर कंपन्या आहेत.【Sram--is an acronym of scott+Ray+Sam】
या दोन्ही कंपन्या सर्वात चांगले components बनवतात.
बाजारात Shimano मध्ये जवळपास 9 प्रकारचे Components उपलब्ध आहेत.
1)Claris
2)Tourney
3)sora
4)Tiagra
5)105
6)Ultegra
7)Dura Ace
8)Ultegra Di2 elecronics
9) Dura Di2 electronics
यात 1 ते 3 हे सर्व एन्ट्री लेवल components आहेत. कमी किंमतीची.
Tiagra ते Ultegra हे सर्व higher end components आहेत.
सायकलची वायरिंग आतून असल्यास किंमत वाढते. 【Internal cable routing】
Sram चे देखील असे 13प्रकार आहेत.
यातील सर्वात महाग Sram Force Axs,Sram Red Axs ही आहेत.
ही व Ultegra components सेट 1.25 लाखच्या पुढे जातात,यात tube/tyre नाही.
BREAK---तीन प्रकारचे ब्रेक उपलब्ध आहेत
1) Rim break
2)Mechanical disc break
3)Hydrolic break
यात hydrolic ब्रेक सर्वात महाग असतात.
Mechanical डिस्क ब्रेक सर्वात छान व मेंटनस फ्री.
HANDLE BAR--
जवळपास 8 ते 10 प्रकारचे सायकल हँडल उपलब्ध आहेत.आपणास 3 प्रकाचे बार उपयोगी आहेत
1)फ्लॅट हँडल बार
2)ड्रॉप बार
3)येरो बार(Aero)
Flat handle bar हे आपल्या नेहमीचे सरळ हँडल. हे सर्वांसाठी, सर्व वयोगटासाठी उपयोगी
Drop बार हे आपणास जास्त aerodynamic shape देते, खाली वाकल्यामुळे हवेशी घर्षण कमी होते व वेग वाढतो.
Aero bar--- हा बार flat बारवर आडवा बसवलेला असतो. यामुळे आपले दोन्ही हात जवळ येतात व aerodynamic shape तयार होऊन वेग वाढतो.
TYPES OF CYCLE --
यात Tendem bike,Mud bike, MTB, Hybrid व Road bike असे प्रकार आहेत.यात आणखी उपप्रकार आहेत.
Tendem bike --यात सायकलला दोन सीट असतात.
Mud bike ही वाळूवर किंवा चिखलात वापरतात.
MTB (Mountain Terrain Bike)ही सर्वसामान्य सायकल असून ही आपण hilly terrain, off road,खराब रस्त्यावर वापरू शकतो.
Hybrid ही देखील सर्वसामान्य चांगल्या रस्तावर वापरणारी सायकल आहे. ही रोड बाईक व MTB चे कॉम्बिनाशन आहे.
Road bike ही रेसिंग सायकल असून, हिला shocks-absorbers नसतात.
MTB सायकला shock absorbers जरूर घावे.इतर सायकलीला त्याची गरज नाही.
Shock absorber असावे की नसावे?
रायडर जर नवीन असेल,वय 45 च्या पुढे असेल,धक्के सहन होत नसतील तर shock absorber जरूर घावे.
पण shock absorber आपली kinetic Energy absorb करून वेग कमी करतात.तसेच सायकलचे वजन 1ते 1.5 kg ने वाढवतात व सायकलची किंमत देखील वाढवतात. आपण चालवत असलेला रस्ता जर चांगला असेल तर कोणत्याच सायकलला शॉक absorber ची गरज नाही.
या वरील सर्व सायकलिंचे टायर किती जाड आहे यावर सायकलचे नाव अवलंबून आहे.
सायकल टायरचे स्पोक देखील आता aerodynamic/ blade स्पोक येत आहेत.याची किंमत थोडी जास्त आहे, पण या स्पोकमुळे हवेशी घर्षण कमी होत असल्याने वेग वाढतो.साधे स्पोक हे एक सरळ तार असते, हे स्पोक आपल्या भाषेत चिप्पट असतात.
रेसिंग सायकलचे टायर 700mm×25mm(700×25c) outer diameter व width अशी असतात. यात काही 650× 18c देखील आहेत.पण शक्यतो ही कोणी वापरत नाहीत ,कंपनी बनवत नाहीत.
Mud bike ची width 50mm असते.
जेवढे टायर जाड तेवढा तुमचा जमिनीशी संपर्क (grip)जास्त,पडण्याचे चान्सेस कमी,पण वेग देखील कमी.टायर कमी जाड असल्यास पडण्याचे चान्सेस जास्त पण वेग देखील जास्त.
Schwalbe व Continental(दोन्ही जर्मनी)
ही टायर अतिशय चांगली आहेत.Grip खूप छान आहे,पण महाग आहेत, या मुळे सायकल ची किंमत वाढते.
CASSETTE & CRANKSET--
हे दोन्ही मिळून सायकलचे गियर सेट बनतो. Cassette हा पार्ट सायकच्या मागच्या चाकावर असतो. हा रेसिग सायकल मध्ये 11×14×16×18×22×24×26×28×32(drivetrains)(9 division)असतो. या teeth set ला sprockets म्हणतात.हे सर्व एकत्र केल्यास त्याला Cogset/Clustar म्हणतात. (Lower number of teeth- maximum torque)
Crankset --
याला 2 किंवा 3 रिंग असतात. याला 50/34/20 teeth असतात. जेवढे जास्त teeth तेवढी ताकत जास्त लागते.
आपल्याकडे crankset ला 50+ teeth नसतात.
जर असतील तर गियर सेट 9×2,9×3,11×2 असा बनतो.
Road bike ला सर्वात चांगला groupset 9×1
MTB ला 14×3 ग्रुप सेट चांगला.
9×1,11×1 या कॉम्बिनेशन मुळे सायकलचे वजन व किंमत कमी होते. कारण front derailor नसल्यामुळे.
फ्रंट डेरेलर नसणे हे रेसिंग सायकल साठी खूप चांगली गोष्ट आहे.अजून भारतात हा प्रकार उपलब्ध नाही.आल्यास हीच सायकल घेणे.
रेंसिंग सायकल सोडून इतरांनी हा सायकल प्रकार घेऊ नये.
सायकल ची चैन हा देखील अत्यंत महत्वाचा पार्ट आहे.
हिचे वजन 250 gram पासून 1kg पर्यंत असते. चैन ही link(roller /pin) या दोन प्रकारात येते. लिंक म्हणजे चैनचा छोटा तुकडा.या लिंक एकत्र केल्यास त्याला neckless देखील म्हणतात. या किती link आहेत यावर सायकलचे वजन किंमत अवलंबून आहे.
सायकल घेतांना कंपनी without pedal व without स्टँड च सायकलचे वजन shop ownerला कळवतात.ते पेडल वजनात धरत नाहीत. पण दुकांदारास हे माहीत नसते
DERAILOR-
हा देखील महत्वाचा पार्ट असून फ्रंट व रिअर असे दोन भाग असतात.या मुळे आपण गियर change करू शकतो. हा देखील सायकल विकत घेतांना कोणता बसवला आहे हे बघावे. शिमाणो ग्रुपसेट एकत्र असेल तर चांगले.
आता पुढे भविष्यात रोड बाईकला फ्रंट डीरेलर येणार नाही.
उंचीनुसार सायकल घ्यावी.पण उंची मोजतांना आपली उंची कमरेपासून पाय किती लांब आहेत या नुसार सायकल घ्यावी.
सायकलचा स्पीड हा फक्त सायकल वजनाला हलकी आहे व रायडर हलका आहे,यावर अवलंबून नाही.
उतारावर aerodynamic shape मुळे जाड माणूस पुढे निघून जातो.
सायकलचा स्पीड तुम्ही योग्य दाबाची हवा भरली आहे का नाही यावर देखील अवलंबून असतो. बऱ्याच लोकांना वाटते गियर वाली सायकल आहे म्हणून स्पीड जास्त.परंतु गियर व स्पीडचा काही संबंध नाही.
युरोपियन देशामध्ये प्रवासासाठी व इतर कामासाठी ,व्यायामासाठी सायकल हा त्या लोकांनी निवडलेला उत्तम पर्याय आहे.भारतात हा प्रकार हळू हळू रुजत आहे,पण सध्या तो फक्त हौस म्हणून किंवा व्यायामापुरता मर्यादित आहे.
Source:
Santosh Shinde
Team S3, Sangli.
गिट आणि गिटहबचे महत्त्व
एके काळी, एक गाव होतं, ज्याचं नाव 'कोडवाडी'. या गावात अनेक लोकं संगणकावर प्रोग्रामिंग करायची. परंतु, त्यांना एक मोठी समस्या होती. जेव्हा अनेक लोक एकाच प्रोजेक्टवर काम करायचे, तेव्हा त्यांची कामे एकत्र आणणे फार अवघड जायचं. एकाने काही बदल केले तर दुसऱ्याला ते कळायचे नाही, आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवत.
एके दिवशी, गावात एक ज्ञानी साधू आला. त्याचं नाव गिट. गिट साधूने गावकऱ्यांना एक जादूई साधन दिलं, ज्यामुळे त्यांची सगळी समस्या सुटली. गिट साधूने त्यांना सांगितलं, "हे साधन तुम्हाला तुमच्या सगळ्या फाइल्सची नोंद ठेवायला मदत करेल. तुम्ही कितीही बदल केले तरी सगळे बदल नोंदवले जातील आणि कोणत्याही क्षणी तुम्ही मागे जाऊन पाहू शकता की काय बदल केले गेले."
गिट साधूच्या या साधनामुळे गावकऱ्यांची कामे खूप सोपी झाली. आता ते एकमेकांच्या कामांमध्ये कोणतेही चूक न करता एकत्र काम करू लागले. गिट साधूने त्यांना आणखी एक साधन दिलं, ज्याचं नाव होतं 'गिटहब'.
गिटहब हे एक जादूई संग्रहालय होतं. येथे गावकरी त्यांचे सगळे प्रोजेक्ट ठेवू शकत होते. इथे त्यांचे प्रोजेक्ट सुरक्षित होते आणि जगभरातील कोणत्याही कोणीही त्यांचे प्रोजेक्ट पाहू शकत होते, त्यात योगदान देऊ शकत होते. गिटहबमुळे कोडवाडीचे गावकरी जगभरातील प्रोग्रामर्सशी जोडले गेले.
गिट आणि गिटहबमुळे कोडवाडीचे गावकरी आता खूपच समाधानी होते. त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स एकत्र बनवले, एकमेकांना मदत केली आणि त्यांच्या गावाचं नाव उज्ज्वल केलं.
आता आपण पाहूया की गिट आणि गिटहब आपल्याला कसे मदत करतात:
1. गिट:
- गिट हा एक व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. तो आपल्याला आपल्या प्रोजेक्टच्या प्रत्येक बदलाची नोंद ठेवतो.
- प्रत्येक बदल एक 'कमिट' म्हणून नोंदवला जातो. त्यामुळे आपण कधीही मागे जाऊन पाहू शकतो की काय बदल झाले आहेत.
- गिट आपल्याला ब्रांचेस तयार करण्याची सुविधा देतो. त्यामुळे आपण वेगवेगळ्या फीचर्सवर स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि नंतर ते मुख्य प्रोजेक्टमध्ये एकत्र करू शकतो.
2. गिटहब:
- गिटहब हे एक ऑनलाईन रिपॉझिटरी होस्टिंग सेवा आहे. इथे आपण आपल्या गिट रिपॉझिटरीज ठेवू शकतो.
- गिटहब आपल्याला टीमसोबत एकत्र काम करण्याची सुविधा देतो. आपण इथे पुल रिक्वेस्ट्स, इश्यूज, आणि प्रोजेक्ट्स तयार करू शकतो.
- गिटहब ओपन सोर्स प्रोजेक्ट्ससाठी खूप उपयुक्त आहे. अनेक लोकांना आपल्या प्रोजेक्टमध्ये योगदान देण्याची संधी मिळते.
या गोष्टींमुळे गिट आणि गिटहब हे प्रोग्रामर्ससाठी खूप उपयुक्त साधनं आहेत. कोडवाडीचं उदाहरण लक्षात ठेवा आणि गिट आणि गिटहबचा वापर करून आपली कामं सोपी आणि कार्यक्षम करा.