मुंबई📍
आज राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात आयोगाची बोर्ड बैठक झाली. यावेळी अपर पोलीस महासंचालक श्रीमती अश्वती दोरजे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्यासह आयोगातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. येत्या काळात राज्य महिला आयोगाकडून हाती घेण्यात येणारे महिलांशी संबंधित विविध विषयांवरील संशोधन प्रकल्प, क्षमता बांधणी कार्यशाळा यांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. आयोग कार्यालयात येणाऱ्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी पोर्टल तयार करण्याबाबतही चर्चा झाली.
@Maha_MahilaAyog
आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात सुनावणी घेतली.
समुपदेशन स्तरावर निकाली न निघालेल्या तक्रारींची माझ्यासह आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी झाली. कामाच्या ठिकाणी छळ, आर्थिक फसवणूक बाबतच्या तक्रारीमध्ये महिलेची बाजू समजून घेत त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने यंत्रणांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
कौटुंबिक वाद-विवादाच्या तक्रारीमध्ये कुटुंबाने सामोपचाराने तोडगा काढावा यासाठी संवाद साधला.
@Maha_MahilaAyog