जाहिरात क्रमांक 114/2023 विविध विषयांतील सहायक प्राध्यापक व इतर, गट अ तसेच जाहिरात क्रमांक 115/2023 विविध विषयांतील अधिव्याख्याता, गट ब संवर्गांकरीता दिनांक 13 मे 2025 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार उमेदवारांना विषय निवडीचा पर्याय देण्यात आला होता.
सदर शुध्दीपत्रकानुसार उमेदवारांनी निवडलेल्या सर्व संबंधित विषयांच्या चाळणी परीक्षांकरीता प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
उमेदवारांनी निवडलेले विषय व चाळणी परीक्षेकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेश प्रमाणपत्रे यामध्ये कोणतीही विसंगती असल्याचे निदर्शनास आलेले नाही.