आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीदिनी माझ्या वरळी मतदार संघातील डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट तथा बुद्धविहार येथे पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
ह्यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत जी, आमदार सचिन अहिर जी, आमदार सुनील शिंदे जी तसेच स्थानिक बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
माझ्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या वरळीतील विविध विकासकामांचा आज शुभारंभ केला. प्रथम सेंच्युरी मिल वसाहत येथील लहान मुलांच्या उद्यानाचे लोकार्पण स्थानिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले.
Visited various road works sites to inspect the speed and quality of the on going work in my constituency of Worli, and to ensure that all the agencies are working in sync.
It is essential that the BMC and the Metro 3 road works are completed in time before monsoons, so that, apart from traffic and pedestrian movement, water logging spots can be identified, worked on and avoided.
आज डॉ. ई. मोझेस रोडवरील मेट्रो परिसरातील रस्त्याच्या कामकाजाची पाहणी मुंबई महानगरपालिका आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह केली. ह्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामातील अडचणी जाणून घेतल्या आणि जलदगतीने काम सुरु ठेवण्याच्या देखील सूचना दिल्या.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज जयंती...
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री #छत्रपती#शिवाजी_महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवजयंती
मा. अजितदादांचे अंगरक्षक म्हणून अनेक वर्षे काम करणारे विदीप जाधव यांचाही दादांसोबत विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मा. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जसा दुःखात आहे तसंच जाधव कुटुंबावरही मोठं दुःख कोसळलं. हे दुःख शेअर केल्याने कमी होतं, म्हणून आज फलटण (तरडगाव) इथं जाधव कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचा विश्वास दिला.
#विदीप_जाधव
माझ्या वरळी मतदारसंघात आई श्री गोल्फादेवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे संपन्न झाला. ह्या शुभप्रसंगी उपस्थित राहून, आई गोल्फादेवीचे कृपाशीर्वाद घेतले. समस्त वरळीकरांच्या भल्यासाठी प्रार्थना केली.
चारकोप येथील वॉर्ड क्र.१९ येथील उमेदवार लिना गुढेकर यांच्या कार्यालयास भेट देऊन,
त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
तिथे उपस्थित लोकांचा उत्साह सांगत होता…
विजय नक्की होणार,
मशाल धगधगणार!
आज वॉर्ड क्रं. ४६ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार सौ. स्नेहिता डेहलिकर ह्यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले तसेच उपस्थितांशी संवाद साधला.
ह्या विभागात असलेली सर्वांची एकजूट नक्कीच विजयाला गवसणी घालेल.
राजकीय पक्षांनी, माध्यमांनी, नागरिकांनी मतदार यादीतील घोटाळा उघडकीस आणून देखील, तसेच आम्ही स्वतः
• सूचना/आक्षेप घेण्यासाठी दिलेला कालावधी ७ दिवसांवरून २१ दिवसांपर्यंत वाढवावा,
• आणि आमचे आक्षेप बल्कमध्ये स्वीकारावेत,
अशी मागणी करूनही
राज्य निवडणूक आयोगाने आजपर्यंत ह्याविषयी एक पाऊलही पुढे टाकलेले नाही.
मतदारांची नावे लाखोंमध्ये दुबार-तिबार नोंदवली गेली आहेत, खोट्या घरांची नोंद आहे, EPIC क्रमांक नसलेल्या ओळखपत्रांची संख्या प्रचंड आहे, तर अनेक मतदार ओळखपत्रांवर फोटो/नाव/पत्ता/EPIC क्रमांकच नाही.
निवडणूक आयोगाने सूचना/आक्षेप नोंदवण्याचे दिवस वाढवले नाहीत व आमचे आक्षेप तपासून स्वीकारले नाहीत, तर हे स्पष्ट होईल की भाजप आणि निवडणूक आयोग दोघांनीही मिळून निवडणुकीचे फिक्सिंग केले आहे.
निवडणूक आयोग आता एक सर्कस झाला आहे; भारतात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका घेणारी तटस्थ संस्था राहिलेली नाही.
#VoteChori
युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील आणि युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील ह्यांच्या वरळी सागरी कोळी महोत्सव समितीतर्फे वरळी सीफेस येथे ‘वरळी सागरी कोळी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.
काल वरळी सागरी कोळी महोत्सवास भेट दिली.
🚨निवडणुक आयोगाच्या कृपेने आलेलं महाराष्ट्रातलं सरकार अल्पावधीतच 'बिल्डर-कंत्राटदारांचं सरकार' झालंय.🚨
⚠️पुण्यातल्या लोकमान्य नगरचंच उदाहरण पहा! ⚠️
तिथल्या पुर्नविकासाचा मार्ग स्थानिक रहिवाश्यांनी निवडला असताना आणि त्यांना तो विकास हवा असतानाही, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाने ह्या पुर्नविकासाला स्थगिती दिली!
झटक्यात असं करण्याचं कारण काय होतं?
आता 'क्लस्टर' विकासाच्या नावाखाली ही जागा सत्ताधाऱ्यांच्याच जवळच्या एका बिल्डरच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरु झालाय का?
स्थानिकांचं काय म्हणणं आहे हे ऐकून न घेता जर मुख्यमंत्री हा निर्णय घेत असतील तर सरकार नेमकं कोणाचं आहे? सरकार हे जनतेचं आहे की बिल्डर्सचं?
⚠️दुसरीकडे पुण्यातले बहुतांश रस्ते आता ऑप्टिक फायबर्स टाकण्यासाठी खोदले जाणार आहेत असं कळतंय.⚠️
पण प्रश्न असा आहे की एकीकडे पुणेकरांना ह्याचा त्रास होणार असताना, कंत्राटदारा कडून रस्ते खोदाईसाठी जो मोबदला मनपा कडून घेतला जातो, तो घेतला जाणार आहे का? की तो सरकारचा लाडका कंत्राटदार असल्याने त्याला सूट दिली जाणार?
हे जनतेचं नाही, बिल्डर कंत्राटदारांचंच सरकार आहे! ⛔️