महाविकास आघाडी सरकारने राज्यातील प्राध्यापकांचे दिनांक ४ फेब्रुवारी, २०१३ ते दिनांक १० मे, २०१३ या ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील १२५१५ अध्यापकांना होणार असून एकूण ₹ १९१.८१ कोटी थकीत वेतन त्यांना मिळणार आहे.