आज सन्माननीय पक्षप्रमुख श्री.राजसाहेब ठाकरे यांच्यासमवेत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
#RajThackeray#MNS
राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे.
शिवछत्रपतींच्या सहवासात !
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज किल्ले रायगडावर जाऊन शिवसमाधीचे दर्शन घेतले आणि शिवछत्रपतींचरणी नतमस्तक झालो.समस्त शिवप्रेमींच्या उत्साहात आणि भगव्या रंगात रायगड न्हाऊन निघाला.ह्या प्रसंगी युवराज छत्रपती संभाजीराजे ह्यांची भेट झाली.
#Raigad#MNS
आज दिवा स्थानकात रेल्वेच्या धडकेत एक तरूण व एका तरूणीचा जीव गेला,एक जखमी आहे. अरुंद पादचारी पूल, त्यात दोन्ही बाजूने रस्ता फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो.वारंवार याबाबत रेल्वे आणि @TMCaTweetAway यांना फेरीवाले हटवा म्हणून मागणी करूनही हप्ते वसूल करण्यात सर्व यंत्रणा गुंतली आहे.#TMC
ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. दिलीप धोत्रे, शेतकरी सेनेचे अध्यक्ष श्री. संतोष नागरगोजे, प्रवक्ते श्री. प्रकाश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सैनिकांनी धरणे आंदोलन केले.
मनसे रोजगार स्वयंरोजगार विभागाचे रत्नागिरी जिल्हा संघटक श्री. रुपेश जाधव यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे केलेल्या प्रशासकीय पाठपुराव्यामुळे 'गेल इंडिया' आणि 'अशोका गॅस' या कंपन्यांना सीएनजीचा पुरवठा वाढवण्याचे आदेश देण्यात आले. रत्नागिरीतील वाहन मालक मनसेचे आभार मानत आहेत.
मनसेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज संत साहित्याचे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची भेट घेतली. संत साहित्याची परंपरा तसंच महाराष्ट्राचा इतिहास यांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पक्षाचे नेते श्री. अनिल शिदोरे हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी काल सायंकाळी केलेल्या आवाहनानंतर, पंढरपूरमधील मशिदींमधून आज सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर केला गेला नाही. सामाजिक सलोख्याचे भान बाळगणारी ही भूमिका प्रशंसनीय आहे.
#भोंगे_हटवा#सामाजिक_सलोखा#MNSAdhikrut