इवल्या इवल्या चोचीने
घरटे बांधले इटूकले,
अंड्यातून बाहेर आली
पिल्ले तिची पिटूकली.
चिवचिवाट तो पिलांचा
हाक ती भूकेची,
दाणे पडण्या चोचीमध्ये
हाक आईला पिलांची.
#शेतात_दिसलेले_घरटे#माझाक्लिक#घरटे
#निळावंती
ट्विटर(X) वर एकदा या पुस्तकाबद्दल वाचलं होतं. खूप दिवसाची वाचनाची इच्छा होती. आज हे पुस्तक एका बुक स्टॉल वर दिसलं म्हणून घेऊन टाकलं WhatsApp ला स्टेटस ठेवलं तर बहिणी ते खूप बोलून राहिले. कशाला घेतलं पुस्तक खूप भांडून राहिले. त्यांना सांगतोय समजावून की हे मूळ प्रत नाही+
दि. ९ ऑगस्ट २०२६ | जागतिक आदिवासी दिन
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते यशवंतराव चव्हाण सेंटर या मार्गावर आयोजित भव्य रॅलीत आदिवासी बांधव-भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
लोककला, पारंपरिक नृत्य आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे उत्स्फूर्त सादरीकरण करत एकता, संस्कृती आणि आदिवासी अस्मितेचा जागर करण्यात आला.
यावेळी आमदार हिरामण खोसकर यांचीही उपस्थिती लाभली.
जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधव-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!
जय आदिवासी!
जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेली नाळ, समृद्ध संस्कृती, परंपरा, बोलीभाषा आणि निसर्गसंवर्धनाची परंपरा हीच आदिवासी समाजाची खरी ओळख आहे.
जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना आदिम शुभेच्छा !
#जागतिकआदिवासीदिन#WorldTribalDay#आदिवासीसंस्कृती#आदिवासीअस्मिता
तालुक्याला लेखापाल म्हणजे काम करून पण बोलणे खाव लागतय आणि काम करून पण सांगतात काम करती नाही वरुण धमकी देतात Continuation देणार नाही म्हणून...
पगार झाट भर, काम करा सर्वच सुट्टीच्या दिवशी पण वरून जे काम आमचे नाही ते पण करा....
#Contractual#Job#सरकारी_कार्यालय
सकाळ पासून पाऊस सुरू होता. मग कपडे धुवून सुकत केले. पाऊस थांबला मेस ला जेवण करायला गेलो जेवण करून येताना पाऊस थांबल्यामुळे वातावरण काय मस्त झाला होता मग डोक्यात विचार आला मस्त या वातावरणात फिरायला जावा कुठे तरी पण जोडी कोणीच नाही. आता रूम ला आलो ब्लँकेट पांघरून घेतो झोपून....🎭
आता कुठं मेस वरून जेवणं करून आलो. लय त्रास देतोय हा जॉब तर आई आणि बहिणीला सांगितलं तर ते सांगतात दे राजीनामा ये गावाकडे काय जिवाचं हाल करतो एवढा... पगार कमी परवडत तर नाही गावाकडे तरी खर्च नाही जगण्यापुर्ता आहे जमीन जॉब पण देतो इकडे बघून.... आता काय करावं समजत नाही.😟
18/19 वर्ष झाले ते वैतागले या जॉब ला तर आम्ही तर आताचे त्यांच्या पेक्षा जास्त वैतागलो नवीन असल्यामुळे लयच ताण देता राव यांच्या कामाच्या ताणामुळे अटॅक यायला बसलाय.
त्याच्या पेक्षा दुसरं जॉब केलेले ते परवडेल...
सारखं येणं जाणं करावं लागतंय जिल्ह्याला काय परवडत.
#कॉन्ट्रॅक्ट#नोकरी
घरी आलोय पण कामाचा लोड येवढं आहे की WhatsApp ग्रुप ला कालपासून हे काम ते काम सोमवारी complete करून द्या....
टेन्शन आलंय कसं होईल तो होवो...
असा जॉब काय कामाचा जिथं घरच्यांसाठी वेळ काढून यावा आणि काम सांगतात. एकदाच राजीनामा द्यावा आणि घरी यावं असं झालंय....
#Contractual#नोकरी