Journalist:- @SakalMediaNews (tweets are personal) PRESIDENT:-Chhatrapati Shivaji Maharaj Social and Multipurpose Organization(NGO), DIRECTOR:-S K MEDIA GROUP
ही आहे राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पारदर्शक पोलखोल... भाजप मंत्र्यांच्या बाबतीत तर हे कंत्राटदार काय म्हणतात ते स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या सरकारने कान खोलून ऐकावं..
या सरकारने आधीच मराठी कंत्राटदारांची सुमारे 1 लाख कोटी रुपयांची बिले थकवली आहेत, त्यातही कामं देतानाच त्यावर कसा आडवा हात मारला जातो, हे यानिमित्ताने जगजाहीर झालं. त्यामुळं कमिशन खाणारं हे दलाल सरकार आहे, असंच म्हणावं लागेल. आता उघडपणे बोलणाऱ्या या कंत्राटदारांना सरकारने जाणीवपूर्वक त्रास दिला तर महाराष्ट्र धर्माला जागून या कंत्राटदारांसाठीही प्रसंगी रस्त्यावर उतरू..!
#कंत्राटदार #थकीत_बिले #भ्रष्टाचाराची_पोलखोल #CorruptionExposed
पुणे महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी ठरवले तर पूर्ण शहर अतिक्रमण मुक्त होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण कोथरूड येथील आझादनगर परिसरात आहे. अतिक्रमण निरीक्षक राहुल डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा सकारात्मक परिणाम. @PMCPune@mohol_murlidhar@Medha_kulkarni@ChDadaPatil
#पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने फ्लेक्स मुक्तीची घोषणा केली होती मात्र आज पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला ही अवस्था झाली आहे. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणताय भाजपचा कार्यकर्ता अन्य पक्षापेक्षा वेगळा आहे. तो शिस्तबद्ध आहे. किती विरोधाभास आहे.
#Pune#Punenews
पुण्यातील बावधन येथील रेडीमिक्स प्रकल्पातून उडणारी धूळ आणि सिमेंट’ने रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले आहे. या प्रकल्पांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन होत नाही. लोकांच्या आरोग्यास धोकादायक प्रकल्प कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत.@mpcb_official@OfficialPMRDA@PMCPune
प्रदूषण रोखण्यासाठी आता चळवळ उभी करावी लागणार आहे. हवा, पाणी आणि पर्यावरण आपला मुलभूत अधिकार आहे. जबाबदारीचं भान ठेवून मुलभूत अधिकारासाठी चळवळ उभी केली, तर आणि तरच आपण स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि उत्तम पर्यावरण राखू शकू.
#Pune#Weather
अवजड वाहनांच्या अनिर्बंध वर्दळीनं पुण्यात धूर आणि धुळीचा पडदा गर्दीच्या रस्त्यांपासून ते गल्लीबोळात पसरलेला राहतो. या वाहतुकीवर नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती आहे.
#Pune#Weather
“दैनिक सकाळ” सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रानं पुण्याच्या हवेतील प्रदूषणासारखा प्रश्न घेऊन पुण्यातील कारभाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
प्रत्येक प्रश्नावर नागरिकांचं भलं व्हावं म्हणून काही संस्था संसदीय चौकटीत नेमलेल्या असतात. ह्या बाबतीत त्या “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ” आणि “पुणे महानगरपालिका” ह्या त्या दोन संस्था. त्यांनी ह्याकडे लक्ष द्यावं.
ह्या ट्विटसोबत मी त्यांची वृत्तमालिका सोबत देतो आहे.
हवेच्या इतक्या भीषण प्रदूषणामुळे किती लोक आजारी पडत असतील?
ते आजारी पडल्यामुळे त्यांचं किती आर्थिक नुकसान होत असेल?
त्यामुळे अर्थव्यवस्थेकडे काय परिणाम होत असेल?
दवापाण्यावर लोकांचा किती खर्च होत असेल?
काही लहान मुलांच्या श्वसनयंत्रणेवर ह्यामुळे कायम स्वरूपी परिणाम होईल का?
ह्या सर्व बाबींचा विचार होणं आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ह्याला Burden of Disease असं म्हटलं आहे. म्हणजे रोगराईमुळे होणारा आर्थिक आणि सामाजिक ताण किंवा ओझं. जिज्ञासूंनी आणि पुण्याच्या कारभाऱ्यांनी ते समजून घेऊन कृती करावी.
दैनिक सकाळचं मनोमन अभिनंदन !
@PSamratSakal@PMCPune@mohol_murlidhar@mpcb_official
#खरेप्रश्न #पुणे #pune #प्रदूषण
पुण्यात दुषित हवेमुळं श्वसनाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढते आहे. गंभीर आजार आणि मृत्यूचं कारणही प्रदूषित हवा ठरते आहे. रोजच्या हवेत आठ सिगारेट पिल्याएवढी फुफ्फुसं निकामी करणारं प्रदूषण आहे.
#Pune#Weather
फर्ग्युसन रस्ता अतिक्रमणाने व्यापला आहे. नागरिकांना पदपथ सोडून रस्त्यावरून चालावे लागते. विक्रेत्यांकडून काही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना हाप्ते मिळतात. याकडे आर्थिक हितसंबंध ठेवून दुर्लक्ष केले जाते. मात्र; काहीजण ‘कलाकार कट्टा’ काढून टाकण्याला विकास मानत आहेत.@PMCPune
पुण्यात रोजच्या श्वासाबरोबर निम्मा धूर फुफ्फुसात जातोय. ६५ लाख वाहने आणि अवघे २१०० किलोमीटरचे रस्ते यामुळं वाहतूक कोंडी होते आणि प्रदूषणात भर पडते. घरोघरी खोकला, श्वसन अथवा फुफ्फूसाचा विकार जडतो आहे.
#Pune#weather
संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना रस्त्यावरून धोकादायक स्थितीत चालावे लागते.पादचाऱ्यांचे यापूर्वी जीव गेले आहेत. महापालिकेने सबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. @PMCPune@mohol_murlidhar@Medha_kulkarni@SidShirole