पवार साहेबांनी संत तुकाराम साखर कारखान्याच्या नियोजित जागेवर उगीच राजीव गांधी आयटी पार्क उभारले.
त्याऐवजी एखादे मंदिर उभारले असते तर ते नास्तिक आहेत अस राजसाहेब बोलले नसते.
आज मी आयटी कंपनीत काम करतो त्यापेक्षा मंदिरासमोर हार विकत उभा राहिलो असतो.
मैं सोनम जी से आग्रह करता हूँ की वो डॉक्टरों की सलाह के अनुसार अपनी दिनचर्या रखें और जल्द से जल्द अपना पुराना वज़न फिर से प्राप्त करें।
मैं प्रभु से प्रार्थना करता हूँ कि सोनम जी स्वस्थ रहें।
@Wangchuk66@GitanjaliAngmo
History doesn't make Gandhi relevant. Every generation facing injustice does.
इतिहास गांधींना जिवंत ठेवत नाही; प्रत्येक पिढीचा अन्यायाविरुद्धचा संघर्ष त्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो
दिल्लीत झालेल्या आंदोलनामुळे सरकार आणि भाजप ह्यांचा एक चेहरा लोकांसमोर आणलाय.त्यामुळे सहसा तटस्थतेच्या नावाखाली भाजपला सहानभूती दाखवणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास झाला निदान त्यांना धक्का बसलाय हे नक्की.
आज त्याच महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणारे दक्षिण आणि ईशान्य भारत ह्यांना उत्तर भारताच्या आधिपत्याखाली आणायला मदत करत आहेत.
@supriya_sule देशाच्या एकात्मतेला नख लागेल अशी कृती आपणाकडून होणार नाही हीच अपेक्षा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तंजावरमधील राजकुमाराला स्वतः दूधभात भरवला त्यामागील उद्देश होता:
त्या राजघराण्याला संरक्षणाची आणि आपुलकीची हमी देणे.
मराठा साम्राज्य हे जिंकण्यासाठी नव्हे, तर विश्वास आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी आहे, हा संदेश देणे.
राजकीय संबंध अधिक दृढ करणे.
महाराष्ट्रात काही विचारवंत,पत्रकार,समाजसेवक आहेत जे विरोधक काही करत नाही असं म्हणत असतात पण जेव्हा विरोधक काही करतात तेव्हा डोळे बंद करून बसतात
शेतकरी कर्जमाफी साठी केलेल्या यशस्वी आंदोलनाबद्दल आमदार रोहित पवार,अजित नवले,रविकांत तुपकर आणि सहकाऱ्यांच हार्दिक अभिनंदन
“We had good preparation for monsoon but we failed at micro level.
We will start our fresh preparation from January of next year.”
- BMC Commissioner Ashwini Bhide
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
@s_chandorkar मुळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ह्या नफा कमावण्यासाठी नसतात.जगात अनेक देश असेही आहेत जिथे ह्या सुविधा अगदीच मोफत आहेत फक्त आपल्याकडे सरकारी आणि प्रशासकीय अपयश झाकण्यासाठी नफ्या तोट्याचे दाखले दिले जातात.
ही आपली अवस्था.एक विभाग दुसऱ्या विभागाला पत्र देतो आणि तरी कारवाई होत नाही.मुंबईत काँक्रीटीकरण करताना झाडांची मूळ काँक्रिट मध्ये पॅक केलीत.आता कोणीतरी मुलगा गमवला पण चर्चा मात्र ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी ह्याचीच सुरू राहणार.
@MarathiDeadpool हे सगळ पाणी समुद्रात वाहून गेल. अजूनही रेन वॉटर हार्वेस्टिंग चा विषय हा चर्चासत्र, शालेय प्रोजेक्ट ह्याच्या बाहेर यायला तयार नाही.निदान महानगरपालिकेने स्वतःच्या इमारतीत तो राबवावा
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मूळ सरळ मार्गासाठी आतापर्यंत सुमारे ₹900 कोटींचे भूसंपादन मोबदले वितरित झाल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे संसदेत GMRT मुळे मार्ग बदलण्यात आल्याचे सांगितले गेले, तर दुसरीकडे NCRA नेच स्पष्ट केले की GMRT च्या शेवटच्या अँटेनापासून 10 किमी अंतरावरून रेल्वे मार्ग गेल्यास कोणतीही अडचण येणार नाही.
आता केंद्रीय स्तरावर मूळ मार्ग आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असल्याचे सांगितले जात आहे. मग प्रश्न असा आहे की, ₹900 कोटींपेक्षा अधिक सार्वजनिक निधी खर्च केल्यानंतर नेमका कोणता "Cost Effectiveness" चा निकष लागू केला जात आहे? जर मूळ मार्ग वैज्ञानिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अशक्य होता, तर इतका मोठा सार्वजनिक खर्च कशाच्या आधारावर करण्यात आला? जनतेला या निर्णयामागील संपूर्ण तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.
@kolhe_amol@satyajeettambe@DrAjitNawale@RajabhauW
#PuneNashikRail #GMRT #RTI #railway #punenashikrailway #Transparency #PublicAccountability #MaharashtraDevelopment #ShriniwasKokate
महाराष्ट्रात गेल्या ४ दिवसात दोन निर्घुण खून झाले.
एक बिल्डर च्या मुलाचा आणि एक सेल्समन असलेल्या मुलाचा.
दोन्ही दुर्दैवी. पण जितकी चर्चा लोहगडावरील घटनेची होते तितकी दररोज लाखो सामान्य प्रवासी वाहतूक करत असलेल्या मुंबई लोकल मधील घटनेची होत नाही हे दुर्दैवी आहे