अन्यायाच्या काळोखाला भेदून, ६ जून १६७४ रोजी रायगडावर एका स्वतंत्र, सार्वभौम 'शिवराज्याचा' सूर्योदय झाला, तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण होता!
आज शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
तमाम शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Forget everything else, but the fact that this company can submit old certificates and get a tender!!!
I’ve always said, the BJP is great at social media, media, advertisements… but ZERO in running governments!
Why shouldn’t Dharmendra Pradhan be sacked?
Why shouldn’t the officers in charge of this dept be suspended?
Apart from the scam, this is peak inability to run the government.
Which foreign investor or company would want to come into such an environment created by the bjp regime?
आज शिवसेनेतर्फे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातर्गत सांताक्रुझ येथे आयोजित १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ह्या सोहळ्याचे आयॊजन शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी केले होते. ह्यावेळी आमदार अनिल परब जी देखील उपस्थित होते.
सर्व गुणवंतांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@SardesaiVarun@advanilparab
आज माझ्या वरळी मतदारसंघातील एल. आर. पापन मार्ग आणि ई. मोझेस रोड येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. येथे बीएमसी आणि मेट्रोची कामे सुरू असून, रस्ता आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनची कामे पावसापूर्वी पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत!
आज जी/दक्षिण विभाग महानगरपालिका कार्यालयास भेट देऊन मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था, संभाव्य पाणी साचणारे भाग, रस्त्यांची स्थिती तसेच आपत्कालीन यंत्रणेची सज्जता ह्याविषयी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि वेळेत कामे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
त्यादृष्टीने सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.
Big win for Mumbai!
Impact of our Press Conference and appeal!
After our press conference yesterday the Improvement Committee of the BMC has referred back all the proposals of:
🚨 Privatising the @mybmc ’s blood banks (always have been free and with BMC)
🚨 Converting the Recreation Grounds to Residential plots - one for an exhibition centre, one for an industrialist’s house and one for a builder.
We opposed this last week and we opposed this today.
⚠️ Today that these proposals have been sent back, they have to be scrapped and the BMC must ensure that public spaces and services have to remain public.
⛔️ As the opposition, we will keep opposing EVERY such move of the BMC to privatise open spaces, public schools and services.
I’m thankful to all those who supported this view of ours for Mumbaikars!
माझ्या वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम व तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, ह्या उद्देशाने आज नवीन रुग्णवाहिका सेवेस सुरुवात करण्यात आली. आज ह्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना आनंद वाटला.
नागरिकांना जलद आणि सक्षम वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ही सेवा निश्चितच उपयुक्त ठरेल.
मुंबईची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतच हक्काची घरे मिळावीत, ह्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून प्रयत्नशील आहोत. जसं बीडीडी चाळींचं व तेथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं स्वप्न आम्ही साकार केले; तसेच हे स्वप्न देखील नक्कीच साकार करू!
२०२२ मध्ये गद्दारांनी आमचं सरकार पाडण्याआधी आम्ही त्यादिशेने पावलं उचलण्यास सुरुवातही केली होती. गेली ४ वर्षे भाजप सरकार पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासन देत आहे. तारखेवर तारीख देत आहेत.
ह्याचसंदर्भात काल पोलीस पत्नींची शिवसेना भवन येथे बैठक घेऊन पुनर्विकासासंदर्भात चर्चा केली. तीस ते चाळीस वर्ष पोलीस दलासाठी आयुष्य झोकून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं हक्काचं घर आम्ही मुंबईत मिळवून देऊच!
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बंड्या मारुती सेवा मंडळातर्फे श्रमिक जिमखाना, लोअर परळ येथे आयोजित अ श्रेणी पुरुष अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले व स्पर्धक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी आमदार सुनील शिंदे जी उपस्थित होते.
भाजपच्या राजवटीत महानगरपालिकेच्या शाळा खासगीकरणाच्या दिशेने नेण्याचा (अर्थखातेच काही बिल्डरांच्या हाती देण्याचा) प्रस्ताव हा अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.
गेल्या दोन दशकांत आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले, डिजिटल शिक्षणाची सोय केली, अभ्यासक्रमाबरोबरच शिक्षणेतर उपक्रम जसे जेंडर इक्वॅलिटी, ऍस्ट्रॉनॉमी क्लब, निसर्ग क्लबचा देखील समावेश केला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा जगातील एकमेव महानगरपालिका शिक्षण व्यवस्था म्हणून ओळखल्या गेल्या, जिथे विद्यार्थ्यांना SSC, CBSE, IB, IGCSE आणि ICSE अशा विविध बोर्डांमधून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
आणि आता मुंबई महानगरपालिका चालवणारी भाजप शाळांचे खासगीकरण करू पाहत आहे.
खरे तर ज्या मुंबई महानगरपालिकांच्या शाळांवर खाजगी संस्थांनी ताबा मिळवला आहे किंवा ज्या शाळांच्या जागा बिल्डर्सनी @mybmc ला परत दिलेल्या नाहीत, त्या परत ताब्यात घेऊन मुंबई महानगर पालिकेने विद्यार्थ्यांना मोफत, दर्जेदार शिक्षण द्यायला हवं!
लोअर परळ येथे अरुण क्रीडा मंडळ आयोजित मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने द्वितीय श्रेणी पुरुष ब गट कबड्डी स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना, युवासेना व युवतीसेना शाखा क्र. १९८ तर्फे महिलांकरिता 'रणरागिणी चषक' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेम नगर, वरळी नाका येथे आयोजित भीम गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी खासदार अरविंद सावंत जी, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर जी, आमदार सुनील शिंदे जी, नगरसेविका पद्मजा चेंबूरकर जी, शाखाप्रमुख जिवबा केसरकर जी उपस्थित होते.
माझ्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या वरळीतील विविध विकासकामांचा आज शुभारंभ करण्यात आला.
सुरुवात सीताराम जाधव मार्ग येथील त्रिशूळ बिल्डिंग क्र. २ च्या गच्चीवर संरक्षण रेलिंग बांधण्याच्या कामापासून झाली. स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
माझ्या वरळी मतदारसंघात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती दरवर्षी तीन दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त विविध मंडळांमार्फत अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
आज ह्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत स्थानिकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
📍विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, बावण चाळ, सेंच्युरी मिल वसाहत.