राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहन भागवतजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
हिंदुत्व, राष्ट्रसेवेचा ध्यास, समाजोन्नतीची आस आणि संघटनाविषयीची निष्ठा यांची प्रेरणा आपल्या कार्यातून आम्हा स्वयंसेवकांना मिळते.
आपले बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला राष्ट्रकार्याच्या वाटेवर सदैव प्रेरणा देत राहो. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड राष्ट्रसेवेसाठी ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#MohanBhagwat #Sarsanghchalak #RSS
Pleased to meet His Highness Prince Rahim Aga Khan V in New Delhi.
India cherishes its bond with the Aga Khan Development Network, tied by a shared commitment to human development.
Our discussions focused on strengthening cooperation in social development, irrigation, cooperatives, natural farming—including millets—and solar energy.
Reaffirmed our shared commitment to advancing these partnerships for sustainable development and the greater good of humanity.
India has moved past Congress's divisive hesitation!
Congress's discomfort with Vande Mataram is historic - from objecting to it in 1923 and cutting it down in 1937, to crushing its spirit during the Emergency. But you cannot suppress a nation's soul. For the first time, all six stanzas echoed proudly at the Red Fort.
आत्मनिर्भर भारताची संरक्षण क्षेत्रात नवी भरारी!
स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर विकसित करण्यात आलेल्या ‘दिव्यास्त्र Mk3’चे पहिले उड्डाण यशस्वी झाले. ‘DG Propulsion’च्या स्वदेशी जेट इंजिनाने हे यान सुसज्ज आहे.
या यशस्वी चाचणीतून भारतात ‘१००% स्वदेशी जेट-ड्रिव्हन लोइटरिंग म्युनिशन्स’च्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजनचे हे मोठे यश आहे. भारत संरक्षण क्षेत्रात ‘ग्लोबल सुपरपॉवर’ म्हणून वेगाने उदयास येत आहे.
या ऐतिहासिक यशासाठी देशातील सर्व स्वदेशी संशोधक आणि अभियंत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
India’s defence sector takes a giant leap!
The successful maiden flight of Divyastra Mk3, powered by DG Propulsion’s indigenous jet engine, marks a new era of 100% indigenous jet-driven loitering munitions.
A proud milestone for Atmanirbhar Bharat and India’s rise as a global defence superpower!
#DivyastraMk3 #AtmanirbharBharat #MakeInIndia
डोंबिवली पूर्व येथील शिवाई बालक मंदिर यांच्या वतीने 'कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वार्षिक मिनी मॅरेथॉन २०२६' आयोजित करण्यात आली होती.
या मॅरेथॉनमध्ये कल्याण-डोंबिवलीतील बच्चेकंपनी मोठ्या आनंदाने सहभागी झाली.
याप्रसंगी उपस्थित राहून बालधावपटुंचा उत्साह वाढवला.
यावेळी आ. राजेश मोरे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, नगरसेवक महेश पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने बच्चेकंपनी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
#ShivaiInterSchoolMarathon #ShivaiBalakMandir #Marathon #Dombivlikar
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल |
नांदतो केवळ पांडुरंग ||
एखादा वारकरी जेव्हा पहिल्यांदाच वारीमध्ये सामील होतो, तेव्हा सुरुवातीला पावलं मोजणारा वारकरी हळूहळू स्वतःला विसरत जातो. "माऊली माऊली" म्हणता म्हणता तो स्वतःच 'माऊली' होऊन जातो. जीवाशिवाची भेट घडावी तसंच त्याला वारीमध्येच विठ्ठलाचं विश्वरूप दर्शन घडतं. ही गोष्ट अशाच एका वारकऱ्याची !
विठ्ठलाच्या चरणी कोटी कोटी वंदन !
सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !
#AshadhiEkadashi2026 #Wari2026 #JaiHariVitthal
भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक यांच्या ठाणे येथील नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद् घाटन प्रसंगी उपस्थित राहिलो. यावेळी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत जनसेवेच्या मार्गावरील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भाजपा परिवाराच्या लोकाभिमुख कार्यशैलीला अधिक बळ देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी विश्वासार्ह केंद्र ठरेल, असा विश्वास आहे.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
[ Thane, BJP Family, BJP4Thane, BJP4Maharashtra, Ravindra Chavan ]
#Thane #BJP4Thane #BJP4Maharashtra
"एक देश मे दो प्रधान, दो विधान, दो निशान नही चलेंगे"
काश्मीरला वेगळा दर्जा मिळून भारताची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ नये यासाठी श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. भाजपा विचारधारेचे शिखरपुरुष असणाऱ्या श्यामाप्रसादजींचे हे बलिदान आजही प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला राष्ट्रसेवा आणि विचारधारेसाठी समर्पित राहण्याची शिकवण देते.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात कलम ३७० आणि कलम ३५अ रद्द झाले असून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे प्रांत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. आता पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे कमळ फुलले आहे, हीच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली आहे.
भारतमातेच्या एकतेसाठी सर्वस्वाचे बलिदान देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, भारतीय जनसंघाचे संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांस जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !
#DrSyamaPrasadMookerjee #NationFirst #BharatiyaJanSangh #BJP4India
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी
सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन !
आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी.... या दिवशीच दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शिवराज्याभिषेकाचा युगप्रवर्तक सोहळा घडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावर आरूढ झाले आणि मराठी भूमीवर भगवी पताका अभिमानाने डौलू लागली.
शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श वस्तुपाठ उभारला, जो आजही संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
आजच्या या ऐतिहासिक दिनी, शिवरायांचे हिंदवी विचार अंगीकारण्याचा आणि त्या माध्यमातून गौरवशाली वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#ShivRajyabhishekDin #ChhatrapatiShivajiMaharaj #HarHarMahadeo