हा दोन दिवसांचा लढा नाहीये. ह्या सरकारला नामोहरम केल्याशिवाय तुमचे अधिकार, स्वातंत्र्य अबाधित राहणार नाहीत.
SIR मधून 13 कोटी लोकांची नावे वगळली आहेत. त्यांना भारतीय नागरिक म्हणून ठरवणार नाही आणि नागरिक नाही तर संरक्षण नाही!
या देशातील एका समूहाला गुलाम करण्याचा मार्ग सुरू केलाय.
उद्या वेळ पडली तर सत्ताधाऱ्यांना ढोकून काढायची पाळी येणार आहे. ती वेळ सरकारने ह्या 13 कोटी लोकांवर आणू नये.
#SIR #ECI
सातपुडा आदिवासी कोळी महादेव जमात बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अकोला यांच्या वतीने आयोजित आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवात सहभागी झालो व जयंती निमित्त समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
#महर्षि_वाल्मीकी_जयंती#महर्षि_वाल्मीकि
📍 बुलढाणा
भव्य धम्म मेळावा
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
#भव्य_धम्म_मेळावा
#Buldhana
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात इलेक्शन सुरू झाल्यापासून हा लढा सुरू केला आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत 76 लाख वाढलेल्या मतदानाचा डाटा देण्यात यावा इथपासून ते 28 ऑक्टोबर रोजी ह्या सर्व घोटाळ्याचे जनक निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
ह्या मोर्च्यात कुठल्याही राजकीय पक्षाचे झेंडे असणार नाहीत, भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन आपण मोर्च्यात सहभागी व्हावे.
मुंबईतील राजमाता उद्यान, भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथपर्यंत हा मोर्चा असेल.
#DyaneshKumar #ElectionCommissionOfIndia
#Morcha
नितेश कराळेंना न्याय मिळाला पाहिजे!
दोन प्रकारचे प्राध्यापक असतात. एक ते जे विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेतात. विद्यार्थ्यांचे शोषण करतात. उदा. प्रा. पी. अप्पा राव (डॉ. रोहित वेमुला संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी), प्रा. डुल्ला (साहिल वाकोडे संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी)
दुसरे प्राध्यापक असतात आयआयटी मुंबईमधील प्रा. सूर्यकांता वाघमारे, प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. नितेश कराळे सारखे. जे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या न्याय-हक्कासाठी भूमिका घेतात आणि त्यांचे संरक्षण करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कराळे मास्तर सारखा ऍसेट गमावला आहे. सध्याच्या जेन झीच्या वातावरणात भूमिका घेणाऱ्या कराळे मास्तर सारख्या व्यक्तीचा फायदा घेता आला असता.
मोठ्या साहेबांचा इतिहास राहिला आहे. वरती सेटलमेंट, खाली कार्यकर्त्यांचा बळी!
एका महिन्यापूर्वी मी वर्धा येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने गेलो होतो. तेव्हाच कराळे मास्तरांना सांगितले होते की, हा पक्ष तुमचा गेम करेल. ते आज घडतांना दिसले.
लखानी परिवारासाठी मोठे साहेब महाविकास आघाडीचा उमेदवार गायब करून बिनविरोध निवडणूक करू शकतात तर कराळे मास्तरसाठी का नाही?
#KaraleSir
#MLCElection2026
धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा फक्त धर्मांतराचा दिवस नाही, तर तो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा मूलाधार आहे.
या दिनी आपण बाबासाहेबांना अभिवादन करूया, त्यांच्या विचारांना आचरणात आणूया, आणि समाजात करुणा, समता आणि बंधुत्वाचा विचार पोचवूया...सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #DhammachakraPravartanDin
अशोक विजया दशमीच्या सर्वांना शुभेच्छा!
कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांचा शांतीचा, विचार स्वातंत्र्याचा, समानतेचा मार्ग स्वीकारला. ही एक क्रांती होती, ह्याविरोधात प्रतिक्रांती झाली.
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैदिक धर्माविरोधात बंधुभाव, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्याची क्रांती सुरुवात केली. आज व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे मतदान!
या मतदानाला आरएसएस-भाजप सरकार निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमारला सोबत घेऊन यावर घाला घालत आहेत.
तमाम भारतीयांना माझे आवाहन आहे, जोवर मतदान आहे, तोपर्यंत स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य राखण्यासाठी 28 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, मुंबई येथे आपण सर्वांनी एकत्र येऊन आम्ही आमचा अधिकार हिसकवू देणार नाही. हे सांगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचे आहे. आपण आपला अधिकार शाबूत ठेवूया!
#मुंबई #निवडणूक_आयोग
आज येवला मुक्तीभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या येवला मुक्तीभूमीमध्ये धर्मांतराची भूमिका घेतली, ह्या व्यवस्थेविरोधात एक बंड पुकारले, तेव्हा आपल्यासारख्या लाखो लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि आपल्या सर्वांना माणसांत आणले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा जरी धर्मांतराचे असले, बंड जरी धम्माचे असले, तरी त्यामागील कार्य हे राजकीय आणि सामाजिकच होते. ज्या पद्धतीने आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्माचे बंड स्वीकारले आणि बौद्ध धम्मात आलो, तसेच आपल्याला बाबासाहेबांचे राजकीय आणि सामाजिक बंडसुद्धा स्वीकारायचे आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारत पुन्हा एकदा उभा करून दाखवायचा आहे.
भीमा कोरेगाव, बोधगया येथील महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात होती. महाराष्ट्रात एससी-एसटीचा निधी वळवून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला होता. त्यासंदर्भात त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले.
युवा पिढीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय आणि सामाजिक काम आणखी पुढे नेण्याची वेळ आली आहे.
दलित विद्यार्थ्यांनी शिकू नये, ते कॉपी करतात आणि आरक्षणावर जगतात, अशी जातीयवादी वक्तव्ये आजही केली जात आहेत. याला उत्तर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची ताकद व्यवस्थेला दाखवून द्यावी लागेल.
साहिल वाकोडे यांच्यावर खोटा चीटिंगचा आरोप करून, ते बौद्ध असल्यामुळे, आरक्षणातून शिकत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची व आंबेडकरवादी समाजाची बदनामी करण्याचे काम जातिवाद्यांकडून सुरू आहे.
भीमा कोरेगाव, डॉ. पायल तडवी आणि साहिल वाकोडे यांच्यासारख्या प्रकरणांत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरवादी पक्षाची गरज आहे.
येवला मुक्तीभूमीत मी एक मागणी करतो की, आज महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ आला आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे 35 हजार कोटींचे बजेट आहे. ते कुंभमेळ्याचे बजेट शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावे. कुंभमेळ्याचे बजेट वापरून महाराष्ट्राचा शेतकरी वाचवा, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.
जय भीम, नमो बुद्धाय!
#येवला #मुक्ती_भूमी
10 अक्टूबर का जनप्रदर्शन - दोनों पक्षों की ‘दबाने’ की राजनीति!
कल, 10 अक्टूबर को, नई दिल्ली के जंतर-मंतर पर CJP और कांग्रेस की ओर से एक जनप्रदर्शन किया जा रहा है। इस प्रदर्शन की मुख्य मांग मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार का इस्तीफा है। यह मांग मतदाता सूची में बदलाव और SIR के दौरान वोटों में हेराफेरी के आरोपों को लेकर उठाई जा रही है।
@VBAforIndia कल के इस जनप्रदर्शन का समर्थन करती है।
लेकिन सरकार द्वारा इस प्रदर्शन को 'दबाने' की कोशिश की जा रही है। भाजपा सरकार ने पहली ही दिल्ली जाने वाली ट्रेनें रद्द कर दी हैं। दूसरी ओर, RSS ने गृह मंत्रालय के समर्थन से हिंदुत्ववादी गुंडों को प्रदर्शनकारियों के भेष में कल के जनप्रदर्शन में शामिल करने की तैयारी कर रहा है, ताकि हिंसा भड़काई जा सके और पुलिस के साथ टकराव पैदा हो।
ऐसा करके वे चाहते हैं कि पुलिस छात्रों पर बेरहमी से लाठीचार्ज करे, जिससे पूरे देश में तनाव और अशांति फैले।
कल अगर किसी की जान जाती है या कोई घायल होता है, तो इसके लिए दिल्ली पुलिस पूरी तरह ज़िम्मेदार होगी।
लेकिन ‘दबाने’ की राजनीति सिर्फ सरकार की तरफ से ही नहीं हो रही है।
जिस तरह सरकार कल के प्रदर्शन को दबाने की कोशिश कर रही है, उसी तरह CJP और कांग्रेस भी ‘दबाने’ की राजनीति कर रहे हैं। दोनों ने दलित, आदिवासी और ओबीसी समाज से आने वाले नेताओं को इस प्रदर्शन से दूर रखा है और उन्हें आमंत्रित नहीं किया है।
@mkstalin, @BRSparty, @Mayawati, @roat_mla को क्यों नहीं आमंत्रित किया गया?
एक तरफ सरकार प्रदर्शन को दबाने की कोशिश कर रही है, तो दूसरी तरफ प्रदर्शन का नेतृत्व करने वाले दल दलित, आदिवासी और ओबीसी नेतृत्व को दबा रही हैं।
हमारा समर्थन धरने के साथ है, लेकिन लोकतंत्र की लड़ाई में सभी की भागीदारी भी जरूरी है।
मैं एक बार फिर दोहराता हूं कि वंचित बहुजन आघाड़ी कल, 10 अक्टूबर के जंतर-मंतर धरने का समर्थन करती है।
आंबेडकरवादी विचार-साहित्याशी छेडछाडीविरोधात फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z ने लढा हातात घ्यावा!
ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
ज्यांच्याकडे पैसे असतील व त्यांनी ते बँकेत ठेवले असतील, तर ताबडतोब पैसे काढून घ्या. ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील.
देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच मुलाखतीत सांगितले आहे की, ऑक्टोबरनंतर देशाची अर्थव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही.
जर अशी अवस्था होऊ द्यायची नसेल, तर जगात जे मित्रराष्ट्र आहेत, त्यांच्यासोबत मैत्री कायम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुन्हा संबंध जोडणे महत्त्वाचे आहे.
आम्ही सरकारला म्हणतोय की, एक घोषणा तुम्ही करा. आम्ही म्हणत नाही की, इस्रायलशी संबंध तोडा. सरकारकडून एक घोषणा अपेक्षित करतो, "खाडी युद्ध चालू असेपर्यंत इस्रायलला भारत एकही हत्यार विकणार नाही." कारण, इस्रायलला हत्यार विकणे म्हणजे इराणविरुद्ध लढणे आहे.
#IndiaStandsWithIran #Bank #IndianEconomy
अनेक विद्यापीठांमध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यावरती अनेक अभ्यासक्रम आहेत, ते शिकवले जातात.
हे सगळे विचार आरएसएस-भाजप विचारसरणीच्या विरोधात आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर आली आणि ४८ तासाच्या आत पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य आले की, आम्ही याविषयी लक्ष घालणार आहोत. जे-जे विरोधात आहे त्यांच्या संदर्भात आम्ही भूमिका घेणार आहोत.
हिटलरचे म्हणणे होते की, जे अँटी-जर्मन आहेत, त्यांना आम्ही बॅन करणार. तीच पद्धत, तीच विचारसरणी आरएसएस-भाजपकडून अवलंबली जात आहे. मनुवादाच्या विरोधात जे लिखाण आहे, जे शिक्षण घेतले जाते, त्याला बॅन करण्याची पद्धत सुरू झाली आहे.
असाच एक प्रकार १९७८-७९ मध्ये शिवसेनेने स्वतःच्या वाढीसाठी "रिडल्स इन हिंदुइझम" साठी वापरला होता. फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारवंत जनतेने कुठलाही पुस्तक बॅन करता येणार नाही विशेष करून बाबासाहेबांचे विचार बॅन करता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती आणि शासनाला ते पुस्तक प्रकाशित करावे लागले.
पंतप्रधान मोदीला आमचं सांगणे आहे, जर या संघर्षात सरकार उतरले तर आमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल ती किंमत आम्ही देऊ.
“1891 Think Tank” पुरस्कृत “Separate Electorate - स्वतंत्र मतदारसंघ” या विषयावर जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्रथम परिषद दिनांक : ११ ऑक्टोबर २०२६.
“बाबासाहेबांचा ध्यास - आता फक्त स्वतंत्र मतदारसंघावर अभ्यास.”
नोंदणीसाठी ई-मेल : [email protected]
पुढील परिषदांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
पुढील परिषद स्थळे : लंडन, स्कॉटलंड, मुंबई, नागपूर, उत्तर प्रदेश आणि दिल्ली.
@Prksh_Ambedkar
📍मुंबई
सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज चैत्यभूमी येथील स्मारकास संपूर्ण आंबेडकर कुटुंबीयांनी अभिवादन करण्यात आले.
#भैय्यासाहेब_आंबेडकर #चैत्यभूमी