तू चाल पुढं पुढं...
आपल्या आजरा तालुक्यातील उत्तूर गावात वास्तव्यास अ��णाऱ्या राष्ट्रपती विजेत्या सौ. रेश्मा रविंद्र करबली यांची दौऱ्यादरम्यान भेट घेतली आणि संवाद साधला. ३८ वर्षे ६ महिने शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेत सेवा बजावल्यानंतर मुख्याध्यापिका म्हणून सेवान��वृत्त झालेल्या करबली मॅडम यांचे पती श्री. रविंद्र करबली हे गोकुळ दूध संघातून ३५ वर्षे सेवा प्रदान करून निवृत्त झाले आहेत.
या दोघांच्याही भेटीवेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. त्यांच्याकडून अनेक पिढ्या घडल्या असून भविष्यातही त्यांनी सदैव आमच्यासोबत राहावे, अशी इच्छा यावेळी व्यक्त केली.
#retirement #greetings #Congratulations
Get well soon...
धामणे इळकेवाडी या गावात वास्तव्यास असणारे आमचे कार्यकर्ते श्री. पुंडलिक मगदूम यांची गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असल्याचे समजले. दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस केली आणि कोणत्याही प्रकार��ी वैद्यकीय आवश्यकता असल्यास आम्ही सदैव सोबत असू, असे आश्वासन दिले.
#getwellsoon #patient #kagal
आजरा तालुक्यातील धामणे गावातील रहिव���सी असणारे आपल्या राजे गटाचे कार्यकर्ते श्री. विठ्ठल यादव यांचा केशकर्तनालय व्यवसाय असून त्यांचे चिरंजीव अतुल यांचा जनावरांना वैरण कापताना बोटाला दुखापत झाल्याचे समजले.
दौऱ्यानिमित्त गावी गेलो असता त्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. यावेळी कोणतेही काम करताना काळजी घेण्याचा आणि आपल्या कुटुंबाचा सर्वप्रथम करण्याचा सल्ला दिला. याचसह वैद्यकीय आवश्यकता असल्यास राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सोबत असल्याचा विश्वास दिला.
#getwellsoon #patient #kagal
जळी स्थळी मला हा दिसतो विठ्ठल,
सख्या मला तुझ्यापरी भासत�� विठ्ठल!
आजरा तालुक्यातील धामणे गावात दौऱ्यानिमित्त गेलो असता गावातील वारकरी बांधवांची भेट घेतली आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या.
काही दिवसांपूर्वी पंढरपूरला जात असताना धामणे गावातील दिंडीची भेट झाली होती, यावेळी गावात भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या विनंतीस मान देऊन गावात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. आबालवृध्दांची ही भेट नक्कीच मनाला उभारी देणारी होती.
#kagal #varkari #greetings
ज्ञानदान हे पवित्र कार्य!
आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावात दौऱ्यादरम्यान गेलो असता गावातील रहिवासी श्री. हणमंत सुतार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. चिमणे गावात शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुतार सरांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून याबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सुतार सरांचे कार्य अभिमानास्पद असून त्यांच्या हातून देशासाठी अनेक उज्ज्वल पिढ्या घडाव्या, अशी सदिच्छा व्यक्त केली आणि या कामात ��म्ही सदैव सोबत असल्याचा शब्द दिला.
#kagal #greetings #teacheraward #Congratulations
जाहीर निषेध!
देशभरात वाढत्या बलात्कारांची संख्या चिंतनीय असताना आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिये या ठिकाणी दहा वर्षांची मुलगी या दुर्दैवी आणि घृणास्पद मानसिकतेची बळी ठरली आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर क���ोर शिक्षा झालीच पाहिजे, ही आमची ठाम मागणी!
#kolhapur #justice #RapeCase #women
Get well soon सर!
आजरा तालुक्यातील चिमणे गावातील रहिवासी असणारे सेवानिवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत कोरे सरांची काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिय�� झाल्याचे समजले. या अनुषंगाने दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
त्यांनी आजवर अनेक पिढ्यांना उत्तम शिक्षण प्रदान केले असून हे पुण्य नक्कीच त्यांच्या गाठीशी आहे. याचसह भविष्यात त्यांना काहीही सहकार्य लागल्यास आम्ही सदैव सोबत असू, असा शब्दही दिला.
#getwellsoon #patient #kagal
लवकर बरे व्हा!
आजरा तालुक्यातील बेलेवाडी हु. गावातील आपले कार्यकर्ते माजी सरपंच श्री. विनायक शिंत्रे यांच्या वडिलांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याचे समजले. दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली आणि तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे आणि आरोग्यदायी आयुष्य जगावे, अशी सदिच्छा व्यक्त करत आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत असल्याचा निर्वाळा दिला.
#getwellsoon #patient #kagal
यशस्वी भव!
आपल्या आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी गावात वास्तव्यास असणारे श्र���. प्रबोधन येजरे यांची API पदी पदोन्नती झाली असून पोलीस विभागात ते करत असलेले कार्य ही गौरवशाली बाब आहे.
दौऱ्यानिमित्त गावी गेलो असता त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईंची भेट घेतली आणि सत्कार केला. यावेळी असा सुपुत्र पोटी आला, ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट असून त्यांनी केलेल्या संस्कारांचे मनभरून कौतुक केले.
#kagal #Congratulations #greetings
पुन्हा स्वराज्य!
भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, बदल ही काळाची गरज ��हे. जो स्वतःला काळानुसार बदलतो, तोच काळाच्या ओघात टिकून राहतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्व. राजे साहेबांनी दाखवलेल्या वाटेवर चालणे तितके सोपे कधीच नव्हते, आजही नाही. आपल्या कागलसाठी, कागलच्या जनतेसाठी स्वतःचे हेवेदावे, स्वतःच्या आकांक्षा सारे काही बाजूला ठेवून एखाद्या योग्याप्रमाणे चालत राहणे हेच धोरण आणि हेच आमचे ध्येय!
मी राजकारणात आलो, ते कागलचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी! विकासाच्या नावावर कागलमध्ये ठिकठिकाणी जमा झालेली जळमटे साफ करून कागलला राजकीय नव्हे तर विकासाचे विद्यापीठ म्हणून नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी! आजही माझे ध्येय वेगळे नाही. कागलला पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराजांचे, स्व. राजे साहेबांचे कागल बनवायचे असेल तर ��ाही निर्णय मनावर दगड ठेवून घेणे क्रमप्राप्त होते.
याचसाठी मी मागच्या दरवाजाने नव्हे तर माझ्या गुरूंना, माझ्या नेत्याला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत हा निर्णय घेत आहे. आज पुन्हा एकदा आपल्या भूमीत गाढवाचा नांगर फिरला असताना 'पुन्हा स्वराज्य' निर्माण करण्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. पुन्हा एकदा आपल्या कागलला सर्वच क्षेत्रा�� परि��ूर्ण बनवण्यासाठी माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या असंख्य सहकाऱ्यांच्या साक्षीने मी नवी सुरवात करत आहे. आपण आजवर घाटगे कुटुंबाला भरभरून प्रेम दिले, भविष्यातही या प्रेमाला ओहोटी लागणार नाही, असा विश्वास वाटतो.
#kagal #Politics #welfare #journey #dreambig
आपण मिळून साकारू, पुन्हा स्वराज्य!
काल आपल्या कागलमध्ये मोठ्या उत्साहात कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी आपण भविष्यात घेणार असणाऱ्या भूमिकेबद्दल सर्वांशी सल्लामसलत करून 'पुन्हा स्वराज्य' निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट केले.
हे स्वराज्य घडवण्यासाठी आपणा सर्वांची साथ बहुमूल्य असून आपण सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल, असा विश्वास वाटतो.
@Jayant_R_Patil
सदिच्छा भेट!
आज खासदार श्रीमंत शाहू ���त्रपती महाराज यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मनमोकळ्या गप्पा आणि अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
भेटीदरम्यान अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपण समर्थपणे पुढे नेण्यासाठी घेत असणाऱ्या नव्या भूमिकेबद्दल त्यांना कल्पना देत चर्चा केली. यावेळी त्यांचे आशीर्वाद घेत पुढील वाटचालीला सुरवात करत आहे, असे सांगितले.
#kolhapur #kagal #legacy #Politics #relation
भावपूर्ण श्रद्धांजली!
बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन गणपतराव फराकटे यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
#भावपूर्ण#श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
आमचे चुलते श्री. सत्यजितराजे हिंदुराव घाटगे यांचे आज सकाळी निधन झाले. आयुष्याच्या या टप्प्यावर घाटगे कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य गमावल्याचे दुःख फार वेदनादायी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
#भावपूर्ण#श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
नांदेडचे खासदार वसंतराव बळवंत चव्हाण यांचे दु:खद निधन झाले. सरपंच ते खासदार असा राजकीय अनुभव असणारा नेता आज हरपला. त्यांचा जाण्यामुळे भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
#भावपूर्ण#श्रद्धांजली
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. मुसाभाई कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याकडून यशाची सारी शिखरे पादाक्रांत होवो, ही प्रार्थना...
#happybirthday#birthdaywishes
देशकार्य हेच ईश्वरकार्य!
आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी गावात वास्तव्यास असणारे अनिकेत संजय जांभळे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली असून या अनुषंगाने दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सत्कार केला आणि अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करणारे जवान पाहून अंगावर रोमरोम उभे राहतात आणि मनात अभिमानाची भावना जागृत होते. अनिकेत करत असणारे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबाही नक्कीच स्तुत्य आहे.
#kagal #Congratulations #greetings
सद रक्षणाय, खल निग्रहणाय।
आजरा तालुक्यातील होण्याळी गावातील रहिवासी निलेश विष्णू मोरबाळे या युवकाची सिंधुदुर्ग या ठिकाणी पोलीस पदी निवड झाली असून या निमित्ताने दौऱ्यावर असताना त्यांच्या घरी जाण्याचा योग आला.
यावेळी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या. आज पोलीस विभागात ते करत असलेले कार्य अभिमानास्पद असून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन केले.
#kagal #Congratulations #greetings
एक थाप कौतुकाची!
कागलमधील युवती अमृता रामचंद्र शेळके यांची रत्नागिरी या ठिकाणी पोलीस पदी निवड झाल्याचे समजले आणि गावी दौऱ्यादरम्यान गेलो असता त्यांच्या घरी भेट दिली.
यावेळी त्यांचा सत्कार करत ��्यांची निवड आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत कौतुक केले. याचसह त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असून त्या ही जबाबदारी लिलया पेलतील असा विश्वास वाटतो, असेही सांगितले.
#kagal #Congratulations #greetings