🎂 वाढदिवसाचा आनंद, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप:
आज माझ्या वाढदिवसानिमित्त लोदगा जिल्हा परिषद सर्कलमधील हासेगाव गणातील विविध गावांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
🌾 किल्लारी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, औसा उपबाजारपेठ किल्लारी व उजनी यांच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा व ऋणनिर्देश सोहळ्यास लोकप्रिय आमदार मा. श्री. अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी झालो. या वेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधत शेतीमालाला योग्य भाव,
🌳 लोदगा जिल्हा परिषद सर्कलमधील हासाळा येथे स्मशानभूमी नवीन शेड येथे वृक्ष लागवड कण्यात आली.
औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
हासेगाव येथील विविध विकास सहकारी संस्थेत स्वातंत्र्यदिनानिमित्त माझ्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकरी बांधवांना निल पावत्या प्रदान करण्यात आल्या.
🛕गोंद्री येथील जागृत देवस्थान श्री नृसिंह भगवान मंदिरात दर्शन घेऊन विकासकामांची पाहणी केली. औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंदिरास 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्याची मागणीही केली.
#गोंद्री#श्रीनृसिंहभगवान#तीर्थक्षेत्र
विकासाच्या वाटचालीत वाहतूक सुविधेला प्राधान्य: धानोरा ते गोंद्रीमोड दरम्यानच्या पुलाच्या दुरुस्ती कामाचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली.
हासेगाववाडी येथे साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा त्यांचा विचार समाजाला सदैव प्रेरणा देत राहील. 🌹
#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे#जयंती#हासेगाववाडी
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि पालक-शिक्षक संवादाला बळ देणाऱ्या शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणी बु. येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पालक मेळाव्यास उपस्थित राहिलो. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.