पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
टायटनच्या फॅक्टरीला तमिळनाडू मध्ये जागा देताना तामिळ लोकांना काम मिळेल याची गॅरंटी तामिळनाडू सरकारने टाटांकडून घेतली.
एवढेच नव्हे तर टायटनची जगप्रसिद्ध धून
ए आर रेहमान यांनी भारतीय स्वरुपात आणली.
जात,धर्म विसरून भाषेवर एकत्र येण हे केवळ भावनिक आव्हान करून होत नाही तर त्याला कायदेशीर मान्यता हवी.
महाराष्ट्रात हे असे का होत नाही?
@AbhyasKendra@mnsadhikrut@drdeepakpawar
सततच्या फोडाफोडीमागे एक आणखी कारण आहे. हा गलिच्छपणा म्हणजेच राजकारण आहे असा समज करून देण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा यांचे सहजपणे दमन करता यावे.
पण राजकारण म्हणजे ही आताची विकृती नाही हे लोकांनीच ठामपणे सत्ताधाऱ्यांना सांगायची वेळ आलेली आहे.
आज राजकारण पाहून आत्मा हादरला
मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही मी लोकशाही समर्थक आहे.
मी UBT गटा विरुद्ध टोकाचे लढे दिले. पण आज जे होतय ते पाहवत नाही.
ह्या ६ खासदार कुणा विरुद्ध लढले:
संजय देशमुख हे हेमंत पाटील (शिंदे गट)
भाऊसाहेब वाकचुरे हे सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
नागेश पाटील हे भाऊराव कदम (शिंदे गट)
याचा अर्थ मतदाराने शिंदे गटाला पूर्णपणे नाकारले होते, मग ही मतदाराची प्रतारणा नाही का? हा मतदारांचा विश्वासघात नाही का?
मतदारांनी कोणाला मत दिले?
* एका चिन्हाला
* एका विचारधारेला
* खासदारांवर विश्वास ठेऊन
आज या फोडाफोडीत खासदार विकले जात नाहीत तर मतदाराचा ‘विश्वास’ विकला जात आहे.
माहिती अधिकाराचे नवे नियम.
जिथे लोकशाही संपलीय, तिथे माहिती अधिकाराची पर्वा कोण करणार?
आधीच माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत होता. आता राज्य शासनाने मृत्यूशय्येवर असलेल्या माहिती अधिकार पूर्णपणे संपवणारे नवे नियम लागू केले आहेत.
१. माहिती कशासाठी हवी आहे याचे कारण द्यावे लागेल. हे म्हणजे नोकरांनी मालकांना कारण विचारण्यासारखे आहे.
२. माहिती अधिकार अर्ज शुल्क : ₹१० वरून ₹३० — तब्बल २००% वाढ!
३. A४ प्रतीचे शुल्क : ₹२ वरून ₹५ — १५० % वाढ!
४. डिजिटल/स्कॅन प्रतीसाठीही ₹५ प्रति पान शुल्क!
५. पहिल्या अपीलासाठी ₹५०आणि दुसऱ्या अपीलासाठी ₹१०० शुल्क!
६. नागरिकत्वाचा पुरावा जोडणे बंधनकारक!
७. एका अर्जात फक्त एकच विषय आणि साधारण १५० शब्दांची मर्यादा!
माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा प्राणवायू आहे. पण सरकारने नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्यासाठी अडथळ्यांची भिंत उभी केली आहे.
लोकशाही टिकवायची असेल तर माहितीचा अधिकार वाचवावा लागेल.
#माहितीचा_अधिकार #नवे_नियम #महाराष्ट्र
सुक्ष्म जिवांची एवढी काळजी करणारे ॲंटीबायोटीक/ ॲंटीव्हायरल गोळ्या घेत असतील का?
घरात मच्छर झाले तर गुडनाईट वापरतात का?
ढेकणं झाली तर पेस्ट कंट्रोल करतात का?
सहजच मनात शंका आली.!
मराठी हिंदू केव्हा चुकलात जेव्हा हाय वे च्या हॉटेल वर शहरातल्या हॉटेल मध्ये ,पावभाजी गाड्यांवर
इथे जैन पावभाजी मिळेल
जैन थाळी मिळेल
बिन लसूण कांद्याच जेवण मिळेल
ती सुरवात तुमच्या लक्षात नाही आली .
ते होते सांस्कृतिक अतिक्रमण .
सेम टू सेम
छट पूजा
आणि
लीट्टी चोखा 🙉.
मराठी माणूस उद्योगात मागे आहे हा भ्रम आता डोक्यातून काढून टाका! लाखो-करोडोचे घोटाळे करून देशाची पाठ टेकवणारे ‘ते’ कोण होते, हे जगाने पाहिले आहे. पण आमचा मराठी उद्योजक हा प्रामाणिकपणे, कष्टाने उद्योग उभा करतो, हजारो हातांना रोजगार देतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला ताकद देतो!
आम्ही उद्योग करतो, रोजगार निर्माण करतो... पण कधीही कोणाला फसवत नाही, घोटाळे करत नाही! संकटं आली तरी वाघ मागे हटत नाही, तो पुन्हा पाय रोवून उभा राहतो. मराठी उद्योजकाची ओळख ही त्याच्या प्रामाणिकपणात आणि हिमतीत आहे, कोणत्याही घोटाळ्यात नाही. आता वेळ आली आहे मराठी तरुणांनी स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची!
#MarathiEntrepreneur #Maharashtra #BusinessMindset #MarathiAsmita #BusinessFraud
मी श्रेयस अय्यरसाठी खूप आनंदी आहे. आम्ही मुंबई आणि भारतासाठी एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. मुंबईचे सलग तीन खेळाडू भारताचे टी-20 कर्णधार होणे हा आमच्या शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे. - सूर्यकुमार यादव, भारतीय खेळाडू
#shreyasiyer#suryakumaryadav#TeamIndia#LatestNews
छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात रमले असते, पुर्वपुण्याईच्या कथा सांगत बसले असते तर आयुष्य “नको त्यांच्या सोबत ॲडजेस्ट करून” घेण्यात गेले असते.
जोरदार लढाई, सततचा संघर्ष अन प्रचंड ताकदवान शत्रूशी प्राणपणानं निकराची झुंज देता यायला हवी. स्वराज्य तेव्हांच शक्य.
क्षेत्र कोणतंही असो.
राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्याकडे मी आता लोकांना पहायला सांगीन, राजकिय नेते जो उमेदवार देत आहेत, तो जिंकेलचं हा जो आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे तो लोकांनी तोडून काढायला पाहिजे. ज्याच्याकडे गाड्या आहेत, पैसे आहेत, जो माझा मित्र आहे, त्याला उमेदवारी देत आहेत. हा आत्मविश्वास लोकांनी तोडून काढला पाहिजे. जनतेमुळे ते तिथे बसलेत, हे दाखवून द्यायला हवे. पालिकेत काय झालं? 5 ते 6 कोटी देवून उमेदवार निवडून आणले. आपण कधी जागे होणार आहोत?
- अमित ठाकरे (युवानेते, मनसे)
#AmitThackeray #MaharashtraPolitics #MarathiNews
आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की. -राज ठाकरे, मनसेप्रमुख
#RajThackeray #mumbai #maharashtra #MarathiNews
आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन आला की झाडं लावून त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो. आणि त्यातली ९०% झाडं पर्यावरण दिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहित. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा.
२०१४ साली मी जेंव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेंव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरु आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आत्ता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?
हल्ली सगळ्यांना जरा मोठ्या आकड्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे म्हणलं जरा काही गंभीर आकडे मी पण तुमच्यासमोर ठेवतो.
यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या प्रॉडक्टिव्हिटीचं झालेलं नुकसान हे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते असा अंदाज वल्ड बँकेचा आहे. एका जागतिक अभ्यासाप्रमाणे देशातील ५७% जिल्हे ज्यात देशाची ७६% लोकसंख्या राहते, हे जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत.
जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची अशी आकडेवारी टाकतो तेंव्हा या आकडेवारीचा विचार पण करणार आहोत का ?
आज पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललं आहे, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. थोडक्यात आपण जिथे जगतोय तिकडे ८ महिने आपल्याला धड जगता येत नाहीये, याची खंत आपल्याला का वाटत नाहीये? माझा विकासाला विरोध नाही, रस्ते, पूल हे करा ते आवश्यक आहेतच, पण ते करताना आपण आपली शहरं धड जगायला लायकीची करत आहोत का याचा विचार का होत नाही? पावसांत ग्रामीण भागात पिकं वाहून जातात आणि शहरी भागांत गाड्या पाण्यावर तंरगतात आणि तरीही आपण जे सुरु आहे त्याला विकास म्हणून खुश होणार आहोत का?
बरं सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते.
१७३९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली.
आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की.
आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.
निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल.
राज ठाकरे ।
शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घेता येईना..
म्हणून काय केलं
पेपरफुटीवर बोलणाऱ्या शिक्षकांना टारगेट करायला बायांना पुढे करणं चालू केलं..😡
काय तर म्हणे यु ट्युब चाले टीचर्स..
ते निदान कमी पैशात लोकांना चांगले शिकवतायत पण तुम्ही करोडो घेऊन चाटूगिरी करताय
#दलदलीतली_दलाली_पत्रकारिता
@Arvikasai@BhaskarShelke4 भाषा यावेळी नाही विचारणार. पुढील वर्षी फेब्रुवारी,मार्च महिन्यात दुसरा टप्पा येईल जनगणनेचा,त्यात तुम्हाला कोणकोणत्या भाषा अवगत आहे व तुमची मातृभाषा कोणती हे निवडायचे संधी असणार आहे.
एकट्या प्रयागराज जिल्ह्यात १२ प्रमुख आणि ३५ लहान अशी एकूण ४७ रेल्वे स्थानके आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही रेल्वे संपर्क मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीबाबत गंभीररीत्या विचार करण्याची गरज आहे.
अलीकडेच, भारतातील बेरोजगार तरुणांना 'झुरळ' म्हटलं गेलं, ज्यामुळे देशातील तरुण संतप्त झाले. वास्तविक पाहता, आपण सर्वच झुरळ आहोत. अन्न भेसळयुक्त आहे, श्वास घेण्यास अडथळा, सगळीकडे कचरा आणि व्यवस्था सडली आहे. या सगळ्यांनंतरही जर जिवंत असू, तर आपण अजूनही झुरळच आहोत. - शेखर सुमन, विनोदी अभिनेते
#cockroach #ShekharSuman #LatestNews #MarathiNews