To get a US State visit Modi not only agreed to an exorbitant drone deal with a US company, but also agreed to subsidise 70% of the cost of a private US company setting up a chip assembling plant in Gujarat.
Micron will hold 100 percent ownership in a plant costing $2.75 billion, in which they would have invested would have invested only 0.825 billion!
https://t.co/oa0AcqC2WW
बोरातली अळी!
खरंतर ज्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण गलिच्छ पातळीवर गेल आहे. त्याला उभा आडवा झोडपून काढण्यापेक्षा, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांना त्यांच्यात व्यापक आणि दीर्घकालीन राष्ट्रहित दिसते आहे, ही खरी शोकांतिका आहे…!
'फडणवीस निदान व्यापक आणि दीर्घकालीन राष्ट्रहितासाठी उपमुख्यमंत्रीपदी राहणे सहन करतीलही. पण अजितदादांचे काय?'
कालच्या लोकसत्ताच्या 'आशीर्वाद की शाप' या अग्रलेखातील हे वाक्य. आता या वाक्यातून संपादक गिरीश कुबेरांना काय सूचवायचे आहे?
अग्रलेखात कुबेरांनी हे नमूद केलेलं आहे की उपमुख्यमंत्रीपदी राहणं हा अजितदादांना मिळालेला शाप आहे की कुणी दिलेला आशीर्वाद आहे, ते कळत नाही. थोडक्यात अजितदादा या उपमुख्यमंत्रीपदाच्या पुढे जाणार की नाही याचे सूतोवाच त्या अग्रलेखात आहे. तिथवर ते ठीकच आहे.
पण त्यासाठी तुलना म्हणून 'फडणवीस निदान व्यापक आणि दीर्घकालीन राष्ट्रहितासाठी उपमुख्यमंत्रीपदी राहणे सहन करतीलही' ही पेरणी कशासाठी?
साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे की फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद का, कसे, कुणामुळे 'स्विकारणे' भाग पडले. केवळ वरिष्ठांचा आदेश म्हणून नाइलाजाने स्विकारावे लागत असल्याचे तेव्हाच्या त्यांच्या देहबोलीवरून स्पष्टपणे दिसले आहे. त्यात केवळ आणि केवळ पक्षीय कुरघोड्या यापलिकडे काहीही नव्हते, नाही.
महाराष्ट्रातील राजकारणाबाबत जी काही उद्विग्नता, संताप किंवा एकूणच राजकारणापासून अलिप्त राहण्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जी भावना दाटते आहे त्याला शिंदे गटाचे आणि अजितदादा गटाचे तथाकथित बंड हे कारणीभूत आहेच. पण फडणवीस हे त्या गटारगंगेची महाराष्ट्रातील गंगोत्री आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
कोरोना काळात महाराष्ट्राचे हक्काचे पैसे केंद्रातून अडवले जात असताना आणि राज्याला त्या काळात निधीची सर्वाधिक गरज असताना केवळ फडणवीसांमुळे संपूर्ण राज्य भाजपाने त्यांची सगळी देणगी केंद्राला दिली. एवढं एक उदाहरणही पुरेसं बोलकं आहे की फडणवीसांना महाराष्ट्र प्रिय आहे की त्यांचे बॉस!
'कपडे बदलून आम्ही रात्रीचे भेटत होतो' या शिंदेंच्या वाक्यातील अतिशयोक्ती बाजूला ठेवा. पण केवळ सत्ता मिळवण्यासाठी फडणवीसांनी काय काय केलं असेल ते तर त्यातून कळतं आहेच ना?
'मी पुन्हा येईन' ही दर्पोक्ती असो वा 'नाही, नाही, त्रिवार शक्य नाही' ही राष्ट्रवादी सोबतच्या युतीसंदर्भातली भीष्मप्रतिज्ञेसारखी वाक्ये असोत. दोन्ही वेळेस फडणवीस कसे तोंडघशी पडलेत हे सगळ्यांनीच पाहिले आहे.
या राज्याशी, राज्यातील जनतेशी बेइमानी केल्याची, केवळ सत्ता मिळवण्यासाठी लांड्यालबाड्या केल्याची फडणवीसांची अनेक उदाहरणे देता येतील. त्या फडणवीसांमध्ये कुबेरांना व्यापक आणि दीर्घकालीन राष्ट्रहीत दिसते आहे.
मुलींना पळवून आणतो म्हणणाऱ्या राम कदमांवर एबीपी माझाने बंदी घातली. का? कारण तसे बोलणे, करणे अनैतिक! पण 'कधी कधी राजकारणात अनैतिक गोष्टी कराव्या लागतात' हे म्हणणाऱ्या फडणवीसांमध्ये मात्र कुबेरांना व्यापक आणि दीर्घकालीन राष्ट्रहीत दिसते! तुलनाच करायची तर दोघांनीही अनैतिक गोष्टीचं समर्थनच केलं. पण एकावर तात्काळ बंदी तर दुसरा राष्ट्रहीताचे प्रतिक! आणि एबीपीचे खांडेकर व लोकसत्ताचे कुबेर यांच्या घनिष्ठ मैत्रीत फडणवीस हा समान दुवा आहे, हा काही योगायोग नाही!
फडणवीसांचे राजकारण किती सालस, सुसंस्कृत, शालीन आणि उमद्या स्वभावाचे आहे ते २०१४ नंतर अधिकच ठळकपणे सगळ्यांनीच पाहिले आहे. आणि त्याला समाजमान्यता मिळवून द्यायचे काम कुबेर इमाने इतबारे पार पाडत असतात.
बोरातली अळी आहे ती ही! फडणवीसांच्या हडेलहप्पी राजकारणाकडे लक्ष ठेवताना या बोरातल्या अळीकडे दुर्लक्ष होता कामा नये, एवढंच!
— आनंद भंडारे
ED ने जितने नेताओं को जेल नहीं भेजा, उससे ज़्यादा बीजेपी में भेज दिया। ED का नाम BJP रख देना चाहिए। तब ख़बर ऐसे लिखी जाएगी, BJP ने अजित पवार पर केस किया, अजित पवार BJP में आ गए। उन्हें ED जाकर BJP में आने की ज़रूरत नहीं पड़ी। ED ही गारंटी है। ED ही वारंटी है। ED ही अंकल है। ED ही आंटी है। अगर ED का नाम BJP नहीं हो सकता तो BJP का नाम ED कर देना चाहिए। यह मेरा फ़ार्मूला नहीं है। उस जर्मन प्रोफ़ेसर का है जिसने योगी जी को फ़्रांस भेजने की माँग की थी। खुद फ़रीदाबाद में जा छिप गया है या फ़िरोज़ाबाद में, आप पता लगाते रहें । ED भी एक तरह से जर्मन प्रोफ़ेसर की तरह लगती है, जिसका असली नाम BJP है। उस प्रोफ़ेसर का असली नाम क्या था?
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी शिखर बॅंक आणि सिंचन घोटाळ्यावरुन राष्ट्रवादीला टार्गेट केलं.. आणि आज अजित पवारांसकट 8 आमदारांना शपथ दिली. दोन्ही प्रकरणात अजित पवारांचं नाव होतं.
भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मोहीमेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 😇
#AjitPawarNCP#SharadPawar#NCP