संयम तुटून जेव्हा चांगुलपणाचा अंत होतो तेव्हा आयुष्याचा लपलेला कडवट भाग सुरुवात म्हणून पुढे सरकतो आणि जपलेली माणसं नाती त्यात स्वाह होऊन जातात. अन् तेव्हा उरतो फक्त श्वास मोजतं राहणारा जीव जो स्वतःला कधीच सोडून गेलेला असतो,,..
शब्दाच महत्व तेव्हा उमगत जेव्हा अडखळतो.
आपल्या भावना,आपल्या गरजा, हक्क समोरच्या व्यक्तीसमोर मांडण हे कौशल्याच काम आहे. विचारांवरही ठाम राहायला हवं असत.
त्यामुळे बऱ्याच वेळा आपण शांत राहतो.
समोरचा त्याला हवा तो अर्थ लावतो.
शब्दांवर हुकूमत हवी...!!
#सुप्रभात
ऑक्टोबरच्या शेवटच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता बनत आहे.. दक्षिण महाराष्ट्रात तुलनेत जास्त प्रमाणात शक्यता आहे..त्यातील २५ तारखेपर्यंत बहुतांश पाऊस असण्याची शक्यता आहे.. हा पाऊस काही प्रमाणात आधार देणारा असणार आहे..❤️
#MaharashtraRain
ज्यातून income नाही, ते हप्त्यावर घेऊन जगाला दाखवण्यात शहाणपण नाही..
दुसऱ्यांच्या नजरेत मोठं दिसण्यासाठी स्वतःच्या खिशावर ओझं घेऊ नका.
कारण लोक दोन दिवस कौतुक करतील, पण त्या हप्त्यांसाठी तुम्हालाच रोज हमाली करावी लागेल.
दिखावा नको... कमाई आणि समाधान मोठं ठेवा.
😂😂-खापर-😂😂
एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर
पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,'अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...?
थोडा वेळ घरात एकदम शांतता पसरली !
पत्नी - अरे देवा... देवा... देवा... काय बाई हा तुमचा वेंधळेपणा ! मी काल दोन पुड्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची... तुम्हाला आंघोळीसाठी उटण्याची पुडी घ्या म्हटले अन् तुम्ही हिंगाची पुडी उचलली न फासली साऱ्या अंगाला...
एवढेही कळू नये का एका सुप्रीन्टेंडेंट असलेल्या माणसाला ?
काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला ? मी म्हणून संसार करते...
पती - अगं किती किंचाळतेस ? तो हिंगाचा उग्र वास मी सोसतो, तू कशाला टेन्शन घेतेस?
पत्नी - अहो तुमच्या उग्र वासाचं जाऊ दया...
तुमच्या वेंधळेपणामुळे मी भाजीत उटणे टाकले त्याचे काय...?
😭😭😭😭🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
हे जगणं म्हणजे एक असा खेळ आहे, ज्याचे नियम आपल्याला कधी समजलेच नाहीत आणि आता खेळ संपवायची वेळ आली, तर पंचच गायब झालेत. धड मैदानाबाहेर जाता येत नाही आणि खेळात टिकून राहण्याची ताकद अंगात उरलेली नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
तुमच्या अस्तित्वाचा कोणाला काही उपयोग नसेल, तर तुम्ही फक्त एका अडगळीसारखे असता. कधी कधी वाटतं की दिवसभर फक्त आणि फक्त हसत रहावं... एकसारखं. या सगळ्यासकट स्वतःवरही खूप खूप हसावं. 👇
एका बाजूला भूतकाळाच्या जळमटांनी भरलेल्या आठवणी आणि दुसऱ्या बाजूला भविष्यात अंधाराशिवाय काहीच न दिसणारं शून्य. या दोन टोकांवर हेलकावे खात राहणं म्हणजेच म्हातारपण का.?
हे जगणं आता केवळ सोपस्कार म्हणून बाकी उरलं आहे. रोज सकाळी चहाचा कप हातात घेताना वाटतं की, 👇
आजचा दिवस तरी शेवटचा ठरावा. पण पुन्हा तीच सकाळ, तोच कंटाळवाणा दुपारचा उकाडा आणि तीच एकाकी रात्र. आपण ज्या संस्कृतीत वाढलो, तिथं म्हणे वयोवृद्धांना मान असतो. पण आजच्या या कोरड्या, यांत्रिक जगात केवळ जिवंत असण्याला काही किंमत नसते. 👇
जेव्हा जगायचं असतं, तेव्हा श्वास अपुरे पडतात, आणि जेव्हा सगळं संपवून टाकावसं वाटतं, तेव्हा हा पापी जीव काही केल्या साथ सोडत नाही. ही अशी कोंडी झाल्यावर माणसाने करायचं तरी काय.? 👇