बा देवा आदिनाथा गांगेश्वरा, गाव देवी भगवती, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या सातेरी वेतोबाक आणि "समस्त सुरवर गणानां" तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्या, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्या सर्वानांच माझ्या
इथेच गड नदीच्या पात्रात पाणखोल जुवा आणि खोतजुवा नावाची बेटे आहेत. या बेटांवर वस्ती आहे. नदीतील ग्रामजीवन अनुभवायला इथं नक्की यायला हवं. गड नदीच्या मुखाशी जो उथळ भाग आहे तिथं जवळपास ९ किमी वाळूचा दांडा आहे. त्यामुळे या परिसराचे निसर्गसौंदर्य अद्वितीय आहे.
साभार - दर्या फिरस्ती..
"कहाणी गड नदीची"
कोकणातील पर्यटन म्हणजे धरतीवरील स्वर्ग. इथले समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे हे सगळं तर सुंदर आहेच. परंतु केरळच्या बॅकवॉटर्सशी बरोबरी करू शकतील अशी नदीची खोरी व खाड्याही इथं आहेत. इथल्या नद्यांतून प्रवास करताना निसर्गाचा अविष्कार आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो.
👇🏻
पश्चिमेला अथांग सागर आणि पूर्वेला गड नदीचे पात्र यांच्यामध्ये तोंडवळी आणि तळाशील चे समुद्रकिनारे आहेत. तोंडवळीला सुरुचे वन आहे. या घनदाट वनराईत वाघ येतो असे स्थानिक सांगतात. तिथलं व्याघ्रमंदिर आवर्जून पाहायला हवं असं आहे.
👇🏻
मुंबई लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात १६ डिसेंबर १९७७ रात्री १०.२५ वाजता भक्तांना दर्शन देत असतानाच ते अनंतात विलीन झाले. बाबांचे पार्थिव कणकवलीला आणले गेले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला १८ डिसेंबर १९७७ सध्याच्या आश्रमातील मध्य गाभार्यात वेदमंत्रघोषात समाधी देण्यात आली
#कोकण
"भालचंद्र महाराज" - कणकवली
परमहंस भालचंद्र महाराज एक देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती आहे. आयुष्यभर तपसाधनेत मग्न असणारे भालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते. बाबांच्या भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे.
👇🏻
जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले. आज भक्तांना विचारले, तर विशेषत: कणकवली वासियांना विचारले, तर ते सांगतील, आमच्या समस्या, दु:ख, त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि आम्ही चिंतेतून मुक्त झालो. त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेकांना सुखशांती लाभल्याची उदाहरणे आहेत.
👇🏻